अभिनंदन विकासराव,
अतिशय उत्तम कौल!
मी माझं मत तिसर्या पर्यायाला नोंदवलं आहे!
परंतु यात फक्त ऐतिहासिक व्यक्ति मोडतात. श्रद्धास्थानांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. प्रत्येकाची श्रद्धास्थाने वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ मन्ना डे हे माझं श्रद्धास्थान आहे, उद्या त्यांचं नाव गोवून जर कुणी विडंबन करू लागला तर मला काहीच म्हणायचं नाही, मी त्याकडे फक्त दुर्लक्ष करेन. परंतु ज्या ऐतिहासिक व्यक्ति सार्या देशाचं श्रद्धास्थान आहेत, ज्यांनी या देशाकरता रक्त सांडलं आहे त्यांचं नांव विडंबनात येणं मला योग्य वाटत नाही!
तात्या.
--
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती
देव, देश अन् धर्मापायी, प्राण घेतलं हाती!
कुठल्याही आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा, श्रद्धास्थानांचा सातत्याने विडंबन म्हणून केलेला वापर हा सभ्यतेत बसतो का?
सभ्यतेत बहुधा फारशा आदरणीय नसणार्या (जसे मला चित्रसृष्टीतील तारे), वर्तमानातील (जसे मला सध्याचे राजकारणी) आणि स्वतःचे श्रद्धास्थान नसणार्या व्यक्तिंचा (जसे मला काही गुरू-बाबा) सातत्याने वापरही केला जाऊ नये.
उदा.
सलमान खान
कुमार केतकर
सोनिया गांधी
अनिरुद्धबापू
महेश वेलणकर
इ. इ. इ.
कायदा असावा तर सर्वांना सारखा असावा नाहीतर जंगलराज काय वाईट आहे?
असो, ही माझी व्यक्तिगत मते आहेत.
हा हा हा!
सलमान खान, कुमार केतकर, सोनिया गांधी, अनिरुद्धबापू यांच्या यादीत शक्तिवेलूचं नांव वाचून अंमळ मौज वाटली! आमचा शक्ति आहेच मुळी या मंडळींइतका ग्रेट! :)
बाकी चालू द्या.. :)
आपला,
(वेलणकरप्रेमी) महेश अभ्यंकर. :)
महर्षी वेदव्यास यांच नावही लिहिणार होते पण ते बिचारे ऐतिहासिक आहेत का पौराणिक यावरच आम्ही वाद घालत असतो. ;)
आपली
(व्यासभक्त) :D प्रियाली ;)
गांधीजी नावाची एक ऐतिहासिक व्यक्तीही मला आदरणीय वाटते पण ते देशद्रोही असण्याच्या कथा ऐकल्या आहेत म्हणून गप्प आहे.
आपली
(गांधीवादी) प्रियाली
मी आपल्या भावनांशी सहमत आहे.
विडंबने ही दोन वेळा होतात असे माझे मत आहे.
एकतर मूळ काव्य अतिशय जबरदस्त असेल आणि विडंबनासाठी योग्य विषय त्यातून मिळत असेल तर ताकदीचे विडंबन होऊ शकते.
दुसरे म्हणजे 'भावनांचा आविष्कार' ह्या गोंडस नावाखाली काही(ही) आले (जिलब्या/भजी पाडल्यासारखे) तर त्याची खिल्ली म्हणून विडंबन निर्मिती होते.
सूज्ञ वाचकाला दोन्हीतला फरक चटकन कळतो असे मला वाटते.
हां विडंबनात व्यक्तिगत टीका, चिखलफेक, राळ उडवणे नक्कीच नसावे, वेड्या-वाकड्या गोष्टी नसाव्यात हेही नक्की.
तसेच विडंबनसुद्धा दर्जेदार आहे की काही हे विडंबनकाराने तपासून पहायला हवे, वाचकांनी त्यावर परखड प्रतिक्रिया द्याव्यात म्हणजे सुधारणा होऊ शकते.
शेवटी विडंबन हा एक साहित्यप्रकार आहे हे विसरता कामा नये.
असो. मला काय म्हणायचे आहे हे समजून घेऊ शकाल अशी आशा आहे.
चतुरंग
रंगाशेठ,
हेच म्हणतो..
उत्तम संतुलित प्रतिसाद..
(हेच म्हणतो)केशवसुमार
स्वगतः कुठली ही कविता/गझल वाचल्यावर आमच्या मनात ज्या भावना येतात त्यांचा आविष्कार म्हणजे विडंबन असे तर नाही ना म्हणायचे ह्याला? :W
>>>दुसरे म्हणजे 'भावनांचा आविष्कार' ह्या गोंडस नावाखाली काही(ही) आले (जिलब्या/भजी पाडल्यासारखे) तर त्याची खिल्ली म्हणून विडंबन निर्मिती होते.
=)) =)) =))
अगदी सहमत...
( जिलब्या/भज्या पाडल्याने मला तेलातल्या तेलात हसायला येत पण)
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
प्रश्न व्यक्तीसापेक्ष वाटला. म्हणून अजून मत दिलेले नाहि
आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा
कोणाचा कोणाला आदर वाटेल सांगता येणार नाहि.
आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींचा
अच्छा म्हणजे अब्दूल कलाम, आद्य शंकराचार्य आणि पोप हे चालतील?
श्रद्धास्थानांचा
कोणाची श्रद्धास्थाने
सभ्यतेत बसतो का?
कोणत्या सभ्यतेत?
उत्तराच्या प्रतिक्षेत कारण मला मत द्यायचे आहे :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
हे विडंबनासंदर्भात आहे वैचारीक सप्रमाण चर्चांसंदर्भात नाही...
जेंव्हा एखादी व्यक्ती ही काळाच्या पडद्याआड गेल्यावर ही जर स्वतःचे समाजातील चांगले स्थान टिकवून असली आणि त्यामुळे समाजातील काही घटकांना त्याबद्दल आदर वाटत असला/श्रद्धास्थान वाटत असेल तर त्याचा औपचारीक का होईना पण मान ज्यांना आदर वाटत नाही त्यांनी पण राखावा...
अच्छा म्हणजे अब्दूल कलाम, आद्य शंकराचार्य आणि पोप हे चालतील?
ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे वर म्हणल्याप्रमाणे , ज्यांना जाऊन काही काळ होऊन गेला आहे आणि ज्यांच्याबद्दल जनमानसात श्रद्धा आहे: मग त्यात आद्य शंकराचार्य येतात - पण त्यांच्या बद्दल थट्टा करायला काही वाटणार नाही. तेच आद्यपोप बद्दल म्हणा... अर्थात याचा अर्थ सप्रमाण वैचारीक वाद घालू नये असे मला म्हणायचे नाही. एखाद्याची गोष्ट पटत नसली अथवा त्यामुळे सामाजीक नुकसान झाले असे वाटत असले तर त्याबद्दल टिका करणे / चर्चा करणे यात गैर काहीच नाही.
कोणत्या सभ्यतेत?
सभ्यतेची व्याख्या खरं म्हणाल तर सर्वत्र समान हवी. पण तशी ती नाही. ती स्थल आणि समाजसापेक्ष असते. भारतीयांच्या मानसीकतेतील सभ्यता ही आदर राखण्याबाबत जास्त आहे. फक्त मग तो आदर सर्वत्र समान हवा (भारतीय देश/वंशाने असलेल्या चर्चेत) आणि त्यात गैर काही वाटत नाही. जर कुणाला नेहरू-गांधींवर विडंबन केलेले आवडणार नसेल तर त्यांनी हिंदूत्वावादी अथवा कोणा कम्यूनिस्ट नेत्याचे विडंबन पण करू नये. ("विडंबन" हा येथे मुद्दा आहे).
मधे डॅनिश व्यंगचित्रामुळे मुसलमानांचे माथे भडकले होते. तेंव्हा मला इतकेच वाटले की जर डॅनिश व्यंगचित्रकार तसेच विनोद ख्रिस्तावर करत असला तर त्याला तो अधिकार आहे.
असे समान व्यंगात्मक लेखन, भाषण, चित्रे , कला हे अमेरीकेत सर्वांबाबत समान वापरले जाते म्हणून जरी ते अतिरेक होतो असे वाटते आणि आवडत नसले तरी पण तरी तो मान्य करताना काही व्यक्तिगत "ऑफेन्सिव्ह" वाटत नाही. या संदर्भात माझी उपक्रमावरील खरडवहीवर असलेले कॉमेडीसेंट्रल चित्रफित पहा.
म्हणूनच माझे म्हणणे आणि मत याचसाठी होते/आहे की: "विडंबन हे कितीही गंमतीत लिहीले असले तरी असे लिहीण्याचा "अतिरेक" टाळावा"
विडंबन हे कितीही गंमतीत लिहीले असले तरी असे लिहीण्याचा "अतिरेक" टाळावा"
ते ठीक हो आणि पटण्याजोगंही! पण एकाच लेखाचा भाग असेल तर कंटिन्युईटीचे काय करायचे? म्हणजे ज्ञानेश्वरांनंतर एकदम विलासराव देशमुख कसे आणायचे? ;)
बरं एखाद्यालाच क्रमशः करू नका असे कसे सांगायचे?
ह. घ्या.
ते ठीक हो! पण एकाच लेखाचा भाग असेल तर कंटिन्युईटीचे काय करायचे? म्हणजे ज्ञानेश्वरांनंतर एकदम विलासराव देशमुख कसे आणायचे?
हा कौल एकंदरीत ऐतिहासीक व्यक्तींचे विडंबन आणि त्याचा अतिरेक या संदर्भातील आहे. मिपावरील इतर लेखनाचा प्रतिसाद नाही! :?
म्हणजे एकदा लिहिलं तर अतिरेक असं म्हणता येईलच असं नाही. सातत्याने लिहिलं तर अतिरेक निश्चित होऊ शकतो. म्हणून म्हटलं की "क्रमश:" लिहिल्याने ते सर्व लिखाण एकाच मोठ्या लेखाचा भाग ठरतं , तेव्हा त्याचं काय?
