मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्ही श्रद्धास्थान कशास म्हणाल?

ऋषिकेश · · कौल

वाचने 1035 वाचनखूण प्रतिक्रिया 27

विसोबा खेचर 16/07/2008 - 18:00
माझं मत मी 'इतर'ला देऊ इच्छितो. परंतु मला ते ३ वाक्यात वगैरे शब्दात मांडता येत नाही! तर मला 'इतर' ह्या पर्यायाला मत द्यायचा अधिकार आहे का? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 16/07/2008 - 18:17
तर मला 'इतर' ह्या पर्यायाला मत द्यायचा अधिकार आहे का
:) द्या हो तात्या. मी ३ वाक्य म्हटलं कारण हे "इतर" इतकं धोकादायक आहे की या विषयावर दुसरा लेख होईल ;) तेव्हा ३ वाक्ये ही अट सहसा पाळावी पण नसेल जमणार तर "थोडक्यात" असे वाचावे :) -(थोडाथोडका) ऋषिकेश

विकास 16/07/2008 - 18:28
माझं मत मी, "बहुसंख्य लोकांची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - मग स्वतःची श्रद्धा नसली तरी चालेल" याला दिले. आपण जर लोकशाही पाळत असलो तर ती सर्वांना समान हवी. म्हणजे असे की माझा विरोध केवळ शिवाजीचा विडंबन अथवा व्यंगात्मक लिखाणासाठी उपयोग केला तरच नसेल तर महंमदाची कुचेष्टा अथवा ख्रिस्ताची कुचेष्टा केली तरी असेल. मग भले राजकीय दृष्ट्या आणि सामाजीक दृष्ट्या त्या धर्मांतील/समाजातील काही गोष्टींवर माझा आक्षेप असला तरी (जसा माझा माझ्या धर्मातील गैर गोष्टींवर पण आक्षेप असतो तसेच).

ब्रिटिश टिंग्या 16/07/2008 - 18:50
माझं मत "बहुसंख्य लोकांची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - मग स्वतःची श्रद्धा नसली तरी चालेल" यालाच दिलयं..... उदा : महंमद, ख्रिस्त, मन्ना डे इ.इ..... वरील व्यक्ती/स्थाने कोणा न कोणाची श्रद्धास्थाने असतील्.....माझी नाहीत! तरीदेखील या सर्वांना मी श्रद्धास्थान मानतो अन् यांचे विडंबन करण्याची गुस्ताखी माझ्याद्वारे झालेली नाही / होणार नाही याची ग्वाही देतो. असो, हे आमचं वैयक्तिक मत आहे अन् इतरांच्या मताबद्दल आम्हाला तेवढाच किंबहुना त्याहुन अधिक आदर आहे! -टिंग्या

धनंजय 16/07/2008 - 19:27
मीसुद्धा "इतर"ला मत दिले. पण लिहायला ३ वाक्ये माझ्यापाशी नाही. "माहीत नाही" असे स्पष्टीकरण चालेल का? स्पष्टीकरण पुढील ४ लांबलचक वाक्यांत : वाक्य १: माझी वागणूक बघता साधारणपणे ज्यात्या ठिकाणचे सरकार ज्याला श्रद्धास्थान म्हणते ते मी अर्थातच नोंदवून ठेवतो : सरकार म्हणजे उदाहरणार्थ मिसळपावावर तात्या, मंगेशाच्या देवळात मंगेश देवस्थान ट्रस्ट, इत्यादि. वाक्य २: सरकार नसलेल्या व्यक्तींची मतेही मी मनात कुठेतरी नोंदवून ठेवतो, मग ते बहुसंख्य असोत वा नसोत. वाक्य ३: हल्लीच "नास्तिक" या लेखामध्ये माझ्या हे लक्षात आणून दिले गेले, की आपल्या आदरणीय शिक्षकांबद्दल आपली जी भावना असते, तिला "श्रद्धा" म्हणतात (त्यांची सर्व मते आपल्याला पटोत न पटोत). वाक्य ४: मला खूप म्हणजे खूपच लोकांबद्दल आदर आहे (मला त्याच्याकडून काहीच शिकता येणार नाही असे कोण? असा विचार करता, मला पटकन कोणाचे उदाहरण आठवत नाही), त्या सर्वांनाच माझी श्रद्धास्थाने म्हणावे की काय असा माझा गोंधळ होतो आहे.

In reply to by धनंजय

प्रियाली 16/07/2008 - 19:35
मला खूप म्हणजे खूपच लोकांबद्दल आदर आहे (मला त्याच्याकडून काहीच शिकता येणार नाही असे कोण? असा विचार करता, मला पटकन कोणाचे उदाहरण आठवत नाही), त्या सर्वांनाच माझी श्रद्धास्थाने म्हणावे की काय असा माझा गोंधळ होतो आहे.
ज्या व्यक्ती*बद्दल मला आदर वाटतो अशा व्यक्तिला इतर लोक काही बोलले की माझा तोल सुटतो किंवा खर्‍याखोट्याची पर्वा न करता मला लोकांचा प्रतिवाद करावासा वाटतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आहे असे समजावे. इथे श्रद्धेसाठी व्यक्ती असणं गरजेचं नाही. जर तुमचे असे होत नसेल तर तुमच्या आदराची/ विश्वासाची/ धारणेची श्रद्धा झालेली नाही असे समजावे. श्रद्धाही ९९.९९% अंधश्रद्धाच असते असं मला वाटतं.

