मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भटका कुत्रा

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भटका कुत्रा . पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने मात्र तिच घर उभारताना आम्हाला पाहायला मिळाल. तिला पिल्ल होणार होती.. आम्ही सगळी बच्चे कंपनी खूप आतुरतेनं त्या येऊ घातलेल्या सवंगड्यांची वाट बघत होतो..

बेवडे

केशवसुमार ·
लेखनविषय:
स्वातीताईंची पावले ही सुंदर कविता वाचली आणि आम्हाला आमची वाकडी तिकडी पडणारी पावले आठवली बेवडे . पिता पिता बेवडे थांबतात, थकतात, कि कानोसा घेतात.. आपल्याच सभोवतालचा! पिता पिता बेवडे अडखळतात, मागे बघतात, कि चाचपतात. .

छोटे मोठे कवी

केशवसुमार ·
लेखनविषय:
विडंबनकाराचे दुखः या जालावर कुणाला कळलच नाही.. त्यांना नेहमी गावकुसाबाहेरचे अशीच वागणूक मिळाली.स्वातीताईंचे छोटे,मोठे तारे बघून आमच्यातला जखमी उपेक्षीत विडंबनकार बंड करून उठला कविवर्या किती रे गर्व करशील.... खरं आहे, प्रतिभावान आहेस तू!! मी तुझ्याच कवितांवर जगतो. तरी.. उठून जरा सभोवार पाहा, तू ही छोटासा कवी दिसतोस! : : तू काय किंवा मी काय आपण फक्त भुणभुणतो....

आदर करण्याची कदर

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे." ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती. एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं. त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत ग

छोटे,मोठे तारे

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
छोटे,मोठे तारे . सुर्या किती रे गर्व करशील.... खरं आहे, प्रकाशमान आहेस तू!! मी तुझ्याच प्रकाशात बागडतो. तरी.. इथून काही योजनांवरून पाहा, तू ही छोटासा तारा दिसतोस! : : तू काय किंवा मी काय आपण फक्त मिणमिणतो.... रे तू जरा मोठा म्हणून जरा जास्त तेजःपुंज दिसतोस. इतकंच!! तेल संपलं की वात जाळत जाळत मी विझणार. तसाच तू ही.................. मी जरा लवकर संपेन!! तू थोडा जास्त तेवशील. एवढंच!! =========================== स्वती फडणीस .............................१०-०३-२००८

तुम्ही श्रद्धास्थान कशास म्हणाल?

ऋषिकेश ·

विसोबा खेचर 16/07/2008 - 18:00
माझं मत मी 'इतर'ला देऊ इच्छितो. परंतु मला ते ३ वाक्यात वगैरे शब्दात मांडता येत नाही! तर मला 'इतर' ह्या पर्यायाला मत द्यायचा अधिकार आहे का? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 16/07/2008 - 18:17
तर मला 'इतर' ह्या पर्यायाला मत द्यायचा अधिकार आहे का
:) द्या हो तात्या. मी ३ वाक्य म्हटलं कारण हे "इतर" इतकं धोकादायक आहे की या विषयावर दुसरा लेख होईल ;) तेव्हा ३ वाक्ये ही अट सहसा पाळावी पण नसेल जमणार तर "थोडक्यात" असे वाचावे :) -(थोडाथोडका) ऋषिकेश

विकास 16/07/2008 - 18:28
माझं मत मी, "बहुसंख्य लोकांची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - मग स्वतःची श्रद्धा नसली तरी चालेल" याला दिले. आपण जर लोकशाही पाळत असलो तर ती सर्वांना समान हवी. म्हणजे असे की माझा विरोध केवळ शिवाजीचा विडंबन अथवा व्यंगात्मक लिखाणासाठी उपयोग केला तरच नसेल तर महंमदाची कुचेष्टा अथवा ख्रिस्ताची कुचेष्टा केली तरी असेल. मग भले राजकीय दृष्ट्या आणि सामाजीक दृष्ट्या त्या धर्मांतील/समाजातील काही गोष्टींवर माझा आक्षेप असला तरी (जसा माझा माझ्या धर्मातील गैर गोष्टींवर पण आक्षेप असतो तसेच).

ब्रिटिश टिंग्या 16/07/2008 - 18:50
माझं मत "बहुसंख्य लोकांची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - मग स्वतःची श्रद्धा नसली तरी चालेल" यालाच दिलयं..... उदा : महंमद, ख्रिस्त, मन्ना डे इ.इ..... वरील व्यक्ती/स्थाने कोणा न कोणाची श्रद्धास्थाने असतील्.....माझी नाहीत! तरीदेखील या सर्वांना मी श्रद्धास्थान मानतो अन् यांचे विडंबन करण्याची गुस्ताखी माझ्याद्वारे झालेली नाही / होणार नाही याची ग्वाही देतो. असो, हे आमचं वैयक्तिक मत आहे अन् इतरांच्या मताबद्दल आम्हाला तेवढाच किंबहुना त्याहुन अधिक आदर आहे! -टिंग्या

धनंजय 16/07/2008 - 19:27
मीसुद्धा "इतर"ला मत दिले. पण लिहायला ३ वाक्ये माझ्यापाशी नाही. "माहीत नाही" असे स्पष्टीकरण चालेल का? स्पष्टीकरण पुढील ४ लांबलचक वाक्यांत : वाक्य १: माझी वागणूक बघता साधारणपणे ज्यात्या ठिकाणचे सरकार ज्याला श्रद्धास्थान म्हणते ते मी अर्थातच नोंदवून ठेवतो : सरकार म्हणजे उदाहरणार्थ मिसळपावावर तात्या, मंगेशाच्या देवळात मंगेश देवस्थान ट्रस्ट, इत्यादि. वाक्य २: सरकार नसलेल्या व्यक्तींची मतेही मी मनात कुठेतरी नोंदवून ठेवतो, मग ते बहुसंख्य असोत वा नसोत. वाक्य ३: हल्लीच "नास्तिक" या लेखामध्ये माझ्या हे लक्षात आणून दिले गेले, की आपल्या आदरणीय शिक्षकांबद्दल आपली जी भावना असते, तिला "श्रद्धा" म्हणतात (त्यांची सर्व मते आपल्याला पटोत न पटोत). वाक्य ४: मला खूप म्हणजे खूपच लोकांबद्दल आदर आहे (मला त्याच्याकडून काहीच शिकता येणार नाही असे कोण? असा विचार करता, मला पटकन कोणाचे उदाहरण आठवत नाही), त्या सर्वांनाच माझी श्रद्धास्थाने म्हणावे की काय असा माझा गोंधळ होतो आहे.

In reply to by धनंजय

प्रियाली 16/07/2008 - 19:35
मला खूप म्हणजे खूपच लोकांबद्दल आदर आहे (मला त्याच्याकडून काहीच शिकता येणार नाही असे कोण? असा विचार करता, मला पटकन कोणाचे उदाहरण आठवत नाही), त्या सर्वांनाच माझी श्रद्धास्थाने म्हणावे की काय असा माझा गोंधळ होतो आहे.
ज्या व्यक्ती*बद्दल मला आदर वाटतो अशा व्यक्तिला इतर लोक काही बोलले की माझा तोल सुटतो किंवा खर्‍याखोट्याची पर्वा न करता मला लोकांचा प्रतिवाद करावासा वाटतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आहे असे समजावे. इथे श्रद्धेसाठी व्यक्ती असणं गरजेचं नाही. जर तुमचे असे होत नसेल तर तुमच्या आदराची/ विश्वासाची/ धारणेची श्रद्धा झालेली नाही असे समजावे. श्रद्धाही ९९.९९% अंधश्रद्धाच असते असं मला वाटतं.

