Skip to main content

प्रेम 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 15/11/2019 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम 1 त्याला जाग आली तेव्हा त्याच्या गावात पोचलापण होता. बर्याच वर्षांनी तो घरी परतला होता. तस त्याच कोणाशी भांडण वगैरे झालं नव्हतं, परंतु त्याला दूर दूर फिरायची, नवं नवी आकाश धुंडाळायची इच्छा होती. बाबांनी त्याला कधीच थांबवलं नाही, उलट त्याला मदतच केली. एवढं मोठं कुटुंब बाबा कस सांभाळतात तेच जाणे. हा विचार संपतो आहे तोच समोरून त्याच्या मोठ्या भावांपैकी एक येताना दिसला. आज त्याला एकदम बाबांनाच भेटायची इच्छा होती, त्याने त्या भावाला हात केला आणि नंतर भेटतो म्हणून सांगितलं. गावात आल्यावर असे सगळे भेटणार, त्याला अंदाज होताच.

मलेशिया, सिंगापूर सहल

लेखक Nitin Palkar यांनी गुरुवार, 14/11/2019 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंम्बरच्या तिसऱ्याआठवड्यात मलेशिया, सिंगापूरची एक आठवड्याची सहल आखतोय. कोणत्याही सहल आयोजकाशिवाय. मी आणि एक मित्र आणि दोघांच्याही गृह स्वामिनी असे चौघेही ज्येष्ठ नागरिक आहोत. विमानाची तिकिटे आणि दोन्ही देशातील हॉटेल्स आरक्षित केलेली आहेत. याविषयी जाणकार मिपाकरांकडून अधिक मार्गदर्शन, सूचनांच्या अपेक्षेत. विशेषतः परदेशी चलन किती व कुठचे घ्यावे, स्थल दर्शनासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऐवजी खाजगी टॅक्सीने फिरल्यास खर्चात आणि सोयीत किती फरक पडू शकतो, इ. इतरही काही सूचना असल्यास स्वागतच आहे.

सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
बघा मुद्दे पटले तर १) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती २) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच ३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच ४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ?

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज ) आमच्या वार्ताहराकडून हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही शेवटी राज्यपालांनी काँग्रेस ला बोलावले पण मॅडम दिल्ली हुन येणे अवघड असल्याने राज्यपाल स्वतः १० जनपथ येथे गेले व सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अशी चिट्ठी घेऊन आले ( गुप्त सूत्रणानुसार ह्या दररोज च्या वैताग वाडी पेक्षा मला

प्रीति करो मत कोय॥

लेखक शरद यांनी मंगळवार, 12/11/2019 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण मीरेच्या भावविश्वातले एक मनोहर रूप पाहूं. "विरहिणी". सर्व संतांनी, त्यांत पुरुष संतही आले, विराणी लिहल्या. जेथे ज्ञानदेवासारखा एक बालयोगीही विराण्या लिहतो तेथे तुम्हाला मीरेने विराण्या लिहल्या, हो, अनेक लिहल्या, याचे नाविन्य वाटणार नाही. पण मीरेकडे वळण्याआधी जरा विषयांतर करण्यास परवांगी द्या. संतांनी विराण्या कां लिहल्या ? संतांची परमेश्वरावर श्रद्धा आहे. परमेश्वराची व आपली भेट व्हावी; अगदी सायुज्यता नाही तरी किमान समिपता लाभावी ही आंस. पण मुक्तीचतुष्टय हे तत्वज्ञानात ठीक. आपल्या नेहमीच्या व्यवहारात वा भाषेत हे कसे सांगावे ?

सिक्रेट धंद्याचे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/11/2019 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी का ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी गेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही काही आजारी आहे का? का इतर काही? "क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम आजकल मै हू बडी बिज्जी," - गाली गोड हासून रात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती वहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती निलू बोले, "मजा है बै तुझी काम मे बिज्जी माझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी" तर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे आधी होते तिचे वांधे खायचे "मेरेकू जादा काम करना पडता है, क्यूं की नये आमदार हाटेल में अटके है"

समुहगीतः भारतभूचे सुपुत्र आम्ही

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/11/2019 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू गान वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ|| देशासाठी कितीक झटले कितीक हुतात्मे अमर जाहले स्मृती तयांची आज येतसे स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१|| हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा गर्जले सैनीक पुढे चला लढा शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२|| भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू ग

समीक्षा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 11/11/2019 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
(‘भाषा आणि जीवन’ उन्हाळा 2018 च्या पण आता प्रकाशित झालेल्या नियतकालिकात डॉ. सयाजी पगार लिखित लेख.) अहिराणीच्या निमित्ताने समग्र भाषांची संहिता - डॉ. सयाजी पगार एखाद्या बोलीच्या निमित्ताने सर्वच भाषांना लागू होणारी संहिता कशी तयार होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ हे पुस्तक. लोकसाहित्याभ्यासाची असली तरी त्यातही स्वत:ची अशी वेगळी वाट निवडणारे व त्यासाठी रात्रंदिवस चिंतन-मननासह अभ्यास करणारे, अहिराणी भाषेचे निष्ठावंत पाईक डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकवाड्‍.मय व लोकजीवनाचे संशोधक आहेत.

शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया

लेखक हस्तर यांनी सोमवार, 11/11/2019 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया मुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली ? मते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त जर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला ? दर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे ? पुढे काय अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला अर्थात भाजप पाठिंबा देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देतील पण अटी घालून ( मराठी माणूस युद्धात जिंकता पण तहात हरतो ) मुख्यमंत्री आपला वरून एवढे रणकंदन झाले त्यामुळे शिवसेनेचा