मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छोटे,मोठे तारे

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
छोटे,मोठे तारे . सुर्या किती रे गर्व करशील.... खरं आहे, प्रकाशमान आहेस तू!! मी तुझ्याच प्रकाशात बागडतो. तरी.. इथून काही योजनांवरून पाहा, तू ही छोटासा तारा दिसतोस! : : तू काय किंवा मी काय आपण फक्त मिणमिणतो.... रे तू जरा मोठा म्हणून जरा जास्त तेजःपुंज दिसतोस. इतकंच!! तेल संपलं की वात जाळत जाळत मी विझणार. तसाच तू ही.................. मी जरा लवकर संपेन!! तू थोडा जास्त तेवशील. एवढंच!! =========================== स्वती फडणीस .............................१०-०३-२००८

वाचने 2018 वाचनखूण प्रतिक्रिया 3

केशवसुमार Wed, 07/16/2008 - 23:37
स्वातीताई, तुमची ही कविता तितकी आवडली नाही पावले मध्ये होता तो पंच (मराठी प्रतिशब्द??) ह्या कवितेत जाणवला नाही (सपष्ट)केशवसुमार नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा स्वगतः केश्या स्वातीताईंनी तो अधीच वाचलायं #:S वेळच्या वेळी प्रतिसाद द्यायला काय धाड बडवते का? X(