In reply to by प्रियाली

ऋषिकेश 16/07/2008 - 23:03
वा प्रियालीताई,
ज्या व्यक्ती*बद्दल मला आदर वाटतो अशा व्यक्तिला इतर लोक काही बोलले की माझा तोल सुटतो किंवा खर्‍याखोट्याची पर्वा न करता मला लोकांचा प्रतिवाद करावासा वाटतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आहे असे समजावे.
तुमच्या ही व्याख्या मला खूप आवडली. खूप 'नेमकी' म्हणावीशी वाटतेय -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 23:04
श्रद्धाही ९९.९९% अंधश्रद्धाच असते असं मला वाटतं. ती कशी काय? माझी माझ्या आईवर १०० टक्के श्रद्धा आहे. त्यातली ९९.९९% श्रद्धा ही अंधश्रद्धा कशी काय होऊ शकते? तात्या. -- वयाच्या सोळाव्या वर्षी मावळे जमवून स्वराज्य स्थापन करण्यापेक्षा त्याच माणसाचं नाव वापरून फालतू विडंबनं लिहीणं केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 16/07/2008 - 23:09
ती कशी काय? माझी माझ्या आईवर १०० टक्के श्रद्धा आहे. त्यातली ९९.९९% श्रद्धा ही अंधश्रद्धा कशी काय होऊ शकते?
इथे अंधश्रद्धा म्हणजे वाईट अर्थाने नव्हे... तर डोळे झाकून केलेली श्रद्धा. विशेषतः आईवडिलांच्या बाबतच ती अधिक दिसून येते. आई-वडील वाईट वागले आणि ते खरे असले तरी आपल्याला त्यांच्याबाबत कोणी इतराने (घरातले काका, मामाच घ्या) बोललेले खपत नाही. आई-वडिलांची कान उघडणी करण्यापेक्षा आधी आपण त्या इतरांचं तोंड गप्प करतो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 23:19
इथे अंधश्रद्धा म्हणजे वाईट अर्थाने नव्हे... मग काय चांगल्या अर्थाने?? तर डोळे झाकून केलेली श्रद्धा. माझी माझ्या आईवर डोळस परंतु १००% श्रद्धा आहे असं मी म्हणतो. मग ती डोळे झाकून कशी काय?? की तरीही तुम्ही तिला 'डोळे झाकून' केलेली श्रद्धा म्हणाल? आई-वडील वाईट वागले आणि ते खरे असले तरी आपल्याला त्यांच्याबाबत कोणी इतराने (घरातले काका, मामाच घ्या) बोललेले खपत नाही. असंच काही नाही. मलाही काही वेळा माझ्या आईचं वागणं पटत नाही व काही वेळेला मी माझ्या मामाचीच बाजू घेतो. पण म्हणून माझी तिच्यावर ९९.९९टक्के एवढीच श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा आहे हे कसं काय? उलट 'मलाही काही वेळा माझ्या आईचं वागणं पटत नाही' असं जेव्हा मी जाहीरपणे म्हणतो हे डोळस श्रद्धेतून की अंधश्रद्धेतून?? आई-वडिलांची कान उघडणी करण्यापेक्षा आधी आपण त्या इतरांचं तोंड गप्प करतो. हे जनरलाईज्ड विधान आहे का? आणि तुम्ही म्हणता असं जर माझ्यासारखा एखादा मनुष्य करत नसेल तर मग तुम्ही त्याला डोळस श्रद्धा म्हणाल का? की तरीही ती ९९.९९% अंधश्रद्धा?? माझी भारतीय अभिजात संगीतावर १०० टक्के श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतूनच मी बसंतच्या लग्नाचे १३ भाग लिहिले आहेत हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे की श्रद्धेचे? टक्केवारी काय? सर्व प्रश्नांची उत्तरे अपेक्षित! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 16/07/2008 - 23:24
श्रद्धेबद्दल मी माझी व्याख्या सांगितली. ती तुम्हाला पटावी असे काही नाही.
मग काय चांगल्या अर्थाने??
नाही, सर्वसामान्य अर्थाने.
हे जनरलाईज्ड विधान आहे का?
असे आपल्याला का वाटावे? मी असे कोठेही म्हटलेले नाही. मी केवळ उदाहरण दिले. उदाहरण हे सर्वांनाच लागू असते असे नाही. अपवादात्मक परिस्थिती नेहमीच असते.
आणि तुम्ही म्हणता असं जर माझ्यासारखा एखादा मनुष्य करत नसेल तर मग तुम्ही त्याला डोळस श्रद्धा म्हणाल का? की तरीही ती ९९.९९% अंधश्रद्धा??
तर मी म्हणेन की त्या माणसाची श्रद्धा नाही. विश्वास असावा.
माझी भारतीय अभिजात संगीतावर १०० टक्के श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतूनच मी बसंतच्या लग्नाचे १३ भाग लिहिले आहेत हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे की श्रद्धेचे? टक्केवारी काय?
मला संगिताबद्दल काहीही कळत नाही त्यामुळे उत्तर देणे नाकारते.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 23:39
श्रद्धेबद्दल मी माझी व्याख्या सांगितली. ती तुम्हाला पटावी असे काही नाही. मला ती पटलीच नाही म्हणून तर मी काही खुलासा विचारला! हे जनरलाईज्ड विधान आहे का? असे आपल्याला का वाटावे? मग हे कुठले विधान आहे हे कळेल का? उदाहरण हे सर्वांनाच लागू असते असे नाही. अपवादात्मक परिस्थिती नेहमीच असते. यू सेड इट! :) तर मी म्हणेन की त्या माणसाची श्रद्धा नाही. विश्वास असावा. का बरं? श्रद्धा का असू नये? की आपंण म्हणता त्या प्रमाणे फक्त श्रद्धा ही ९९.९९टक्के अंधश्रद्धा असू शकते? बरं मग बाय द वे, जशी आपण श्रद्धेच्या अन् अंधश्रद्धेच्या बाबतीत अनुक्रमे ००.०१% आणि ९९.९९% अशी आपली व्याख्या सांगितलीत तसं विश्वास आणि अविश्वासाच्या बाबतीत आपली टक्केवारी कळेल काय? मला संगिताबद्दल काहीही कळत नाही त्यामुळे उत्तर देणे नाकारते. धन्यवाद, मला माझं उत्तर मिळालं! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 17/07/2008 - 00:32
"श्रद्धा" शब्दाने लोकांना वेगवेगळा अर्थ समजतो असे वरून दिसतेच आहे. इथे मी मात्र ते वेगवेगळे अर्थ काय याबद्दल गोंधळलो आहे. तात्यांनी स्वतःच्या मताबाबत कोड्याच्या स्वरूपात एकेक "हिंट" दिली आहे, पण त्यांचे मत अजून उलगडलेले नाही. १. आईबद्दल त्यांना १००% टक्के श्रद्धा आहे, पण आईचे वागणे १००% पटत नाही - इतकेच काय कधीकधी आईविरुद्ध मामाचीही बाजू घेतलेली आहे. म्हणजे पटणे/न पटणे, बाजू घेणे/न घेणे याचा श्रद्धेशी संबंध नाही. (थोडा तरी संबंध असता तर १००% चे कमी होऊन ९९.९% झाले असते.) २. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताबद्दल श्रद्धा आहे म्हणून बसंतचे लग्न लेखमाला लिहीत आहेत. ही लेखमाला फारच सुंदर आहे. इतकेच काय, रागरागिणी म्हणजे आपले आत्मीय नातेवाईक असल्याचा भास होतो. म्हणजे "आत्मीयता" किंवा "नातेवाइकांबद्दल जे प्रेम वाटते, तसेच प्रेम" याला तात्या श्रद्धा म्हणतात का? ३. डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे श्रद्धेचे प्रकार आहेत. पैकी तात्या डोळस श्रद्धा बाळगतात. ही जबरदस्त हिंट आहे, पण तरीही काही नीट समजलेली नाही. हिंदुस्तानी संगीताबद्दल अंधश्रद्धा असती तर लेखमालिका वेगळी लिहिली गेली असती का? डोळस श्रद्धेमुळे काही वेगळे उत्तम पैलू लेखांत उतरले आहेत का? जर श्रद्धा म्हणजे आईविषयी वाटणारी आत्मीयता असेल, तर ती डोळस आणि अंध कशी असते? [आईविषयी अंध श्रद्धा असती तर तिची चूक असली तरी आईच्या बाजूने मामाविरुद्धच भांडले असते, असा काही अर्थ आहे का?] या सगळ्यावरून माझा असा काही ग्रह होतो आहे की श्रद्धा म्हणजे (तात्यांसाठी) प्रेम/आत्मीयता/आदर असे काही असावे. आता तात्यांनी कोडे ताटकळत न ठेवता, अशा "हिंट" न देता, आपली व्याख्याच द्यावी. म्हणजे मला हासुद्धा अर्थ आत्मसात करता येईल.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/07/2008 - 00:58
तात्यांनी स्वतःच्या मताबाबत कोड्याच्या स्वरूपात एकेक "हिंट" दिली आहे, पण त्यांचे मत अजून उलगडलेले नाही. मी कुठलीही हिंट न देता माझं मत आईचं, गाण्याचं उदाहरण देऊन मांडायचा प्रयत्न केला आहे. आता आपल्याला ते न समजता आपण त्याला हिंट म्हणत आहात व अजून माझे मत आपल्याला उलगडलेले नाही याला माझा काय इलाज? कधी प्रत्यक्षात भेटा, किंवा फोन करा. पुन्हा एकदा समजवायचा प्रयत्न करीन! म्हणजे पटणे/न पटणे, बाजू घेणे/न घेणे याचा श्रद्धेशी संबंध नाही. नक्कीच नाही. उलटपक्षी याचा संबंध (म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मते चूक असली तरी केवळ आपली श्रद्धा आहे म्हणून ती गोष्ट बरोबर आहे असं म्हणणं. मी मामाच्या उदाहरणात तेच सांगितलं आहे.) श्रद्धेपेक्षा, अंधश्रद्धेशीच अधिक आहे! ही श्रद्धा नव्हेच! एखाद्याचं वर्तन चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा आणि त्या व्यक्तिवर श्रद्धा असणे हा वेगळा मुद्दा! या दोन गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न केला गेला (म्हणजे केवळ श्रद्धा आहे म्हणून चूकला बरोबर म्हणणे!) की तिथे अंधश्रद्धेचा जन्म होतो! म्हणजे "आत्मीयता" किंवा "नातेवाइकांबद्दल जे प्रेम वाटते, तसेच प्रेम" याला तात्या श्रद्धा म्हणतात का? तसं म्हणा हवं तर! माझ्या मते 'श्रद्धा' हा प्रकार इतका अथांग आणि अफाट आहे की तो कुठल्याही व्याख्येपलिकडचा आहे! शब्दातीत आहे. मला आधी एक सांगा धनंजयराव, तुमच्यावर तुमच्या आईचं जे प्रेम आहे ती तुम्हाला कुठल्या व्याख्येत बसवता येईल का? श्रद्धेवर आपण त्यानंतर बोलू! भगतसिंग ज्या प्रकारे हसत हसत फासावर गेले याची आपण काय कारणमिमांसा कराल हे आधी सांगा धन्याशेठ! श्रद्धेवर आपण त्यानंतर बोलू! या सगळ्यावरून माझा असा काही ग्रह होतो आहे की श्रद्धा म्हणजे (तात्यांसाठी) प्रेम/आत्मीयता/आदर असे काही असावे. नक्कीच! वर म्हटल्याप्रमाणे श्रद्धेला अनेक पैलू असतात. किंबहुना बर्‍याचदा तिची व्याख्या करणे शब्दातीत असते! तात्या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/07/2008 - 01:11
आणि मुळात एक लक्षात घ्या धन्याशेठ, की मी श्रद्धेबद्दल कुठलीच व्याख्या केलेली नाही. मी फक्त प्रियालीने तिच्या श्रद्धा - माझी व्याख्या या प्रतिसादात श्रद्धेची "श्रद्धाही ९९.९९% अंधश्रद्धाच असते असं मला वाटतं" अशी जी व्याख्या केलेली आहे, तिला अनुसरून काही प्रतिसादात्मक लिहिले आहे इतकंच! तेव्हा श्रद्धेची व्याख्या मला विचारण्यापेक्षा तिच्या (कदाचित) exact (!) गणिती गुणोत्तरासकट अधिक विस्तृत खुलासा आपल्याला अन्यत्र मिळू शकेल असे वाटते! :) आजकाल श्रद्धेची, आणि तिच्यातल्या अंधश्रद्धेची निश्चित टक्केवारी उपलब्ध असताना आपण आता पुन्हा नव्याने मला श्रद्धेची व्याख्या विचारता आहात याचे नवल वाटले! असो..! आपला, (श्रद्धेची टक्केवारी अद्याप तरी मोजता न आलेला!) तात्या.

