( अजोबांची काठी )
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
'गुळाचा गणपती' या चित्रपटातील पं. भिमसेन जोशी यांनी गायलेले माझे अतिशय आवडते गाणे
' इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची '
त्याच चालीत पण एका वेगळ्या शब्दात मांडायचा प्रयत्न
-----------------------------------------------------------------------
अजोबांची काठी, घेऊन चालती
साथ देती काठी, संध्याछायी !!
अजोबांचा नातू, खेळतो काठिनं,
धावती उत्साहानं, मागे पुढे.!!
मागे पुढे दाटे आठवणींचा मेळ
कुटुंबाला आधार आजोबांचा !!
सोडुन राहिले पाश तेची सर्व
निवृत्ती- वेतन, आजीबाई !!
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची
ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - पं. भीमसेन जोशी
चित्रपट - गुळाचा गणपति (१९५३)
वाचने
4880
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
इंद्रायणी
In reply to इंद्रायणी by ईश्वरी
आपल्या
हम्म!
छान
केळकर