म्हणजे एकदा लिहिलं तर अतिरेक असं म्हणता येईलच असं नाही. सातत्याने लिहिलं तर अतिरेक निश्चित होऊ शकतो. म्हणून म्हटलं की "क्रमश:" लिहिल्याने ते सर्व लिखाण एकाच मोठ्या लेखाचा भाग ठरतं , तेव्हा त्याचं काय?
मग त्या त्या ठिकाणचे कायदे पाळा....जर तेथिल "कायद्याच्या रक्षकांच्या" मते ते अयोग्य असेल तर तसे लेखन टाळा. एका भागानंतर तसे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष समजल्यावर (समज मिळाल्यावर) पण जर आपले लेखन बदलत नसाल तर ते अयोग्य वाटते.
पण काय आहे, आधी जे हवे ते करू नंतर वकील ठरवतील असे वागायचे ठरवल्यावर क्रमशः वगैरेच्या नावाखाली दोन मजल्यांची परवानगी असताना दहा मजल्यांची इमारत बांधून नंतर एफएसाआय वाढवण्यातला प्रकार होतो....
"लिहिण्याचा अतिरेक" ह्याची उदाहरणे येथे अनेक आहेत. आम्ही त्यात मोडतो, असे (आम्हास तरी) वाटत नाही.
"अतिरेकी लिखाण" ह्या बाबतीत विचार करता येईल.
- (सुस्पष्ट) सर्किट
प्रतिसाद देणे न देणे आपल्या हातात असते. तेव्हा आपण आपला हक्क बजवावा.
जे लिखाण आपल्या श्रद्धांना धक्का देणारे आहे,त्यांची खिल्ली उडवणारे आहे असे वाटत असेल तर त्याकडे पूर्णपणे दूर्लक्ष करायला शिका.
अशा वेळी उगाच हिरीरीने काही लिहिण्यापेक्षा/बोलण्यापेक्षा दूर्लक्ष करणे जास्त फायदेशीर आणि प्रभावी ठरते. कारण कैक वेळा हे लिखाण एखाद्या व्यक्तीला अथवा समाजाला मुद्दामहून डिवचण्यासाठी केलेले असते आणि त्याला थंड प्रतिसाद मिळाला तर त्यामागचा उद्देश कधीच सफल होत नसतो असा अनुभव आहे. तेव्हा ज्याने त्याने ठरवावे की अशा प्रकारच्या लेखनाला/वक्तव्याला कितीसे महत्व द्यावे ते . तुमच्या तीव्र प्रतिसादाने ती व्यक्ती अजूनच चेकाळते आणि त्याची अवस्था... आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला ... अशी होते आणि ह्या माकडाच्या हातात आयतेच कोलीत मिळून ते मिळेल तिथे आग लावत सुटते.
दुसरी गोष्ट म्हणजे लिहिणार्याचे/बोलणार्याचे लेखन/उच्चारस्वातंत्र्य अबाधित ठेऊनही आपण त्यांचा उद्देश सफल होऊ देणे /न देणे हे आपल्या प्रतिक्रियेवर अवलंबून असते..हे एकदा मनात घट्टपैकी बसले की मग अशा गोष्टींचा त्रास होत नाही.
तेव्हा लिहिणार्यांना लिहू द्या. त्यांना कंटाळा येईपर्यंत!
तथास्तु!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
तुमच्या तीव्र प्रतिसादाने ती व्यक्ती अजूनच चेकाळते आणि त्याची अवस्था... आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला ... अशी होते आणि ह्या माकडाच्या हातात आयतेच कोलीत मिळून ते मिळेल तिथे आग लावत सुटते.
सहमत... :-)
अगदी खरे! प्रमोदकाकांशी सहमत.
तसेच हेवेदावे, वैमनस्य, वादग्रस्त लेख/चर्चामधे, मिपावरच्या नवीन सदस्यांचा, संयमी व अत्यल्प सहभाग हा नवा वाचक, युवा वाचक सुज्ञ असल्याचा सुखद पुरावा आहे. :-)
देवकाका,
आपला प्रतिसाद मनापासून आवडला! :)
तात्या.
--
पावनखिंडीत शरीर पिजेपर्यंत रण करण्यापेक्षा त्याच व्यक्तिचे नाव घेऊन एखादे विडंबन लिहिणे केव्हाही सोप्पे आणि त्याला दात विचकत वा वा, छान असे प्रतिसाद देणे, त्याहूनही अधिक सोप्पे असे माझे व्यक्तिगत मत आहे!
विडंबनातील नावे जरी श्रद्धास्थानांशी मिळती जुळती असली तरी उडवलेली खिल्ली ही श्रद्धास्थानांची नक्कीच नाही इतके कळण्या इतपत मराठी माणसाची विनोदबुद्धी शाबुत असावी. आमच्या पहाण्यात एक 'शिवाजी भोसले' नावाचा रिक्षाचालक आहे. तो स्वत:ला 'छत्रपती' समजतो. उद्या एखादे व्यक्तिचित्र लिहून त्याची कुणी खिल्ली उडवली तर तर त्यात 'शिवाजी भोसले' हे नाव आल्याने आक्षेप घ्यायचा का?