In reply to by प्रियाली

विकास 16/07/2008 - 23:50
ज्या व्यक्ती*बद्दल मला आदर वाटतो अशा व्यक्तिला इतर लोक काही बोलले की माझा तोल सुटतो किंवा खर्‍याखोट्याची पर्वा न करता मला लोकांचा प्रतिवाद करावासा वाटतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आहे असे समजावे. याचा अर्थ बर्‍याचदा "आत्मश्रद्धा" आणि "आत्मादर" (असा शब्द आहे का माहीत नाही, नसला तर आता तयार झाला..) असलेल्या व्यक्तींना आपण भेटतो अथवा संवाद साधतो असे वाटते... ;)

In reply to by विकास

प्रियाली 17/07/2008 - 00:23
याचा अर्थ बर्‍याचदा "आत्मश्रद्धा" आणि "आत्मादर" (असा शब्द आहे का माहीत नाही, नसला तर आता तयार झाला..) असलेल्या व्यक्तींना आपण भेटतो अथवा संवाद साधतो असे वाटते...
इतरांना भेटण्याची गरज नसावी, बरेचदा आरशात पाहून काम भागू शकेल असे वाटते. :)

In reply to by प्रियाली

विकास 17/07/2008 - 02:11
इतरांना भेटण्याची गरज नसावी, बरेचदा आरशात पाहून काम भागू शकेल असे वाटते. हे अनुभवाचे बोल वाटतं! :D

In reply to by विकास

प्रियाली 17/07/2008 - 02:54
दुसर्‍यांच्या अनुभवाचे. स्वानुभवाचे नाही बरं का! ;)

In reply to by प्रियाली

विकास 17/07/2008 - 03:24
दुसर्‍यांच्या अनुभवाचे. ~X( :? :SS जे स्वत: अनुभवले नाही पण तरी देखील ते 'खरे आहे असा' विश्वास ठेवणे याला अंधश्रद्धा म्हणतात अगदी १०० परशेंट ;) :T

In reply to by विकास

प्रियाली 17/07/2008 - 03:32
अंधश्रद्धा नाही! मी दुसर्‍यांना आरशात बघताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ;) आता बोला! :P

कोलबेर 16/07/2008 - 20:47
तुम्ही श्रद्धास्थान कशास म्हणाल?
श्रद्धास्थानाला! :) उदा. बहुसंख्य लोकांची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - मग स्वतःची श्रद्धा नसली तरी चालेल - बाकिच्यांचे श्रद्धास्थान म्हणतो बहुसंख्य लोकांची आणि स्वतःची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - बहुसंख्यांचे श्रद्धास्थान म्हणतो फक्त माझी श्रद्धा आहे त्याला - फक्त माझे श्रद्धास्थान म्हणतो बाकी लोकांच्या कोणा एकाचीही श्रद्धा आहे त्याला - म्हणजे काय ते कळले नाही

In reply to by कोलबेर

ऋषिकेश 16/07/2008 - 23:05
बाकी लोकांच्या कोणा एकाचीही श्रद्धा आहे त्याला - म्हणजे काय ते कळले नाही
बहुसंख्यांचीच नव्हे, स्वतःची पण नव्हे तर कोणाही एकाची -('मिसळ'लेला) ऋषिकेश

llपुण्याचे पेशवेll 16/07/2008 - 23:57
कोणतीही श्रध्दा ही अनुभूतीशिवाय अंधच असते असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे ज्याची त्याची श्रध्दा ही त्याने अनुभूति वरूनच ठेवलेली आहे असे मला वाटते. उदाहरणार्थ. आण्णांचे गाणे ऐकल्याशिवाय त्यांच्या गाण्याबद्दलचा अस्तिक किंवा नास्तिक तयार होऊ शकत नाही. (श्रध्दाळू) पुण्याचे पेशवे. पण म्हणून इतर कोणाच्या श्रध्दास्थानाची मी खिल्ली उडवेन असे नव्हे. पण अशी अपेक्षा तर नक्कीच बाळगेन की माझ्या श्रध्दास्थानाची जाहीर खिल्ली कोणी उडवणार नाही. कोणी माझ्या श्रध्दास्थानाची खिल्ली उडवलेली मला आवडाणार नाही , पण तसे कोणी केलेच तर मी त्याच्या श्रध्दास्थानाची खिल्ली उडवून प्रत्युत्तर देईन. पण मी उडवलेली खिल्ली मनापासून असेलच असे नाही. (जशास तसे वाला)पुण्याचे पेशवे जशी इतरांची श्रध्दास्थाने आहेत तशी माझीही आहेत. त्याविषयी मी सतर्क आहे. जर कोणाला तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांची रुपके वापरल्याने राग आला असेल तर व्यासाना लंपट म्हटल्याचा राग का बरे नाही आला. केवळ ती तुमची श्रध्दास्थाने नाहीत म्हणून. मला तर कोणी तुकाराम महाराजांचा एकेरी उल्लेख केला तरी राग येतो. पण तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जाहीरपणे कोणी त्यांची निंदानालस्ती करेल तर मी ती सहन करणार नाही. पण त्याचा रुपक म्हणून वापर केला असेल तर ते न ओळखता किंवा लेखकाचा रोख न लक्षात घेता त्याने माझ्या श्रध्दास्थानावर हल्ला केला म्हणून मी गोंधळ नक्कीच घालणार नाही. ('मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास| कठीण वज्रास भेदू ऐसे' वाला 'अस्तिक') पुण्याचे पेशवे पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ब्रिटिश टिंग्या 17/07/2008 - 00:20
उत्तम प्रतिसाद! सर्व बाबींशी सहमत आहे! -टिंग्या

कुठल्याही आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा, श्रद्धास्थानांचा सातत्याने विडंबन म्हणून केलेला वापर हा सभ्यतेत बसतो का?

