तिहेरी तलाकच्या उंटाला लगाम लावण्यात मोदींना यश
In reply to तरी ८४ विरुद्ध आहेत. by कंजूस
In reply to काहीही, by प्रसाद_१९८२
In reply to काहीही, by प्रसाद_१९८२
In reply to काहीही, by प्रसाद_१९८२
काहीही, फालतूगिरी सुरु आहे सरकारची.बील पास होण्याच्या दुसर्या दिवशी चार ते पाच नव्या केसेस समोर येताना दिसताहेत. १) अहेमदाबाद २) ग्रेटर नोएडा ३) मिरत ४) एक भूतपुर्व अॅक्ट्रेसची केस आहे ज्यात पतीने तिहेरी तलाकला वळसा घालू पहाणारा तलाके बंया दिला. लिंक पुन्हा मिळाली तर देतो ५) गाझीयाबाद खालचा व्हिडियओ स्वतःच स्त्री बोलते तो स्वतःच ऐकावा एंबेड करता आले नाही युट्यूब लिंक उघडून घ्यावी लागेल. https://youtu.be/8MJ6OtMWYd8 - दैनिक जागरण
In reply to काहीही, कसे काय? आजच्या आज ५ केसेस ! by माहितगार
In reply to बाकी सगळ ठीक अहे.. पण ट्रिपल by आनन्दा
In reply to चोख by माहितगार
In reply to समजा सिद्ध झाले नाही तरी by माहितगार
In reply to हो हेही खरेच आहे म्हणा.. by आनन्दा
In reply to काहीही, कसे काय? आजच्या आज ५ केसेस ! by माहितगार
In reply to उंट लै by धर्मराजमुटके
In reply to उंट लै by धर्मराजमुटके
In reply to अजून समान नागरी कायदा आणि by आनन्दा
उंट लै द्वाड हायेत. काल सगळ्या चॅनल वर मोठमोठ्याने ओरडत होते की हा कायदा चुकीचा आहे म्हणून. बर्याच उंटीणी पण त्यांना सामिल होत्या. मोदी साहेबांना नेक्स्ट राजा राम मोहन रॉय / महर्षी कर्वे बनल्यामुळे किती फायदा होतो आणि ज्यांच्यासाठी हा अट्टहास केला त्यांना किती फायदा होतो हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा !एका राजकीय बाजूचा परंपरावाद दुसर्या बाजूच्या परंपरावादास शह देण्यास कारणीभूत व्हावे ह्यास तथाकथित धर्मनिरपेक्षतांचे दुटप्पी नाकर्तेपण जबाबदार ठरले. कालच्या चर्चांमधून भाजपा समर्थक दोनेक जागी कमी पडत होते १) विरोधकांचा प्रयत्न तिहेरी तलाक आणि परित्यक्तांचा प्रश्न एकच असल्याचा भासवण्याचा होता वस्तुतः भाजपाईंनी हे दोन्ही प्रश्न वेगळे आहेत या मुद्द्याची काळजीपुर्वक मांडणी करावयास लागणार्य, खरोखरही दोन्ही मुद्दे वेगळे असूनही त्यासाठी लागणार्या अभ्यासात भाजपाई कमी पडत होते. २) पती कारावासात गेल्यावर महिलेच्या आर्थिक पालनपोषणाची जबाबदारीची कुणाची या बद्दल उत्तरातही कमी पडत होते. त्याचे उत्तर विवाहीत महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण, पुर्नप्रशिक्षण, आर्थिक स्वयंपुर्णतेसाठी स्वमदत गटातून साहइत्याद, महिला स्वयं रोजगार महिला उद्योजगता विकास बद्दलचे प्रकल्प अस्तित्वात आहेतच ते गरजू महिलांपर्यंत माहिती पोहोचवण्याची गरज मात्र आहे त्यासाठी लागल्यास अधिक सुविधा उपलब्ध करता येतील हे उत्तर चपखल ठरले असते . सोबतच लागल्यास औकाफचा पैसा अशा स्त्रियांच्या प्रशिक्षण आणि उद्योग उभारणीसाठी वापरता येईल तसेच मुस्लीम महिलांना प्रॉपर्टीत समान अधिकार नाही तो मिळवून देऊन त्यांना स्वयंपूर्ण करता येईल या मुद्द्यांकडे भाजपाईंचे विषयाचा अभ्यास नसल्याने दुर्लक्ष झाले. तिहेरी तलाक देणारा गरीब कष्टकरी असेल आणि तो खरेच कारावासात अडकला तर त्याच्या पत्नीच्या पालन पोषणाची समस्या असू शकते पण अशा स्त्रीया पती अगदीच काही करूनही ऐकत नसेल तरच तक्रार करतील आणि शिक्षेच्या भितीने त्यातील एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतेक कायद्यास अभिप्रेत सरळ मार्गी होतील. यात काही धर्मांध कट्टर्ता दाखवण्याचे काही प्रयोग सुरवातीस करून पहातील पण दाळ गळत नाही लक्षात आले की सरळ येतील. सुशिक्षीत आणि स्थिरस्थावर कायद्याचा झमेला मागे लागू नये म्हणून आधीच आगाऊ काळजी घेतील पण कायद्याचा बडगा खरोखरच डोक्यावर पडतोय का याची परिक्षा घेऊन पहाणारे काही मुद्दाम तिकडमबाजी करतील आणि त्यांच्यातील सुशिक्षीत महिलांकडून कायद्याच्या कचाट्यात व्यवस्थित येतील. कायद्याचा उपयोगसुरवातीसतरी अती गरीब महिलांपेक्षा मध्यमवर्गीय महिलांना अधिक होईल असा सुरवातीचा अंदाज वाटतो. त्यांच्यातील गरीबांची समस्या ते प्रत्येक धार्मीक विषयात मुल्ला मौलवींच्या मार्गदर्शनावर अवलंबून असतात ज्यांना योग्य मार्गदर्शन करणारे मौलवी सापडणार नाहीत त्यांची सुरवातीस पंचाईत होऊ शकते. अयोग्य मार्गदर्शन करणार्ञा मौलवीं विरुद्ध कायद्यात तरतुद असावयास हवी होती ती नाही, पण आताच तशी तरतुद केली तरी या मंडळींनी उत्पात केला असता. पोटगी, हलाला विषयक कायद्यांच्या वेळी अधिक उत्पात मुल्याचा परिचय दिला जाण्याची शक्यता असू शकते. हे सोपे औषध पचल्यावर औषधांचा फायदा झालेल्यांना विश्वासात घेऊन समाज सुधारणेची पुढील औषधे देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
In reply to उंट लै द्वाड हायेत. काल by माहितगार
यात काही धर्मांध कट्टर्ता दाखवण्याचे काही प्रयोग सुरवातीस करून पहातील पण दाळ गळत नाही लक्षात आले की सरळ येतील.