-कोलबेर
विडंबनातील नावे जरी श्रद्धास्थानांशी मिळती जुळती असली तरी उडवलेली खिल्ली ही श्रद्धास्थानांची नक्कीच नाही इतके कळण्या इतपत मराठी माणसाची विनोदबुद्धी शाबुत असावी.
या वरून एक आठवलेला किस्सा:
कलमाडी साहेबांनी व्हिक्टोरीया टर्मिनसचे नाव बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" केले. ते नाव प्रचलात आल्यावर तिकीटाच्या रांगेतील एका माणसाने खिडकीतील कारकुनास तिकीटे मागितली. "दो फूल शिवाजी, एक हाफ शिवाजी!" ;)
यांच्यातला फरक कळण्याइतकीही मराठी माणसाची विनोदबुद्धी शाबूत असावी,असे वाटते.
(विनोदी)बेसनलाडू
जाता जाता -
ने.सुभाषचंद्र बोस यांचे नाव गोवून 'ह ह पु वा' छापाचा (??!) विनोद बरेच आधीपासून अस्तित्त्वात आहे.तो मी येथे उधृत केला,तर कोणाच्या श्रद्धास्थानाचा अवमान होईल काय?की ते विडंबनच आहे,म्हणून सोडून देऊ आपण? तीच गोष्ट गांधीजींची.
(स्वातंत्र्यसंग्रामी)बेसनलाडू
माझे मत क्र. १ या पर्यायास.
मस्करीची कुस्करी होऊ नये एवढ्या बेताने कोणी विडंबन करत असल्यास ना नाही. कॉलेजच्या कट्ट्यांवर एखाद्यालाच गाठून त्याच्या सवयींवरून यथेच्छ टवाळी/नक्कल/विडंबन केले जाते. ते काही एका प्रमाणात केल्यासच जसे बरे दिसते तेवढेच येथेही असावे - हे संकेतस्थळ (किंवा कोणतेही) ही सार्वजनिक जागा आहे एवढे लक्षात असावे म्हणजे झाले.
ही 'सब्जेक्टीव्ह ' आहेत
कोणाला काही चुकीचे वाटू शकेल - कोणाला इतर काही - हा ज्याच्या त्याच्या 'संवेदनशीलतेचा' प्रश्न आहे.
ह्याबाबतीतले धोरण ' सभासदांचे वैयक्तिक' असण्यापेक्षा 'संकेत स्थळाचे आणि पूर्वप्रसिद्ध' असणे गरजेचे आहे. मग सभासदांवर त्याचे नियम आपोआपच बंधनकारक रहातील. ज्याला पटत असेल तो राहील अन्यथा नाही.
स्वतःसाठी ढोबळ नियम म्हणून मी (१) वापरावा, असे मला वाटते.
"दुर्लक्ष" नावाचे एक अत्यंत प्रभावी हत्यार माझ्यापाशी असल्यामुळे "इतरांच्या विडंबनाबाबत मी कसे वागावे?" यासाठी (२) हा पर्याय उपयोगी वाटतो. (असेच काही मत प्रमोद देव यांचे आहे.)
आता मी जरी स्वतःसाठी (१) वापरला, तरी कोणी मला म्हणू शकेल - "तू केलाच अतिरेक". मग मी निरुत्तर होईन. तर असेच बरे, की इतरांनी माझ्याबाबत (२) हाच पर्याय वापरावा.
मग - मी लोकांबद्दल (२) वापरतो, त्यांनी माझ्याबाबत (२) वापरावा अशी इच्छा करतो - म्हणून मी कौलात (२)च निवडला.
भले माझ्या मनात स्वतःबद्दल (१) अशी वर्तणूक का असेना.
सर्वप्रथम - हा कौल केवळ सर्कीट महाराजांच्या लिखाणाबद्दल नाही जरी ते तात्कालीन कारण असले तरी. हा कौल केवळ मिपासंदर्भात नाही एकंदरीत असे वागणे कितपत योग्य आहे या संबंधात आहे. त्यामुळे तात्या काय वागतात/वागले, मिपा काय आहे वगैरे प्रश्न येथे कृपया तयार करू नयेत. त्यांच्याशी वाद घालायचे असले तर वेगळे घालू शकतो, तसे मी पण घालत असतोच ;)
मग - मी लोकांबद्दल (२) वापरतो, त्यांनी माझ्याबाबत (२) वापरावा अशी इच्छा करतो - म्हणून मी कौलात (२)च निवडला.
असे म्हणण्यामधे एका अर्थी ज्या माध्यमाचा वापर आपण करतो त्याच्या ध्येय धोरणासंबंधात वागण्या ऐवजी आपण आपल्या "टर्म्स आणि कंडीशन्स" वापरतो असे वाटत नाही का?