In reply to by प्रियाली

ऋषिकेश 16/07/2008 - 23:03
वा प्रियालीताई,
ज्या व्यक्ती*बद्दल मला आदर वाटतो अशा व्यक्तिला इतर लोक काही बोलले की माझा तोल सुटतो किंवा खर्‍याखोट्याची पर्वा न करता मला लोकांचा प्रतिवाद करावासा वाटतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आहे असे समजावे.
तुमच्या ही व्याख्या मला खूप आवडली. खूप 'नेमकी' म्हणावीशी वाटतेय -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 23:04
श्रद्धाही ९९.९९% अंधश्रद्धाच असते असं मला वाटतं. ती कशी काय? माझी माझ्या आईवर १०० टक्के श्रद्धा आहे. त्यातली ९९.९९% श्रद्धा ही अंधश्रद्धा कशी काय होऊ शकते? तात्या. -- वयाच्या सोळाव्या वर्षी मावळे जमवून स्वराज्य स्थापन करण्यापेक्षा त्याच माणसाचं नाव वापरून फालतू विडंबनं लिहीणं केव्हाही सोप्पं आणि त्याला दात विचकत वा वा, छान छान असे प्रतिसाद देंणं त्याहूनही सोप्पं! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 16/07/2008 - 23:09
ती कशी काय? माझी माझ्या आईवर १०० टक्के श्रद्धा आहे. त्यातली ९९.९९% श्रद्धा ही अंधश्रद्धा कशी काय होऊ शकते?
इथे अंधश्रद्धा म्हणजे वाईट अर्थाने नव्हे... तर डोळे झाकून केलेली श्रद्धा. विशेषतः आईवडिलांच्या बाबतच ती अधिक दिसून येते. आई-वडील वाईट वागले आणि ते खरे असले तरी आपल्याला त्यांच्याबाबत कोणी इतराने (घरातले काका, मामाच घ्या) बोललेले खपत नाही. आई-वडिलांची कान उघडणी करण्यापेक्षा आधी आपण त्या इतरांचं तोंड गप्प करतो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 23:19
इथे अंधश्रद्धा म्हणजे वाईट अर्थाने नव्हे... मग काय चांगल्या अर्थाने?? तर डोळे झाकून केलेली श्रद्धा. माझी माझ्या आईवर डोळस परंतु १००% श्रद्धा आहे असं मी म्हणतो. मग ती डोळे झाकून कशी काय?? की तरीही तुम्ही तिला 'डोळे झाकून' केलेली श्रद्धा म्हणाल? आई-वडील वाईट वागले आणि ते खरे असले तरी आपल्याला त्यांच्याबाबत कोणी इतराने (घरातले काका, मामाच घ्या) बोललेले खपत नाही. असंच काही नाही. मलाही काही वेळा माझ्या आईचं वागणं पटत नाही व काही वेळेला मी माझ्या मामाचीच बाजू घेतो. पण म्हणून माझी तिच्यावर ९९.९९टक्के एवढीच श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा आहे हे कसं काय? उलट 'मलाही काही वेळा माझ्या आईचं वागणं पटत नाही' असं जेव्हा मी जाहीरपणे म्हणतो हे डोळस श्रद्धेतून की अंधश्रद्धेतून?? आई-वडिलांची कान उघडणी करण्यापेक्षा आधी आपण त्या इतरांचं तोंड गप्प करतो. हे जनरलाईज्ड विधान आहे का? आणि तुम्ही म्हणता असं जर माझ्यासारखा एखादा मनुष्य करत नसेल तर मग तुम्ही त्याला डोळस श्रद्धा म्हणाल का? की तरीही ती ९९.९९% अंधश्रद्धा?? माझी भारतीय अभिजात संगीतावर १०० टक्के श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतूनच मी बसंतच्या लग्नाचे १३ भाग लिहिले आहेत हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे की श्रद्धेचे? टक्केवारी काय? सर्व प्रश्नांची उत्तरे अपेक्षित! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 16/07/2008 - 23:24
श्रद्धेबद्दल मी माझी व्याख्या सांगितली. ती तुम्हाला पटावी असे काही नाही.
मग काय चांगल्या अर्थाने??
नाही, सर्वसामान्य अर्थाने.
हे जनरलाईज्ड विधान आहे का?
असे आपल्याला का वाटावे? मी असे कोठेही म्हटलेले नाही. मी केवळ उदाहरण दिले. उदाहरण हे सर्वांनाच लागू असते असे नाही. अपवादात्मक परिस्थिती नेहमीच असते.
