Skip to main content

सायकल दौरा पूर्वेचा घाट- असा घातला घाट ३

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 26/09/2019 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरा दिवस सर्वात कठीण आहे याची पूर्ण कल्पना होती. तशी मानसिक तयारी दौऱ्याच्या आधीपासूनच झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेला परत विचारण्यात आले. “उद्या सर्वजण चढ चढणार आहेत का? चढ मारेडमल्लीपेक्षाही कठीण आहे.” “प्रयत्न करु या” सर्वांचे हेच उत्तर होते. तिसरा दिवस कठीण असण्याची दोन कारणे होती १. साधारण १४४ किमी अंतर कापायचे होते. यात सपाट असा रस्ता नव्हताच. शेवटले ११४ किमी रस्ता हा चढउताराचा होता. तो ही शहरातल्या चढउतारासारखा नाही. एक किमी चा चढ असेल तर ३.५ ते ४ % ग्रेडींयंट होता आणि २ किमी चा चढ असेल तर ३% ग्रेडीयंट होता. काही शहरातल्या सारखे चढ होते.

ओले केस

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 26/09/2019 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
केस ओले न्हालेते आले प्रेमाचे भरते (पावसात केस ओले प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!) शिडकावा ओल्या थेंबांचा चिंब भिजवून देण्याचा गोरी काया ओलेती तुझे लावण्य दाखवती गाली लाज आलेली शृंगाराविना सजलेली अशी सामोरी ललना मन हरखले ना ! साडी लपेटून उभी येते कवेत कधी? - पाषाणभेद २६/०९/२०१९

उंदरांची शर्यत -२

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 25/09/2019 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
उंदरांची शर्यत (RAT RACE) -२ उंदरांची शर्यत -२ मी विक्रांत वर असताना (१९९०) माझा एक मित्र लेफ्टनंट कमांडर नरेश राणा (हा हॅरियर या लढाऊ विमानाचा वरिष्ठ वैमानिक आणि प्रशिक्षक होता.) याने मला एक प्रकाशचित्र दाखवले. त्यात एकाच फ्रेम मध्ये तीन विमाने होती. सर्वात पुढे मिराज २०००, मध्ये हॅरियर ( ज्यात हा स्वतः होता) आणि सर्वात शेवटी HPT ३२ हे पुढे पंखा असलेले (प्रोपेलर) विमान होते. हा फोटो पाहून मी त्याला आश्चर्याने विचारले कि हा फोटो कसा काढला ( तेंव्हा फोटोशॉप हा शब्द फारच क्वचित कुणी ऐकला असेल).

India Deserves Better - १. सायकल, पर्यावरण, धोरणे आणि सरकरी उदासीनता

लेखक गणेशा यांनी बुधवार, 25/09/2019 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी स्वता सायकल चालवतो आणि त्या समस्या खुप जवळुन पाहतो आहे, म्हणुन सायकल बद्दल थोडेसे प्रथम बोलतो आहे. Under a green initiative, the Government should promote cycling as an environment-friendly means of transport, thereby reducing congestion and pollution, especially in big cities.

India Deserves Better - ०

लेखक गणेशा यांनी बुधवार, 25/09/2019 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
note : मिपा वर बर्याच दिवसानी आलो.. मधल्या काळात कोणाचे काहि विशेष असे काहि वाचले नाहि, वाचेल आता. ... २०१५ मधील 'शब्द झाले मोती' ह्य छोटासा लिखानाचा भाग सोडला तर मनातले असे काहि २०१० नंतर लिहिलेच नाहि ... कविता आणि भटकंती या पलिकडे माझीआवड कधी गेली नाहिच.. नाहि म्हणायला थोडे रिप्लाय होते राजकारणी धाग्यावर पण ते माझ्या अल्प ज्ञाना वर.आता ही मला जास्त काही राजकारणातले कळते असे अजिबात नाही ... पण थोडेशे बोलावेच वाटते ---------------------------------------------------------------------------------------------------- आजकाल चे जग हे सोशल मेडिया आणि मार्केटिग वाले आहे ...

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 25/09/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

पाभेचा चहा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/09/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पूर्वी नव्हते. पूर्वी आपल्याकडे चहा नव्हताच.  लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

प्रेमाची लांबी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 24/09/2019 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची लांबी -------------- नवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच वाटेल. तिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती . एके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर ! ती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं !” तो हसत म्हणाला, “अस्सं ?