दुसरा प्रश्न असा की तुम्ही जरी उदारमतवादी होवून लोकांबद्दल (२) वापरले पण लोकं मात्र (३) वापरत असली (म्हणजे इतरांचे विडंबन काही फरक पडत नाही, स्वतःचे विडंबन मात्र चालणार नाही या अर्थी) तरी देखील आपण (२) हाच योग्य पर्याय ठरवाल का?
बाकी आपल्या प्रतिक्रीयेसंदर्भात आणि वर विचारलेल्या प्रश्नासंदर्भात - माझे म्हणणे असे आहे की जर असे दोन्हीबाजूने वागणे असेल तर योग्य वाटेल पण मी शिष्ठसंमत आणि इतरांनी मात्र शिष्ठाचार न पाळता एकमेकांशी वागायचे असे मला चालणार नाही. त्या संदर्भात आत्ताच हृषिकेशला खरडलेले येथे परत चिकटवतो:
म्हणूनच मी सारखे सांगतोय की हा विषय जरी सर्कीटमुळे निघाला असला तरी ते निमित्त आहे. त्या लिखाणाबद्दल मी काहीच म्हणले नाही. पण सार्वजनीक ठिकाणी/स्थळांवर चेष्टा कुठे थांबते आणि कुचेष्टा कुठे सुरू होते यावर एकदा का असे चालू झाले की मर्यादा घालता येत नाही. मस्करीची मग कुस्करी होते. म्हणून संयमाचापण अतिरेक न करता संयम ठेवणे महत्वाचे वाटते. ह्याचा जर विचार सदस्यांनी केला तर कौल आणि त्यावरील चर्चा यशस्वी झाली असे म्हणायचे.
उत्तर १ : बरोबर. कौलातले माझे हे मत खास करून मिसळपावाबाबत नसून सामान्य परिस्थितीतले आहे.
उत्तर २ : माझे मत सामान्य आचारसंहितेबाबत आहे. मी (२)प्रमाणे वागलो, आणि दुसरा (३)प्रमाणे वागला तर कसा, ते कळत नाही.
दुसर्या व्यक्तीपाशी (३)वर अंमल करायची शक्ती असेल (म्हणजे तोच सरकार असेल, तो विडंबनांची बोलती बंद करू शकत असेल), तर मग त्याचीच आचारसंहिता चालणार, नाही का? (त्याच्या जाचाबद्दल मी काय उपाय करणार ते परिस्थितीवर अवलंबेल.)
जर त्याच्याकडे (३)वर अंमल करायची शक्ती नसेल तर फारतर काय होईल - तो पोटतिडकेने म्हणेल "मला विडंबन आवडले नाही, ते उडवा..." आणि शक्तीविना विडंबन जागचे उडवले जाणार नाही. म्हणजे येनकेनप्रकारेण, सामान्य आचारसंहिता (२)च मानणारी होईल. मला विशेष काहीच करावे लागणार नाही.
(स्वीय आचारसंहितेबद्दल - मी स्वतः कसा वागेन याबद्दल - माझे मत [१] आहे. पण माझे लिखाण मला संयमित वाटले तरी दुसर्या एखाद्याला संयमित वाटेलच, याची काही मी हमी देऊ शकणार नाही. मी [१] प्रमाणे वागलोच नाही, असे ठासून सांगत तो दुसरा व्यक्ती ऑब्जेक्शन आणेल. त्यामुळे [१] ही सामान्य आचारसंहिता होणार नाही. )
माझे मत बरेचसे पर्याय २ च्या सारखे आहे. पण काहि फरक पडत नाहि हे जरा पटत नाहि. सातत्याचे एकाच श्रद्धास्थानाला विडंबनात वापरले तर लिखाणाने बोर होण्याचा धोका असतो हा फरक पडतोच. (आपल्याकडे बरिच रुपके आहेत सगळी वापरा उगाच पार्शिलिटी नको ;)
पण मला इतरांच्या मतांची टक्केवारी बघायची जाम उत्सुकता असल्याने एकसूरी सातत्याने बोर होणे हा फरक प्रश्नकर्त्याला गृहीत नसावा असे धरून पर्याय २ निवडत आहे. :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
हा हा हा!
एकूण चर्चा व काही लोकांनी मांडलेले मुद्दे विनोदी वाटले!
चालू द्या...
तात्या.
--
वयाच्या २६ व्या वर्षी स्वत:चं आरमार स्थापन करण्यापेक्षा त्याच व्यक्तिचे नाव वापरून उथळ विडंबने लिहीणं केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं! :)
आणि जर विडंबनात वापर करायचाच तर लेखकासह सर्व वाचकानीही सहिष्णूता दाखवावी तरच ते विडंबन हलकेच घेता येईल. म्हणूनच कोणत्याच श्रध्दास्थानाचा वापर विडंबनात्मक रुपकात होऊ नये असे वाटते.
पुण्याचे पेशवे
'महाभारत' 'भागवत' यासारखे एखादे जनमानसावर प्रभाव असणारे महाकाव्य लिहीण्यापेक्षा त्याच व्यासांना लंपट म्हणणे केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं!
'महाभारत' 'भागवत' यासारखे एखादे जनमानसावर प्रभाव असणारे महाकाव्य लिहीण्यापेक्षा त्याच व्यासांना लंपट म्हणणे केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं!