विकास ·

विसोबा खेचर 16/07/2008 - 17:34
अभिनंदन विकासराव, अतिशय उत्तम कौल! मी माझं मत तिसर्‍या पर्यायाला नोंदवलं आहे! परंतु यात फक्त ऐतिहासिक व्यक्ति मोडतात. श्रद्धास्थानांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. प्रत्येकाची श्रद्धास्थाने वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ मन्ना डे हे माझं श्रद्धास्थान आहे, उद्या त्यांचं नाव गोवून जर कुणी विडंबन करू लागला तर मला काहीच म्हणायचं नाही, मी त्याकडे फक्त दुर्लक्ष करेन. परंतु ज्या ऐतिहासिक व्यक्ति सार्‍या देशाचं श्रद्धास्थान आहेत, ज्यांनी या देशाकरता रक्त सांडलं आहे त्यांचं नांव विडंबनात येणं मला योग्य वाटत नाही! तात्या. -- शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती देव, देश अन् धर्मापायी, प्राण घेतलं हाती!

प्रियाली 16/07/2008 - 17:36
कुठल्याही आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा, श्रद्धास्थानांचा सातत्याने विडंबन म्हणून केलेला वापर हा सभ्यतेत बसतो का?
सभ्यतेत बहुधा फारशा आदरणीय नसणार्‍या (जसे मला चित्रसृष्टीतील तारे), वर्तमानातील (जसे मला सध्याचे राजकारणी) आणि स्वतःचे श्रद्धास्थान नसणार्‍या व्यक्तिंचा (जसे मला काही गुरू-बाबा) सातत्याने वापरही केला जाऊ नये. उदा. सलमान खान कुमार केतकर सोनिया गांधी अनिरुद्धबापू महेश वेलणकर इ. इ. इ. कायदा असावा तर सर्वांना सारखा असावा नाहीतर जंगलराज काय वाईट आहे? असो, ही माझी व्यक्तिगत मते आहेत.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 17:43
हा हा हा! सलमान खान, कुमार केतकर, सोनिया गांधी, अनिरुद्धबापू यांच्या यादीत शक्तिवेलूचं नांव वाचून अंमळ मौज वाटली! आमचा शक्ति आहेच मुळी या मंडळींइतका ग्रेट! :) बाकी चालू द्या.. :) आपला, (वेलणकरप्रेमी) महेश अभ्यंकर. :)

In reply to by विसोबा खेचर

३_१४ विक्षिप्त अदिती 16/07/2008 - 18:02
हे शक्तिवेलू कोण? आमच्या शाळेत यांच्याबद्दल नाही शिकवलं! :-( (अज्ञान, अजाण आणि स्वतःच्या या गुणांची लाज न वाटणारी) संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजु 16/07/2008 - 18:05
आपण या विषयात न पडणंच चांगलं.. हा इतिहास आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

३_१४ विक्षिप्त अदिती 16/07/2008 - 18:56
मग त्या इतिहासाचा (माहितीजालावरील) काही पत्ता ...? मला गूगलनी तर काहीच चांगलं, चटकन नाही दाखवलं. (अभ्यासू?) संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बंडूतात्या शहाणे 17/07/2008 - 01:03
हे शक्तिवेलू कोण? आमच्या शाळेत यांच्याबद्दल नाही शिकवलं! मग सर्कीट गुरुजींच्या शाळेत जा! सगळे कळेल.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 16/07/2008 - 18:17
महर्षी वेदव्यास यांच नावही लिहिणार होते पण ते बिचारे ऐतिहासिक आहेत का पौराणिक यावरच आम्ही वाद घालत असतो. ;) आपली (व्यासभक्त) :D प्रियाली ;) गांधीजी नावाची एक ऐतिहासिक व्यक्तीही मला आदरणीय वाटते पण ते देशद्रोही असण्याच्या कथा ऐकल्या आहेत म्हणून गप्प आहे. आपली (गांधीवादी) प्रियाली

In reply to by स्वाती फडणीस

चतुरंग 16/07/2008 - 20:22
मी आपल्या भावनांशी सहमत आहे. विडंबने ही दोन वेळा होतात असे माझे मत आहे. एकतर मूळ काव्य अतिशय जबरदस्त असेल आणि विडंबनासाठी योग्य विषय त्यातून मिळत असेल तर ताकदीचे विडंबन होऊ शकते. दुसरे म्हणजे 'भावनांचा आविष्कार' ह्या गोंडस नावाखाली काही(ही) आले (जिलब्या/भजी पाडल्यासारखे) तर त्याची खिल्ली म्हणून विडंबन निर्मिती होते. सूज्ञ वाचकाला दोन्हीतला फरक चटकन कळतो असे मला वाटते. हां विडंबनात व्यक्तिगत टीका, चिखलफेक, राळ उडवणे नक्कीच नसावे, वेड्या-वाकड्या गोष्टी नसाव्यात हेही नक्की. तसेच विडंबनसुद्धा दर्जेदार आहे की काही हे विडंबनकाराने तपासून पहायला हवे, वाचकांनी त्यावर परखड प्रतिक्रिया द्याव्यात म्हणजे सुधारणा होऊ शकते. शेवटी विडंबन हा एक साहित्यप्रकार आहे हे विसरता कामा नये. असो. मला काय म्हणायचे आहे हे समजून घेऊ शकाल अशी आशा आहे. चतुरंग

In reply to by चतुरंग

केशवसुमार 16/07/2008 - 20:33
रंगाशेठ, हेच म्हणतो.. उत्तम संतुलित प्रतिसाद.. (हेच म्हणतो)केशवसुमार स्वगतः कुठली ही कविता/गझल वाचल्यावर आमच्या मनात ज्या भावना येतात त्यांचा आविष्कार म्हणजे विडंबन असे तर नाही ना म्हणायचे ह्याला? :W

In reply to by चतुरंग

टारझन 16/07/2008 - 21:08
>>>दुसरे म्हणजे 'भावनांचा आविष्कार' ह्या गोंडस नावाखाली काही(ही) आले (जिलब्या/भजी पाडल्यासारखे) तर त्याची खिल्ली म्हणून विडंबन निर्मिती होते. =)) =)) =)) अगदी सहमत... ( जिलब्या/भज्या पाडल्याने मला तेलातल्या तेलात हसायला येत पण) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

ऋषिकेश 16/07/2008 - 17:44
प्रश्न व्यक्तीसापेक्ष वाटला. म्हणून अजून मत दिलेले नाहि आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा कोणाचा कोणाला आदर वाटेल सांगता येणार नाहि. आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा अच्छा म्हणजे अब्दूल कलाम, आद्य शंकराचार्य आणि पोप हे चालतील? श्रद्धास्थानांचा कोणाची श्रद्धास्थाने सभ्यतेत बसतो का? कोणत्या सभ्यतेत? उत्तराच्या प्रतिक्षेत कारण मला मत द्यायचे आहे :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