डाळ शिजत नाही असे म्हणा हो. हिंदी वाक्ये जशीच्यातशी मराठीत ( दाल गलना = डाळ शिजणे ) वापर्ल्यामुळे उगीचच अर्थाचा अनर्थ होतो. डोळ्यासमोर फुटक्या तळाच्या कूकरमधून मधे आमटी टपक टपक करत गळतेय , खाली टेबलावर दाळीचे थारोळे झालेय. असे आले.In reply to यात काही धर्मांध कट्टर्ता by विजुभाऊ
In reply to उंट लै द्वाड हायेत. काल by माहितगार
२) पती कारावासात गेल्यावर महिलेच्या आर्थिक पालनपोषणाची जबाबदारीची कुणाची या बद्दल उत्तरातही कमी पडत होते.
तिहेरी तलाक देणारा गरीब कष्टकरी असेल आणि तो खरेच कारावासात अडकला तर त्याच्या पत्नीच्या पालन पोषणाची समस्या असू शकते
हे मुद्दे म्हणजे मुस्लिमअनुनय करणार्यांनी टाकलेली गुगली आहे आणि भले भले तिच्यावर त्रिफळाचित होताना दिसत आहेत. (कपाळावर हात मारणारी स्मायली)
खरी वस्तूस्थिती अशी आहे...
१. तिहेरी तलाक दिलेल्यापैकी किती जण तलाक दिलेल्या स्त्रीचा सांभाळ करतात... जवळ जवळ शून्य (जवळ जवळ शून्य, हे केवळ अत्यंत विरळ अपवादासाठी लिहिलेले आहे)! फोन, इमेल, व्हॉट्सॅप, इत्यादी क्रूर विनोदी प्रकार वापरून तिहेरी तलाक देणारा तलाक दिलेल्या स्त्रीचा सांभाळ करेल असे वादासाठी मानणेही अत्यंत ढोंगी, क्रूर, वस्तूस्थितीशी विसंगत आणि असंवेदनाशील आहे.
२. इस्लामच्या तत्वांमध्ये पोटगीला स्थान नाही. किंबहुना, प्रसिद्ध शाह बानो प्रकरणात राजीव गांधींनी ३२ वर्षांपूर्वी (सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला रद्दबातल करण्यासाठी) घटनादुरुस्ती करून याच तत्वाला कायदेशीर बनवले.
३. किंबहुना, स्वतःला कोणतीही तोशीस लागणार नाही या खात्रीमुळेच तिहेरी तलाक सहजपणे दिला जातो. अश्या तिहेरी तलाकमुळे पिडित आणि बेघर होणार्या महिलांची संख्या कमीत कमी असावी यासाठी कायद्यात कडक तरतूदी असाव्या, हा व्यावहारीक विचार आहे.
ही वस्तूस्थिती पाहता, तिहेरी तलाक देणारा तुरुंगात गेला तरी, पिडीत महिलेच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र, बेजबाबदारपणे अन्यायी कारवाई करणार्याला शिक्षा होईल.
त्याविरुद्ध, तुरुंगात जाण्याच्या भितीने तिहेरी तलाकची दुष्ट प्रथा कमी होण्यालाच मदत होईल... ती भिती नसती तर हा कायदा म्हणजे नखे आणि दात नसलेला म्हातारा आणि निरुपयोगी वाघोबाच ठरला असता.In reply to २) पती कारावासात गेल्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to २) पती कारावासात गेल्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to २) पती कारावासात गेल्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to २) पती कारावासात गेल्यावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +1 by जालिम लोशन
In reply to :) by माहितगार
मिसळपाव वेबसाइटमध्ये तशी खास व्यवस्था आहे :)तसं नाहीये ते. कित्येकदा प्रकाशित करा ह्या बटनावर सिंगल क्लिक च्या ऐवजी डबल वा ट्रिपल क्लिक केली जाते तेव्हा असे होते. हवे तर खात्री करून घेऊ शकता! काहीवेळा हे अनवधानाने होते तर काही वेळा सवयीमुळे. क्वचित प्रसंगी मिपा (drupal) अपडेट होतानाही हा प्रकार होऊ शकतो.
In reply to आजच उ प्र मधली एक केस आली आहे by विजुभाऊ
चांगलं लिहिलंय.