शाब्बास रे पेशव्या!
शिकलास की माझी ष्टाईल मारायला! जियो...! :)
गुरु म्हणून म्हणून मी तुम्हालाही मानतो. :) तशी श्रध्दा आहे माझी... संगीत विवेचनातील आणि प्रतिसाद लेखनातील गुरु.
स्वगतः स्वतः दत्तगुरूंनी २४ गुरु केले तर माझ्या सारख्या पामराला २४०० गुरु करायला काहीच हरकत नाही.... ह.घ्या. :)
पुण्याचे पेशवे
'महाभारत' 'भागवत' यासारखे एखादे जनमानसावर प्रभाव असणारे महाकाव्य लिहीण्यापेक्षा त्याच व्यासांना लंपट म्हणणे केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं!
वरचा प्रतिसाद वाचल्यावर 'कित्ती सोप्पं' ते लक्षात येतंय
~X( अजून ४-५ आयडी तयार करायला हवेत...
म्हणजे कसे आपल्या मुद्याची मते पण वाढतील ;;) आणि उद्या कुणाची अत्रेंची किंवा विष्णु नावाची टिंगल करतो आहे म्हणून केशवसुमार, केशव, केशवा,केश्या वर गदा आणली तर काय घ्या #:S
(सावध)केशवसुमार
स्वगत: केसू वर कोणी हरकत घेणार नाही असे वाटते.. पण नकोच ४-५ आयडी करावेतच.. स्वतःच स्वत:ला प्रतिसाद द्यायलापण कामी येतील :$
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 17/07/2008 03:23
सदर कौलाचे तात्कालिक कारण आमची लेखमाला आहे, असे कळते. ही लेखमाला वाचताना सुरुवातीच्या भागातल्या एका वाक्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले दिसते:
रिचर्ड बाक ह्यांनी त्यांच्या "वन" ह्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, सर्व काही एकमेकात गुंतले असते. आपण एकच आयुष्य जगतोय, असे आपल्याला वाटते, पण खरे प्रत्येक वेळी आपल्याला निर्णय घेण्याचा प्रसंग उद्भवतो, तेव्हा कुठल्यातरी जगात, तो दुसरा निर्णय घेणारी आपलीच ब्रॅंच जगत असते. असो, पण आपल्याला आता, द्विमितीतल्या मुंगीला जसे सर्व जग सपाटच आहे असे वाटेल, तसेच, आपल्याच निर्णयांतून निर्माण झालेले हे बहुमित जग कसे दिसणार ?
हे जग बहुमित आहे. आपल्याला दिसते ते त्याचे आपल्या त्रिमितीतले "प्रोजेक्शन" / प्रक्षेप.
इतर मितींमध्ये काय चाललेले आहे, कुणास ठाऊक ?
ह्या प्रक्षेपातली श्रध्हास्थाने (कुठल्याही व्याख्येतली) इतर प्रक्षेपांत कशी असतील कोण जाणे.
असो.
चर्चा आवडली.
- सर्किट
In reply to सदर कौल by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आपल्याला होणारे ज्ञान हे आपल्या मितींच्या मर्यादेत होते ही गोष्ट खरीच. पण शेवटी आपण जे निर्णय घेतो , विविध विषयांवर ज्या पोझिशन्स घेतो , त्या असतात आपल्याच ज्ञानावर आधारित. आपल्याला अगम्य असणार्या मिती म्हणा, शक्ती म्हणा , कार्यरत आहेत ही शक्यता जरी गृहित धरली , तरी आपल्यासमोर आहेत आपल्यापुरत्याच मिती. आपल्या विश्वातील पाप हे त्या "पॅरलल युनिवर्स" मधे कदाचित पुण्य असेल ; परंतु आपले व्यवहार चालतात आपल्या मितींमधेच , हे खरे की नाही ?
तर मग प्रश्न रहातो , ठरलेल्या फ्रेमवर्कमधे म्हणा, चौकटीत म्हणा, त्या त्या चौकटीबद्दलच्या आपल्या ज्ञानाच्या आधारे आपण काय करायचे ? मितींच्या मर्यादेच्या अभेद्य भिंतीवर डोके आपटून तर काही होत नाही. थोडक्यात , असलेल्या मर्यादा स्वीकारणीय आहेत की नाही असा प्रश्न रहातो. या मर्यादा स्वीकारल्यानंतर आपण काही अर्थपूर्ण करू शकतो का ? का सर्वच्या सर्व ज्ञात-अज्ञात मिती समजल्याखेरीज आपण या मर्यादित सह-अस्तित्त्वात काही करू शकत नाही ?
आपल्या अस्तित्त्वाला अनेक पैलू आहेत. त्यातला एक पैलू आहे "मितींच्या पलिकडचे" जाणून घेऊ पाहणार्या चौकसपणाचा. कदाचित ही जिज्ञासा कधीच फलद्रूप व्हायची नाही. ठीक आहे. पण आपल्याला इतरही काही बाजू आहेत. त्यांतल्या काहीना न्याय देऊ शकेल असे काही मर्यादित मितींमधेसुद्धा घडू शकतेच.
