बेवडे
लेखनविषय:
स्वातीताईंची पावले ही सुंदर कविता वाचली आणि आम्हाला आमची वाकडी तिकडी पडणारी पावले आठवली
बेवडे
.
पिता पिता बेवडे
थांबतात,
थकतात,
कि कानोसा घेतात..
आपल्याच सभोवतालचा!
पिता पिता बेवडे
अडखळतात,
मागे बघतात,
कि चाचपतात. .
आपल्याच खिश्याला!
पिता पिता बेवडे
शिणतात,
वैतागतात,
कि विचार करतात..
"ते पिता आहेत,
कि पाजवली जात आहे याचा!"
पिता पिता बेवडे
चाचपतात,
विचार करतात,
कि पडताळून पहातात..
"दु:ख आहे म्हणून..
ते पितात,
कि ते पितात म्हणून..
दु:ख आहे?"
पिता पिता बेवडे
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!!!
====================
आपला केशवसुमार................२००८
वाचने
6315
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
आवडले
अडखळले
अरे काय चालंलय काय?
In reply to अरे काय चालंलय काय? by चतुरंग
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
मला वाटलं ते सांगितलं!
In reply to अरे काय चालंलय काय? by चतुरंग
हो खरय
In reply to अरे काय चालंलय काय? by चतुरंग
+१
धन्यवाद!!
विचारी
In reply to विचारी by प्रकाश घाटपांडे
सहमत
जाहीर निषेध!!!
In reply to जाहीर निषेध!!! by पिवळा डांबिस
मदिरेवर
In reply to जाहीर निषेध!!! by पिवळा डांबिस
ओ
In reply to ओ by केशवसुमार
खर तेच म्हणायचे
In reply to खर तेच म्हणायचे by धनंजय
खरवस
In reply to ओ by केशवसुमार
आँ! गाढव?
आवडले..
"दु:ख आहे