हे विडंबनासंदर्भात आहे वैचारीक सप्रमाण चर्चांसंदर्भात नाही... जेंव्हा एखादी व्यक्ती ही काळाच्या पडद्याआड गेल्यावर ही जर स्वतःचे समाजातील चांगले स्थान टिकवून असली आणि त्यामुळे समाजातील काही घटकांना त्याबद्दल आदर वाटत असला/श्रद्धास्थान वाटत असेल तर त्याचा औपचारीक का होईना पण मान ज्यांना आदर वाटत नाही त्यांनी पण राखावा... अच्छा म्हणजे अब्दूल कलाम, आद्य शंकराचार्य आणि पोप हे चालतील? ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे वर म्हणल्याप्रमाणे , ज्यांना जाऊन काही काळ होऊन गेला आहे आणि ज्यांच्याबद्दल जनमानसात श्रद्धा आहे: मग त्यात आद्य शंकराचार्य येतात - पण त्यांच्या बद्दल थट्टा करायला काही वाटणार नाही. तेच आद्यपोप बद्दल म्हणा... अर्थात याचा अर्थ सप्रमाण वैचारीक वाद घालू नये असे मला म्हणायचे नाही. एखाद्याची गोष्ट पटत नसली अथवा त्यामुळे सामाजीक नुकसान झाले असे वाटत असले तर त्याबद्दल टिका करणे / चर्चा करणे यात गैर काहीच नाही. कोणत्या सभ्यतेत? सभ्यतेची व्याख्या खरं म्हणाल तर सर्वत्र समान हवी. पण तशी ती नाही. ती स्थल आणि समाजसापेक्ष असते. भारतीयांच्या मानसीकतेतील सभ्यता ही आदर राखण्याबाबत जास्त आहे. फक्त मग तो आदर सर्वत्र समान हवा (भारतीय देश/वंशाने असलेल्या चर्चेत) आणि त्यात गैर काही वाटत नाही. जर कुणाला नेहरू-गांधींवर विडंबन केलेले आवडणार नसेल तर त्यांनी हिंदूत्वावादी अथवा कोणा कम्यूनिस्ट नेत्याचे विडंबन पण करू नये. ("विडंबन" हा येथे मुद्दा आहे). मधे डॅनिश व्यंगचित्रामुळे मुसलमानांचे माथे भडकले होते. तेंव्हा मला इतकेच वाटले की जर डॅनिश व्यंगचित्रकार तसेच विनोद ख्रिस्तावर करत असला तर त्याला तो अधिकार आहे. असे समान व्यंगात्मक लेखन, भाषण, चित्रे , कला हे अमेरीकेत सर्वांबाबत समान वापरले जाते म्हणून जरी ते अतिरेक होतो असे वाटते आणि आवडत नसले तरी पण तरी तो मान्य करताना काही व्यक्तिगत "ऑफेन्सिव्ह" वाटत नाही. या संदर्भात माझी उपक्रमावरील खरडवहीवर असलेले कॉमेडीसेंट्रल चित्रफित पहा. म्हणूनच माझे म्हणणे आणि मत याचसाठी होते/आहे की: "विडंबन हे कितीही गंमतीत लिहीले असले तरी असे लिहीण्याचा "अतिरेक" टाळावा"

In reply to by विकास

प्रियाली 16/07/2008 - 18:58
विडंबन हे कितीही गंमतीत लिहीले असले तरी असे लिहीण्याचा "अतिरेक" टाळावा"
ते ठीक हो आणि पटण्याजोगंही! पण एकाच लेखाचा भाग असेल तर कंटिन्युईटीचे काय करायचे? म्हणजे ज्ञानेश्वरांनंतर एकदम विलासराव देशमुख कसे आणायचे? ;) बरं एखाद्यालाच क्रमशः करू नका असे कसे सांगायचे? ह. घ्या.

In reply to by प्रियाली

विकास 16/07/2008 - 19:07
ते ठीक हो! पण एकाच लेखाचा भाग असेल तर कंटिन्युईटीचे काय करायचे? म्हणजे ज्ञानेश्वरांनंतर एकदम विलासराव देशमुख कसे आणायचे? हा कौल एकंदरीत ऐतिहासीक व्यक्तींचे विडंबन आणि त्याचा अतिरेक या संदर्भातील आहे. मिपावरील इतर लेखनाचा प्रतिसाद नाही! :?

In reply to by विकास

प्रियाली 16/07/2008 - 19:12
लिहीण्याचा "अतिरेक" टाळावा"
म्हणजे एकदा लिहिलं तर अतिरेक असं म्हणता येईलच असं नाही. सातत्याने लिहिलं तर अतिरेक निश्चित होऊ शकतो. म्हणून म्हटलं की "क्रमश:" लिहिल्याने ते सर्व लिखाण एकाच मोठ्या लेखाचा भाग ठरतं , तेव्हा त्याचं काय?

In reply to by प्रियाली

विकास 16/07/2008 - 19:43
म्हणजे एकदा लिहिलं तर अतिरेक असं म्हणता येईलच असं नाही. सातत्याने लिहिलं तर अतिरेक निश्चित होऊ शकतो. म्हणून म्हटलं की "क्रमश:" लिहिल्याने ते सर्व लिखाण एकाच मोठ्या लेखाचा भाग ठरतं , तेव्हा त्याचं काय? मग त्या त्या ठिकाणचे कायदे पाळा....जर तेथिल "कायद्याच्या रक्षकांच्या" मते ते अयोग्य असेल तर तसे लेखन टाळा. एका भागानंतर तसे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष समजल्यावर (समज मिळाल्यावर) पण जर आपले लेखन बदलत नसाल तर ते अयोग्य वाटते. पण काय आहे, आधी जे हवे ते करू नंतर वकील ठरवतील असे वागायचे ठरवल्यावर क्रमशः वगैरेच्या नावाखाली दोन मजल्यांची परवानगी असताना दहा मजल्यांची इमारत बांधून नंतर एफएसाआय वाढवण्यातला प्रकार होतो....

In reply to by प्रियाली

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 18/07/2008 - 01:37
"लिहिण्याचा अतिरेक" ह्याची उदाहरणे येथे अनेक आहेत. आम्ही त्यात मोडतो, असे (आम्हास तरी) वाटत नाही. "अतिरेकी लिखाण" ह्या बाबतीत विचार करता येईल. - (सुस्पष्ट) सर्किट

प्रमोद देव 16/07/2008 - 19:35
प्रतिसाद देणे न देणे आपल्या हातात असते. तेव्हा आपण आपला हक्क बजवावा. जे लिखाण आपल्या श्रद्धांना धक्का देणारे आहे,त्यांची खिल्ली उडवणारे आहे असे वाटत असेल तर त्याकडे पूर्णपणे दूर्लक्ष करायला शिका. अशा वेळी उगाच हिरीरीने काही लिहिण्यापेक्षा/बोलण्यापेक्षा दूर्लक्ष करणे जास्त फायदेशीर आणि प्रभावी ठरते. कारण कैक वेळा हे लिखाण एखाद्या व्यक्तीला अथवा समाजाला मुद्दामहून डिवचण्यासाठी केलेले असते आणि त्याला थंड प्रतिसाद मिळाला तर त्यामागचा उद्देश कधीच सफल होत नसतो असा अनुभव आहे. तेव्हा ज्याने त्याने ठरवावे की अशा प्रकारच्या लेखनाला/वक्तव्याला कितीसे महत्व द्यावे ते . तुमच्या तीव्र प्रतिसादाने ती व्यक्ती अजूनच चेकाळते आणि त्याची अवस्था... आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला ... अशी होते आणि ह्या माकडाच्या हातात आयतेच कोलीत मिळून ते मिळेल तिथे आग लावत सुटते. दुसरी गोष्ट म्हणजे लिहिणार्‍याचे/बोलणार्‍याचे लेखन/उच्चारस्वातंत्र्य अबाधित ठेऊनही आपण त्यांचा उद्देश सफल होऊ देणे /न देणे हे आपल्या प्रतिक्रियेवर अवलंबून असते..हे एकदा मनात घट्टपैकी बसले की मग अशा गोष्टींचा त्रास होत नाही. तेव्हा लिहिणार्‍यांना लिहू द्या. त्यांना कंटाळा येईपर्यंत! तथास्तु! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विकास 16/07/2008 - 19:45
तुमच्या तीव्र प्रतिसादाने ती व्यक्ती अजूनच चेकाळते आणि त्याची अवस्था... आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला ... अशी होते आणि ह्या माकडाच्या हातात आयतेच कोलीत मिळून ते मिळेल तिथे आग लावत सुटते. सहमत... :-)

In reply to by प्रमोद देव

सहज 16/07/2008 - 21:45
अगदी खरे! प्रमोदकाकांशी सहमत. तसेच हेवेदावे, वैमनस्य, वादग्रस्त लेख/चर्चामधे, मिपावरच्या नवीन सदस्यांचा, संयमी व अत्यल्प सहभाग हा नवा वाचक, युवा वाचक सुज्ञ असल्याचा सुखद पुरावा आहे. :-)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 17/07/2008 - 00:03
देवकाका, आपला प्रतिसाद मनापासून आवडला! :) तात्या. -- पावनखिंडीत शरीर पिजेपर्यंत रण करण्यापेक्षा त्याच व्यक्तिचे नाव घेऊन एखादे विडंबन लिहिणे केव्हाही सोप्पे आणि त्याला दात विचकत वा वा, छान असे प्रतिसाद देणे, त्याहूनही अधिक सोप्पे असे माझे व्यक्तिगत मत आहे!