आपल्य प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन, आपला (ह्या मितीत गणला जाणारा) अपमान करीत नाही.
ह्य विशयावर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल.
मूळ मुद्दे आपण दिलेलेच आहेत. मी फक्त त्यांन उदाहरणे देऊन एक्स्पांड करणार.
आपण नेहमी ह्या जगाला "आभासी जग" वगैरे म्हणत असतो. त्या संज्ञेचा खरा अर्थ लक्षात न घेता.
हे जगच जर आभासी आहे, तर मग त्यातील क्यारेक्टर्स तरी रियल का धरण्यात येतात ?
हीदेखील एक दुसरी त्रिमिती, येथील गणिते वेगळी. गणित हे सर्व शास्त्रांचे मूळ धरले, आणि तेच जर वेगळे, तर मग सर्व शास्त्रेच वेगळी का म्हणू नयेत ?
अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह करणारे विचार एका प्रतिसादात सामावणे शक्य नाही. त्यासाठी एक वेगळा लेखच हवा.
अर्थात, हा लेख लिहायला ह्या (म्हणजे रियल) त्रिमितीतून वेळ काढावा लागणार.
शक्य होईल. बघू केव्हा ते.
- (तात्विक) सर्किट
In reply to सुंदर प्रतिसाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
विषय गहन आहे. पण तुम्ही म्हणता तसे , हे जग विशुद्ध आभासी आहे का ? कट्टे भरतात , भारतात आणि भारताबाहेरही. लोक एकमेकाना व्हर्च्युअल दुनियेच्या बाहेर संपर्कही साधतात. दोन जगांमधे जोडणारे हे बोगदे अस्तित्त्वात आहेतच की. दुसरे म्हणजे , आंतरजालाच्या आधीच्या विचारांच्या देवघेवीमधे काही अंशी आभासीत्व होतेच. लेखकाला, संपादकाना लोक वर्षानुवर्षे पत्र लिहायचे - एकमेकाना कधीही न भेटता. आतापेक्षा व्याप्ति प्रचंड मर्यादित असेल , परंतु देवघेव होती "कुणाशी"तरीच.
जगांना जोडणारे बोगदे, यातून आपल्याला वर्महोल सुचवायचे असावे. बरोबर आहे. दोन्ही जगांमध्ये येणेजाणे असूनही, एका जगातले संपर्क दुसर्या जगात येतात, तेव्हा त्या संपर्कांचे प्रक्षेपच ह्या जगात येतात. त्या बोगद्यातून प्रवास होताना, मूळ संपर्क जसाच्या तसा बोगद्याच्या दुसर्या टोकापर्यंत पोहोचत नाहीत.
- (विचारवंत) सर्किट
In reply to सुंदर प्रतिसाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हीदेखील एक दुसरी त्रिमिती, येथील गणिते वेगळी. गणित हे सर्व शास्त्रांचे मूळ धरले, आणि तेच जर वेगळे, तर मग सर्व शास्त्रेच वेगळी का म्हणू नयेत ? अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह करणारे विचार एका प्रतिसादात सामावणे शक्य नाही. त्यासाठी एक वेगळा लेखच हवा.
-- असा लेख वाचायला आवडेल. या दुसर्या त्रिमितीबद्दल (किंवा तिच्या अभावाबद्दल) लिहिताना 'मि ती नव्हेच!' हे शीर्षक चालेल का? :)
(सहमत)बेसनलाडू
जयंत नारळीकरांच्या 'यक्षांची देणगी' मधील 'गंगाधरपंतांचे पानिपत' ही गोष्ट आठवली.अपघातानेच ते 'त्या तिथल्या पलीकडच्या' वेगळ्याच विश्वात/मितीत पोचतात इ. त्यात मराठ्यांनी पानिपत जिंकलेले असते इ. इ.
(स्मरणशील)बेसनलाडू
या दुसर्या त्रिमितीबद्दल (किंवा तिच्या अभावाबद्दल) लिहिताना 'मि ती नव्हेच!' हे शीर्षक चालेल का?
नको रे बाबा ! असे शीर्षक दिल्यास, ज्या सदस्यांचे "लखोबा लोखंडे" हे श्रद्धास्थान आहे, त्यांची नाराजगी पत्करावी लागेल. आणि असे सदस्य तर "उच्चपदस्थ" आहेत येथे. त्यापेक्षा नकोच.
- सर्किट
इथे लेखनातुन आणि प्रतिसादातुन बर्याचदा ज्या अश्लिल शिव्या वापरलेल्या दिसतात त्यावेळी कुणाला सभ्य/असभ्य हे प्रश्न पडत नाहीत ना? मग आताच हा सभ्यतेचा इतका उहापोह का?
-स्वाती
इथे लेखनातुन आणि प्रतिसादातुन बर्याचदा ज्या अश्लिल शिव्या वापरलेल्या दिसतात त्यावेळी कुणाला सभ्य/असभ्य हे प्रश्न पडत नाहीत ना? मग आताच हा सभ्यतेचा इतका उहापोह का?
