Skip to main content

बनाबाई..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 31/10/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
बनाबाई आमच्याकडे कधीपासून काम करते ते कोणीच नक्की सांगू शकणार नाही. मी तान्हा असताना माझे तेलपाणी तिनेच केले आहे. आणि त्याही आधीपासून ती आमच्याकडे आहे. म्हणजे साधारण पस्तीस-छत्तीस वर्ष झाले असतील. बनाबाई आज ऐंशीच्या पुढेमागे असेल. पाठीच्या कण्याला नैसर्गिक बाक आला आहे. हालचाली मंदावल्या आहे. पण अजूनही आमच्यासकट गल्लीतल्या ८-१० घरात काम करते. तिला कुठे-कुठे काम करते हे विचारल्यावर ती सांगेल, "दोन गुजरात्याचे घर हायेत, एक मारवाड्याचं हाय..मंग डॉक्टरींन बाईच्या घरी जातो. अन समोर जोशी बाईचं घर हाय तिथं पन जातो.." इतक्या वर्षात ह्या प्रत्येक घरात कितीतरी बदल घडलेत.

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 31/10/2019 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्‍या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.

सैराट

लेखक एपी यांनी बुधवार, 30/10/2019 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
सैराट पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी. * तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी. * मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी. * मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी. * -डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

सैराट

लेखक एपी यांनी बुधवार, 30/10/2019 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
सैराट पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी. * तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी. * मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी. * मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी. * -डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

गुन्हेगार!

लेखक फिझा यांनी बुधवार, 30/10/2019 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुन्हेगार! एकेका श्वासाचा हिशोब मांडून केलेले आरोप ती आरोपी असल्याचे सिद्ध करत होते ..ते ! "तिचं जगणं " हाच कसा गुन्हा असू शकतो… नेहमीच ? पण गीतेवर हात ठेवून तिनेही मान्य केले की जगण्याचे विशेष असे काही कारण नाहीये! " तो मर क्यो नहीं जाती ?" तटस्थ लोकांनी प्रश्न विचारला! नेहमीसारखाच ! "हवं तर मृत्युदंड देऊन टाका, खूप हत्या केल्या आहेत मी ! एक ना अनेक इच्छा, आकांक्षा मारल्या आहेत कित्येक वर्ष , अगदी चपखलपणे…! कुणाला कसलाच सुगावा न लागू देता!" ती हे बोलून हसू लागली, नेहमीसारखीच ! तिच्या 'असण्या'चा गुन्हा सिद्ध झाला आणि जन्मठेप ठोठावण्यात आली, "हट्टच असेल जगण्या

बालकथा

लेखक ऋतु हिरवा यांनी मंगळवार, 29/10/2019 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा १ आजीची वामकुक्षी झाली होती आणि कडेला चार वर्षाच्या अनिशची चुळबुळ चालू होती. आजी.....कधी उठायचं? ही बघ उठलेच ....असे म्हणत आजी उठली. आजी...आजोबा पण उठले... हो रे बाळा....चल मी तुला आता दुध देते....असे म्हणत आजीने चहासाठी आधण ठेवले. हे तू काय करतेस?? अनिश चिवचिवतच होता ... चहा करतेय रे बाळा ..... आजी ..मला पण चहा .... लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा.....आजीने डोळे वटारले .. मग मोठी माणसे का पितात? हं....आजीबाई द्या आता उत्तर ...असे म्हणत आजोबा स्वयंपाकघरात आले... बघा....चिमुरडा कसा शब्दात पकडतोय....असे म्हणत आजीने त्याला उचलून घेतले....व त्याची गोड पापी घेतली.

शोध (भाग एक)

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी मंगळवार, 29/10/2019 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज कथा पूर्ण झाली. एक महिना या कथेवर काम करत  होतो. तसं पाहिलं तर मी पुर्ण वेळ लेखक नाही. पण मला कथा लिहायला आवडतात. लघुकथा. सुचेल तशी लिहितो आणि शनिवारी रविवार त्या व्यवस्थित संकलित करून ठेवतो लॅपटॉपवर. माझं नाव विनित सदानंद राऊत. मी पुर्ण वेळ अकाऊंटंट आहे. आज मी या कथांबद्दलच एक कथा सांगणार आहे. कथा सुचली की मी मोबाईलमध्ये टाईप करून नंतर लॅपटॉपवर कॉपी करत होतो. अशा वीस पंचवीस कथा लिहिल्या होत्या मी. पण त्या फक्त माझ्या लॅपटॉपवर होत्या. कधीही कुठेच शेअर केल्या नव्हत्या कारण मला त्यांचं एक पुस्तक प्रकाशित करायचं होतं. "कथागंध" नाव पण ठरवलं होतं मी.

भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 29/10/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद) लेखक: सुधीर काळे भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत.

पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

लेखक महामाया यांनी शनिवार, 26/10/2019 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर... एस-९ याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला... दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती... स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

India Deserves Better - ८. निवडणुक जाहीरनामे, आश्वासने.. ते न पाळता पुन्हा सामोरे येणारे पक्ष आणि आपण

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 25/10/2019 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, आणि भाजपा शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठीचे बहुमत मिळाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तरीही स्थानिक मुळ विकासाची, पायाभुत सुविधांवर केलेल्या प्रगतीची कुठलीच चर्चा या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांकडुन झाली नाही, आणि २०१४ ला दिलेल्या अश्वासनांबद्दल आणि त्या नंतर केलेल्या कामांची कुठली ही चर्चा कोणाच्याही भाषणांमध्ये दिसली नाही.