कोलबेर 16/07/2008 - 20:32
विडंबनातील नावे जरी श्रद्धास्थानांशी मिळती जुळती असली तरी उडवलेली खिल्ली ही श्रद्धास्थानांची नक्कीच नाही इतके कळण्या इतपत मराठी माणसाची विनोदबुद्धी शाबुत असावी. आमच्या पहाण्यात एक 'शिवाजी भोसले' नावाचा रिक्षाचालक आहे. तो स्वत:ला 'छत्रपती' समजतो. उद्या एखादे व्यक्तिचित्र लिहून त्याची कुणी खिल्ली उडवली तर तर त्यात 'शिवाजी भोसले' हे नाव आल्याने आक्षेप घ्यायचा का? -कोलबेर

In reply to by कोलबेर

विकास 16/07/2008 - 21:31
विडंबनातील नावे जरी श्रद्धास्थानांशी मिळती जुळती असली तरी उडवलेली खिल्ली ही श्रद्धास्थानांची नक्कीच नाही इतके कळण्या इतपत मराठी माणसाची विनोदबुद्धी शाबुत असावी. या वरून एक आठवलेला किस्सा: कलमाडी साहेबांनी व्हिक्टोरीया टर्मिनसचे नाव बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" केले. ते नाव प्रचलात आल्यावर तिकीटाच्या रांगेतील एका माणसाने खिडकीतील कारकुनास तिकीटे मागितली. "दो फूल शिवाजी, एक हाफ शिवाजी!" ;)

In reply to by कोलबेर

केशवसुमार 16/07/2008 - 21:35
कोलूशेठ, पडलोना.. अस काहितरी नका लिहू बॉ.. (हहपोदु)केशवसुमार

In reply to by कोलबेर

यांच्यातला फरक कळण्याइतकीही मराठी माणसाची विनोदबुद्धी शाबूत असावी,असे वाटते. (विनोदी)बेसनलाडू जाता जाता - ने.सुभाषचंद्र बोस यांचे नाव गोवून 'ह ह पु वा' छापाचा (??!) विनोद बरेच आधीपासून अस्तित्त्वात आहे.तो मी येथे उधृत केला,तर कोणाच्या श्रद्धास्थानाचा अवमान होईल काय?की ते विडंबनच आहे,म्हणून सोडून देऊ आपण? तीच गोष्ट गांधीजींची. (स्वातंत्र्यसंग्रामी)बेसनलाडू

चित्रा 16/07/2008 - 21:04
माझे मत क्र. १ या पर्यायास. मस्करीची कुस्करी होऊ नये एवढ्या बेताने कोणी विडंबन करत असल्यास ना नाही. कॉलेजच्या कट्ट्यांवर एखाद्यालाच गाठून त्याच्या सवयींवरून यथेच्छ टवाळी/नक्कल/विडंबन केले जाते. ते काही एका प्रमाणात केल्यासच जसे बरे दिसते तेवढेच येथेही असावे - हे संकेतस्थळ (किंवा कोणतेही) ही सार्वजनिक जागा आहे एवढे लक्षात असावे म्हणजे झाले.

वाचक 16/07/2008 - 21:11
ही 'सब्जेक्टीव्ह ' आहेत कोणाला काही चुकीचे वाटू शकेल - कोणाला इतर काही - हा ज्याच्या त्याच्या 'संवेदनशीलतेचा' प्रश्न आहे. ह्याबाबतीतले धोरण ' सभासदांचे वैयक्तिक' असण्यापेक्षा 'संकेत स्थळाचे आणि पूर्वप्रसिद्ध' असणे गरजेचे आहे. मग सभासदांवर त्याचे नियम आपोआपच बंधनकारक रहातील. ज्याला पटत असेल तो राहील अन्यथा नाही.

धनंजय 16/07/2008 - 22:16
स्वतःसाठी ढोबळ नियम म्हणून मी (१) वापरावा, असे मला वाटते. "दुर्लक्ष" नावाचे एक अत्यंत प्रभावी हत्यार माझ्यापाशी असल्यामुळे "इतरांच्या विडंबनाबाबत मी कसे वागावे?" यासाठी (२) हा पर्याय उपयोगी वाटतो. (असेच काही मत प्रमोद देव यांचे आहे.) आता मी जरी स्वतःसाठी (१) वापरला, तरी कोणी मला म्हणू शकेल - "तू केलाच अतिरेक". मग मी निरुत्तर होईन. तर असेच बरे, की इतरांनी माझ्याबाबत (२) हाच पर्याय वापरावा. मग - मी लोकांबद्दल (२) वापरतो, त्यांनी माझ्याबाबत (२) वापरावा अशी इच्छा करतो - म्हणून मी कौलात (२)च निवडला. भले माझ्या मनात स्वतःबद्दल (१) अशी वर्तणूक का असेना.

In reply to by धनंजय

प्रियाली 16/07/2008 - 22:41
मग - मी लोकांबद्दल (२) वापरतो, त्यांनी माझ्याबाबत (२) वापरावा अशी इच्छा करतो - म्हणून मी कौलात (२)च निवडला.
पर्याय (२) मी आधीच निवडला होता पण कारणे हीच.

In reply to by धनंजय

विकास 16/07/2008 - 23:36
सर्वप्रथम - हा कौल केवळ सर्कीट महाराजांच्या लिखाणाबद्दल नाही जरी ते तात्कालीन कारण असले तरी. हा कौल केवळ मिपासंदर्भात नाही एकंदरीत असे वागणे कितपत योग्य आहे या संबंधात आहे. त्यामुळे तात्या काय वागतात/वागले, मिपा काय आहे वगैरे प्रश्न येथे कृपया तयार करू नयेत. त्यांच्याशी वाद घालायचे असले तर वेगळे घालू शकतो, तसे मी पण घालत असतोच ;) मग - मी लोकांबद्दल (२) वापरतो, त्यांनी माझ्याबाबत (२) वापरावा अशी इच्छा करतो - म्हणून मी कौलात (२)च निवडला. असे म्हणण्यामधे एका अर्थी ज्या माध्यमाचा वापर आपण करतो त्याच्या ध्येय धोरणासंबंधात वागण्या ऐवजी आपण आपल्या "टर्म्स आणि कंडीशन्स" वापरतो असे वाटत नाही का? दुसरा प्रश्न असा की तुम्ही जरी उदारमतवादी होवून लोकांबद्दल (२) वापरले पण लोकं मात्र (३) वापरत असली (म्हणजे इतरांचे विडंबन काही फरक पडत नाही, स्वतःचे विडंबन मात्र चालणार नाही या अर्थी) तरी देखील आपण (२) हाच योग्य पर्याय ठरवाल का? बाकी आपल्या प्रतिक्रीयेसंदर्भात आणि वर विचारलेल्या प्रश्नासंदर्भात - माझे म्हणणे असे आहे की जर असे दोन्हीबाजूने वागणे असेल तर योग्य वाटेल पण मी शिष्ठसंमत आणि इतरांनी मात्र शिष्ठाचार न पाळता एकमेकांशी वागायचे असे मला चालणार नाही. त्या संदर्भात आत्ताच हृषिकेशला खरडलेले येथे परत चिकटवतो:
म्हणूनच मी सारखे सांगतोय की हा विषय जरी सर्कीटमुळे निघाला असला तरी ते निमित्त आहे. त्या लिखाणाबद्दल मी काहीच म्हणले नाही. पण सार्वजनीक ठिकाणी/स्थळांवर चेष्टा कुठे थांबते आणि कुचेष्टा कुठे सुरू होते यावर एकदा का असे चालू झाले की मर्यादा घालता येत नाही. मस्करीची मग कुस्करी होते. म्हणून संयमाचापण अतिरेक न करता संयम ठेवणे महत्वाचे वाटते. ह्याचा जर विचार सदस्यांनी केला तर कौल आणि त्यावरील चर्चा यशस्वी झाली असे म्हणायचे.