अगदी बरोबर बोललात हा स्वातीजी! मला ही हाच प्रश्न पडला आहे. गेल्या दोन भागांमध्ये कुणालाही श्रद्धांस्थानांवर झालेला हल्ला दिसला नाही मग आत्ताच का दिसावा?आणि इथे खुलेआम 'अंमळ वेड**','रां** पाठीला साबण चोळणारा' म्हणवणार्यांना असभ्य वर्तन अचानक का टोचू लागले?
मला तरी वाटतेय की, हा 'इतिहास' कुणालातरी चांगलाच झोंबतोय.
ऐतिहासिक व्यक्ती/श्रद्धास्थाने यांचा विडंबनासाठी वापर करण्याला माझा पूर्ण विरोध आहे.
शेवटी वाटी भर खाल्लं काय किंवा पाटीभर खाल्लं काय , शेण ते शेणच....
शेखर...
प्रतिक्रिया
अतिशय उत्तम!
माझं मत
:)
In reply to माझं मत by प्रियाली
शक्तिवेलू?
In reply to :) by विसोबा खेचर
संहिता..
In reply to शक्तिवेलू? by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्राजु
In reply to संहिता.. by प्राजु
शाळा बदला
In reply to शक्तिवेलू? by ३_१४ विक्षिप्त अदिती
महर्षी वेदव्यास | गांधीजी
In reply to :) by विसोबा खेचर
कविता ही बर्याचदा भावनांचा आविष्कार असते
स्वातीताई,
In reply to कविता ही बर्याचदा भावनांचा आविष्कार असते by स्वाती फडणीस
वा !!
In reply to स्वातीताई, by चतुरंग
चेकमेट
In reply to स्वातीताई, by चतुरंग
प्रश्न सापेक्ष वाटला
व्यक्तिसापेक्ष असेल समाजसापेक्ष नाही...
In reply to प्रश्न सापेक्ष वाटला by ऋषिकेश
क्रमशः
In reply to व्यक्तिसापेक्ष असेल समाजसापेक्ष नाही... by विकास
गल्लत
In reply to क्रमशः by प्रियाली
गल्लत नाही
In reply to गल्लत by विकास
मग लोकशाही / कायदे पाळा...
In reply to गल्लत नाही by प्रियाली
कायद्याचे रक्षक| कायद्यांचे पालन
In reply to मग लोकशाही / कायदे पाळा... by विकास
सहमत!
In reply to कायद्याचे रक्षक| कायद्यांचे पालन by प्रियाली
लिहिण्याचा अतिरेक ?
In reply to गल्लत नाही by प्रियाली
लिहिणार्याला लिहू द्यावे!
मस्त!
In reply to लिहिणार्याला लिहू द्यावे! by प्रमोद देव
आवडली!
In reply to लिहिणार्याला लिहू द्यावे! by प्रमोद देव
+++१
In reply to लिहिणार्याला लिहू द्यावे! by प्रमोद देव
सुंदर!
In reply to लिहिणार्याला लिहू द्यावे! by प्रमोद देव
विडंबन
या संदर्भात
In reply to विडंबन by कोलबेर
खो खो खो!!
In reply to विडंबन by कोलबेर
शिवाजी भोसले हा रिक्षाचालक आणि छत्रपती शिवाजी शहाजी भोसले
In reply to विडंबन by कोलबेर
१
वरील सर्व मते
१ की २ ही माझी हिचकिच
१००% सहमत
In reply to १ की २ ही माझी हिचकिच by धनंजय
दोन प्रश्न
In reply to १ की २ ही माझी हिचकिच by धनंजय
कुठल्याही आचारसंहितेबाबत
In reply to दोन प्रश्न by विकास
सभ्येतेत बसत नाही.
पर्याय २
:)
कोणात्याही श्रध्दास्थानाचा वापर विडंबनात होऊ नये...
:)
In reply to कोणात्याही श्रध्दास्थानाचा वापर विडंबनात होऊ नये... by llपुण्याचे पेशवेll
होय तर.. :)
In reply to :) by विसोबा खेचर
सोप्पय
In reply to कोणात्याही श्रध्दास्थानाचा वापर विडंबनात होऊ नये... by llपुण्याचे पेशवेll
छ्या बॊ..
सदर कौल
काही प्रश्न- काही उत्तरे.
In reply to सदर कौल by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सुंदर प्रतिसाद
In reply to काही प्रश्न- काही उत्तरे. by मुक्तसुनीत
धन्यवाद.
In reply to सुंदर प्रतिसाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
बोगदे
In reply to धन्यवाद. by मुक्तसुनीत
हे असे
In reply to बोगदे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आता बोला !
In reply to हे असे by विकास
लेख
In reply to सुंदर प्रतिसाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन राव !
In reply to लेख by नंदन
असेच म्हणतो
In reply to लेख by नंदन
नको रे बाबा !
In reply to लेख by नंदन
सभ्य/असभ्य
उत्तर मिळेल?
In reply to सभ्य/असभ्य by स्वाती महेश
विरोध