In reply to by विकास

धनंजय 17/07/2008 - 00:04
उत्तर १ : बरोबर. कौलातले माझे हे मत खास करून मिसळपावाबाबत नसून सामान्य परिस्थितीतले आहे. उत्तर २ : माझे मत सामान्य आचारसंहितेबाबत आहे. मी (२)प्रमाणे वागलो, आणि दुसरा (३)प्रमाणे वागला तर कसा, ते कळत नाही. दुसर्‍या व्यक्तीपाशी (३)वर अंमल करायची शक्ती असेल (म्हणजे तोच सरकार असेल, तो विडंबनांची बोलती बंद करू शकत असेल), तर मग त्याचीच आचारसंहिता चालणार, नाही का? (त्याच्या जाचाबद्दल मी काय उपाय करणार ते परिस्थितीवर अवलंबेल.) जर त्याच्याकडे (३)वर अंमल करायची शक्ती नसेल तर फारतर काय होईल - तो पोटतिडकेने म्हणेल "मला विडंबन आवडले नाही, ते उडवा..." आणि शक्तीविना विडंबन जागचे उडवले जाणार नाही. म्हणजे येनकेनप्रकारेण, सामान्य आचारसंहिता (२)च मानणारी होईल. मला विशेष काहीच करावे लागणार नाही. (स्वीय आचारसंहितेबद्दल - मी स्वतः कसा वागेन याबद्दल - माझे मत [१] आहे. पण माझे लिखाण मला संयमित वाटले तरी दुसर्‍या एखाद्याला संयमित वाटेलच, याची काही मी हमी देऊ शकणार नाही. मी [१] प्रमाणे वागलोच नाही, असे ठासून सांगत तो दुसरा व्यक्ती ऑब्जेक्शन आणेल. त्यामुळे [१] ही सामान्य आचारसंहिता होणार नाही. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 16/07/2008 - 22:30
कुठल्याही आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा, श्रद्धास्थानांचा सातत्याने विडंबन म्हणून केलेला वापर हा सभ्यतेत बसतो का? सभ्येतेत बसत नाही !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश 16/07/2008 - 22:58
माझे मत बरेचसे पर्याय २ च्या सारखे आहे. पण काहि फरक पडत नाहि हे जरा पटत नाहि. सातत्याचे एकाच श्रद्धास्थानाला विडंबनात वापरले तर लिखाणाने बोर होण्याचा धोका असतो हा फरक पडतोच. (आपल्याकडे बरिच रुपके आहेत सगळी वापरा उगाच पार्शिलिटी नको ;) पण मला इतरांच्या मतांची टक्केवारी बघायची जाम उत्सुकता असल्याने एकसूरी सातत्याने बोर होणे हा फरक प्रश्नकर्त्याला गृहीत नसावा असे धरून पर्याय २ निवडत आहे. :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर 16/07/2008 - 22:59
हा हा हा! एकूण चर्चा व काही लोकांनी मांडलेले मुद्दे विनोदी वाटले! चालू द्या... तात्या. -- वयाच्या २६ व्या वर्षी स्वत:चं आरमार स्थापन करण्यापेक्षा त्याच व्यक्तिचे नाव वापरून उथळ विडंबने लिहीणं केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं! :)
आणि जर विडंबनात वापर करायचाच तर लेखकासह सर्व वाचकानीही सहिष्णूता दाखवावी तरच ते विडंबन हलकेच घेता येईल. म्हणूनच कोणत्याच श्रध्दास्थानाचा वापर विडंबनात्मक रुपकात होऊ नये असे वाटते. पुण्याचे पेशवे 'महाभारत' 'भागवत' यासारखे एखादे जनमानसावर प्रभाव असणारे महाकाव्य लिहीण्यापेक्षा त्याच व्यासांना लंपट म्हणणे केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर 17/07/2008 - 00:36
'महाभारत' 'भागवत' यासारखे एखादे जनमानसावर प्रभाव असणारे महाकाव्य लिहीण्यापेक्षा त्याच व्यासांना लंपट म्हणणे केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं! शाब्बास रे पेशव्या! शिकलास की माझी ष्टाईल मारायला! जियो...! :)

In reply to by विसोबा खेचर

llपुण्याचे पेशवेll 17/07/2008 - 01:47
गुरु म्हणून म्हणून मी तुम्हालाही मानतो. :) तशी श्रध्दा आहे माझी... संगीत विवेचनातील आणि प्रतिसाद लेखनातील गुरु. स्वगतः स्वतः दत्तगुरूंनी २४ गुरु केले तर माझ्या सारख्या पामराला २४०० गुरु करायला काहीच हरकत नाही.... ह.घ्या. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बंडूतात्या शहाणे 17/07/2008 - 01:07
'महाभारत' 'भागवत' यासारखे एखादे जनमानसावर प्रभाव असणारे महाकाव्य लिहीण्यापेक्षा त्याच व्यासांना लंपट म्हणणे केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं! वरचा प्रतिसाद वाचल्यावर 'कित्ती सोप्पं' ते लक्षात येतंय

केशवसुमार 17/07/2008 - 02:14
~X( अजून ४-५ आयडी तयार करायला हवेत... म्हणजे कसे आपल्या मुद्याची मते पण वाढतील ;;) आणि उद्या कुणाची अत्रेंची किंवा विष्णु नावाची टिंगल करतो आहे म्हणून केशवसुमार, केशव, केशवा,केश्या वर गदा आणली तर काय घ्या #:S (सावध)केशवसुमार स्वगत: केसू वर कोणी हरकत घेणार नाही असे वाटते.. पण नकोच ४-५ आयडी करावेतच.. स्वतःच स्वत:ला प्रतिसाद द्यायलापण कामी येतील :$

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 17/07/2008 - 03:23
सदर कौलाचे तात्कालिक कारण आमची लेखमाला आहे, असे कळते. ही लेखमाला वाचताना सुरुवातीच्या भागातल्या एका वाक्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले दिसते: रिचर्ड बाक ह्यांनी त्यांच्या "वन" ह्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, सर्व काही एकमेकात गुंतले असते. आपण एकच आयुष्य जगतोय, असे आपल्याला वाटते, पण खरे प्रत्येक वेळी आपल्याला निर्णय घेण्याचा प्रसंग उद्भवतो, तेव्हा कुठल्यातरी जगात, तो दुसरा निर्णय घेणारी आपलीच ब्रॅंच जगत असते. असो, पण आपल्याला आता, द्विमितीतल्या मुंगीला जसे सर्व जग सपाटच आहे असे वाटेल, तसेच, आपल्याच निर्णयांतून निर्माण झालेले हे बहुमित जग कसे दिसणार ? हे जग बहुमित आहे. आपल्याला दिसते ते त्याचे आपल्या त्रिमितीतले "प्रोजेक्शन" / प्रक्षेप. इतर मितींमध्ये काय चाललेले आहे, कुणास ठाऊक ? ह्या प्रक्षेपातली श्रध्हास्थाने (कुठल्याही व्याख्येतली) इतर प्रक्षेपांत कशी असतील कोण जाणे. असो. चर्चा आवडली. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 17/07/2008 - 04:47
आपल्याला होणारे ज्ञान हे आपल्या मितींच्या मर्यादेत होते ही गोष्ट खरीच. पण शेवटी आपण जे निर्णय घेतो , विविध विषयांवर ज्या पोझिशन्स घेतो , त्या असतात आपल्याच ज्ञानावर आधारित. आपल्याला अगम्य असणार्‍या मिती म्हणा, शक्ती म्हणा , कार्यरत आहेत ही शक्यता जरी गृहित धरली , तरी आपल्यासमोर आहेत आपल्यापुरत्याच मिती. आपल्या विश्वातील पाप हे त्या "पॅरलल युनिवर्स" मधे कदाचित पुण्य असेल ; परंतु आपले व्यवहार चालतात आपल्या मितींमधेच , हे खरे की नाही ? तर मग प्रश्न रहातो , ठरलेल्या फ्रेमवर्कमधे म्हणा, चौकटीत म्हणा, त्या त्या चौकटीबद्दलच्या आपल्या ज्ञानाच्या आधारे आपण काय करायचे ? मितींच्या मर्यादेच्या अभेद्य भिंतीवर डोके आपटून तर काही होत नाही. थोडक्यात , असलेल्या मर्यादा स्वीकारणीय आहेत की नाही असा प्रश्न रहातो. या मर्यादा स्वीकारल्यानंतर आपण काही अर्थपूर्ण करू शकतो का ? का सर्वच्या सर्व ज्ञात-अज्ञात मिती समजल्याखेरीज आपण या मर्यादित सह-अस्तित्त्वात काही करू शकत नाही ? आपल्या अस्तित्त्वाला अनेक पैलू आहेत. त्यातला एक पैलू आहे "मितींच्या पलिकडचे" जाणून घेऊ पाहणार्‍या चौकसपणाचा. कदाचित ही जिज्ञासा कधीच फलद्रूप व्हायची नाही. ठीक आहे. पण आपल्याला इतरही काही बाजू आहेत. त्यांतल्या काहीना न्याय देऊ शकेल असे काही मर्यादित मितींमधेसुद्धा घडू शकतेच.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 17/07/2008 - 05:55
आपल्य प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन, आपला (ह्या मितीत गणला जाणारा) अपमान करीत नाही. ह्य विशयावर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. मूळ मुद्दे आपण दिलेलेच आहेत. मी फक्त त्यांन उदाहरणे देऊन एक्स्पांड करणार. आपण नेहमी ह्या जगाला "आभासी जग" वगैरे म्हणत असतो. त्या संज्ञेचा खरा अर्थ लक्षात न घेता. हे जगच जर आभासी आहे, तर मग त्यातील क्यारेक्टर्स तरी रियल का धरण्यात येतात ? हीदेखील एक दुसरी त्रिमिती, येथील गणिते वेगळी. गणित हे सर्व शास्त्रांचे मूळ धरले, आणि तेच जर वेगळे, तर मग सर्व शास्त्रेच वेगळी का म्हणू नयेत ? अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह करणारे विचार एका प्रतिसादात सामावणे शक्य नाही. त्यासाठी एक वेगळा लेखच हवा. अर्थात, हा लेख लिहायला ह्या (म्हणजे रियल) त्रिमितीतून वेळ काढावा लागणार. शक्य होईल. बघू केव्हा ते. - (तात्विक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 17/07/2008 - 06:04
विषय गहन आहे. पण तुम्ही म्हणता तसे , हे जग विशुद्ध आभासी आहे का ? कट्टे भरतात , भारतात आणि भारताबाहेरही. लोक एकमेकाना व्हर्च्युअल दुनियेच्या बाहेर संपर्कही साधतात. दोन जगांमधे जोडणारे हे बोगदे अस्तित्त्वात आहेतच की. दुसरे म्हणजे , आंतरजालाच्या आधीच्या विचारांच्या देवघेवीमधे काही अंशी आभासीत्व होतेच. लेखकाला, संपादकाना लोक वर्षानुवर्षे पत्र लिहायचे - एकमेकाना कधीही न भेटता. आतापेक्षा व्याप्ति प्रचंड मर्यादित असेल , परंतु देवघेव होती "कुणाशी"तरीच.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 17/07/2008 - 21:36
जगांना जोडणारे बोगदे, यातून आपल्याला वर्महोल सुचवायचे असावे. बरोबर आहे. दोन्ही जगांमध्ये येणेजाणे असूनही, एका जगातले संपर्क दुसर्‍या जगात येतात, तेव्हा त्या संपर्कांचे प्रक्षेपच ह्या जगात येतात. त्या बोगद्यातून प्रवास होताना, मूळ संपर्क जसाच्या तसा बोगद्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचत नाहीत. - (विचारवंत) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास 18/07/2008 - 02:17
हे असे अवघड लिहीण्यापेक्षा तुम्ही तुमचे भाग १/२/३.. अनंत विडंबन चालू ठेवा बरे! विचारवंतापेक्षा विडंबनकार वाचणे अंमळ सोपे जाते ;)

In reply to by विकास

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 18/07/2008 - 02:25
पेशवे म्हणतात "वैविध्यपूर्ण" लेखन हवे म्हणून, आणि हे नाना आम्हाला पुन्हा एकसुरी लिखाणाकडे वळवतात. काय करावे काहीच सुचत नाही. - (अविचारवंत) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन 17/07/2008 - 06:06
हीदेखील एक दुसरी त्रिमिती, येथील गणिते वेगळी. गणित हे सर्व शास्त्रांचे मूळ धरले, आणि तेच जर वेगळे, तर मग सर्व शास्त्रेच वेगळी का म्हणू नयेत ? अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह करणारे विचार एका प्रतिसादात सामावणे शक्य नाही. त्यासाठी एक वेगळा लेखच हवा. -- असा लेख वाचायला आवडेल. या दुसर्‍या त्रिमितीबद्दल (किंवा तिच्या अभावाबद्दल) लिहिताना 'मि ती नव्हेच!' हे शीर्षक चालेल का? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

बेसनलाडू 17/07/2008 - 08:00
(सहमत)बेसनलाडू जयंत नारळीकरांच्या 'यक्षांची देणगी' मधील 'गंगाधरपंतांचे पानिपत' ही गोष्ट आठवली.अपघातानेच ते 'त्या तिथल्या पलीकडच्या' वेगळ्याच विश्वात/मितीत पोचतात इ. त्यात मराठ्यांनी पानिपत जिंकलेले असते इ. इ. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by नंदन

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 18/07/2008 - 01:13
या दुसर्‍या त्रिमितीबद्दल (किंवा तिच्या अभावाबद्दल) लिहिताना 'मि ती नव्हेच!' हे शीर्षक चालेल का? नको रे बाबा ! असे शीर्षक दिल्यास, ज्या सदस्यांचे "लखोबा लोखंडे" हे श्रद्धास्थान आहे, त्यांची नाराजगी पत्करावी लागेल. आणि असे सदस्य तर "उच्चपदस्थ" आहेत येथे. त्यापेक्षा नकोच. - सर्किट

स्वाती महेश 17/07/2008 - 07:37
इथे लेखनातुन आणि प्रतिसादातुन बर्‍याचदा ज्या अश्लिल शिव्या वापरलेल्या दिसतात त्यावेळी कुणाला सभ्य/असभ्य हे प्रश्न पडत नाहीत ना? मग आताच हा सभ्यतेचा इतका उहापोह का? -स्वाती

In reply to by स्वाती महेश

बंडूतात्या शहाणे 17/07/2008 - 21:31
इथे लेखनातुन आणि प्रतिसादातुन बर्‍याचदा ज्या अश्लिल शिव्या वापरलेल्या दिसतात त्यावेळी कुणाला सभ्य/असभ्य हे प्रश्न पडत नाहीत ना? मग आताच हा सभ्यतेचा इतका उहापोह का? अगदी बरोबर बोललात हा स्वातीजी! मला ही हाच प्रश्न पडला आहे. गेल्या दोन भागांमध्ये कुणालाही श्रद्धांस्थानांवर झालेला हल्ला दिसला नाही मग आत्ताच का दिसावा?आणि इथे खुलेआम 'अंमळ वेड**','रां** पाठीला साबण चोळणारा' म्हणवणार्‍यांना असभ्य वर्तन अचानक का टोचू लागले? मला तरी वाटतेय की, हा 'इतिहास' कुणालातरी चांगलाच झोंबतोय.

शेखर 17/07/2008 - 08:30
ऐतिहासिक व्यक्ती/श्रद्धास्थाने यांचा विडंबनासाठी वापर करण्याला माझा पूर्ण विरोध आहे. शेवटी वाटी भर खाल्लं काय किंवा पाटीभर खाल्लं काय , शेण ते शेणच.... शेखर...

पावले

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पावले . चालता चालता पावले थांबतात, थकतात, कि कानोसा घेतात.. आपल्याच मनोबलाचा! चालता चालता पावले अडखळतात, मागे फिरतात, कि चाचपतात. . आपल्याच विश्वासाला! चालता चालता पावले शिणतात, वैतागतात, कि विचार करतात.. "ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत याचा!" चालता चालता पावले चाचपतात, विचार करतात, कि पडताळून पहातात.. "ध्येय आहे म्हणून.. ती चालतात, कि ती चालतात म्हणून.. ध्येय आहे?" चालता चालता पावले थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात!!! ==================== आपली स्वाती फडणीस................1995