आणि तुम्ही म्हणता असं जर माझ्यासारखा एखादा मनुष्य करत नसेल तर मग तुम्ही त्याला डोळस श्रद्धा म्हणाल का? की तरीही ती ९९.९९% अंधश्रद्धा??
तर मी म्हणेन की त्या माणसाची श्रद्धा नाही. विश्वास असावा.
माझी भारतीय अभिजात संगीतावर १०० टक्के श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतूनच मी बसंतच्या लग्नाचे १३ भाग लिहिले आहेत हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे की श्रद्धेचे? टक्केवारी काय?
मला संगिताबद्दल काहीही कळत नाही त्यामुळे उत्तर देणे नाकारते.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/07/2008 - 23:39
श्रद्धेबद्दल मी माझी व्याख्या सांगितली. ती तुम्हाला पटावी असे काही नाही. मला ती पटलीच नाही म्हणून तर मी काही खुलासा विचारला! हे जनरलाईज्ड विधान आहे का? असे आपल्याला का वाटावे? मग हे कुठले विधान आहे हे कळेल का? उदाहरण हे सर्वांनाच लागू असते असे नाही. अपवादात्मक परिस्थिती नेहमीच असते. यू सेड इट! :) तर मी म्हणेन की त्या माणसाची श्रद्धा नाही. विश्वास असावा. का बरं? श्रद्धा का असू नये? की आपंण म्हणता त्या प्रमाणे फक्त श्रद्धा ही ९९.९९टक्के अंधश्रद्धा असू शकते? बरं मग बाय द वे, जशी आपण श्रद्धेच्या अन् अंधश्रद्धेच्या बाबतीत अनुक्रमे ००.०१% आणि ९९.९९% अशी आपली व्याख्या सांगितलीत तसं विश्वास आणि अविश्वासाच्या बाबतीत आपली टक्केवारी कळेल काय? मला संगिताबद्दल काहीही कळत नाही त्यामुळे उत्तर देणे नाकारते. धन्यवाद, मला माझं उत्तर मिळालं! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय 17/07/2008 - 00:32
"श्रद्धा" शब्दाने लोकांना वेगवेगळा अर्थ समजतो असे वरून दिसतेच आहे. इथे मी मात्र ते वेगवेगळे अर्थ काय याबद्दल गोंधळलो आहे. तात्यांनी स्वतःच्या मताबाबत कोड्याच्या स्वरूपात एकेक "हिंट" दिली आहे, पण त्यांचे मत अजून उलगडलेले नाही. १. आईबद्दल त्यांना १००% टक्के श्रद्धा आहे, पण आईचे वागणे १००% पटत नाही - इतकेच काय कधीकधी आईविरुद्ध मामाचीही बाजू घेतलेली आहे. म्हणजे पटणे/न पटणे, बाजू घेणे/न घेणे याचा श्रद्धेशी संबंध नाही. (थोडा तरी संबंध असता तर १००% चे कमी होऊन ९९.९% झाले असते.) २. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताबद्दल श्रद्धा आहे म्हणून बसंतचे लग्न लेखमाला लिहीत आहेत. ही लेखमाला फारच सुंदर आहे. इतकेच काय, रागरागिणी म्हणजे आपले आत्मीय नातेवाईक असल्याचा भास होतो. म्हणजे "आत्मीयता" किंवा "नातेवाइकांबद्दल जे प्रेम वाटते, तसेच प्रेम" याला तात्या श्रद्धा म्हणतात का? ३. डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे श्रद्धेचे प्रकार आहेत. पैकी तात्या डोळस श्रद्धा बाळगतात. ही जबरदस्त हिंट आहे, पण तरीही काही नीट समजलेली नाही. हिंदुस्तानी संगीताबद्दल अंधश्रद्धा असती तर लेखमालिका वेगळी लिहिली गेली असती का? डोळस श्रद्धेमुळे काही वेगळे उत्तम पैलू लेखांत उतरले आहेत का? जर श्रद्धा म्हणजे आईविषयी वाटणारी आत्मीयता असेल, तर ती डोळस आणि अंध कशी असते? [आईविषयी अंध श्रद्धा असती तर तिची चूक असली तरी आईच्या बाजूने मामाविरुद्धच भांडले असते, असा काही अर्थ आहे का?] या सगळ्यावरून माझा असा काही ग्रह होतो आहे की श्रद्धा म्हणजे (तात्यांसाठी) प्रेम/आत्मीयता/आदर असे काही असावे. आता तात्यांनी कोडे ताटकळत न ठेवता, अशा "हिंट" न देता, आपली व्याख्याच द्यावी. म्हणजे मला हासुद्धा अर्थ आत्मसात करता येईल.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/07/2008 - 00:58
तात्यांनी स्वतःच्या मताबाबत कोड्याच्या स्वरूपात एकेक "हिंट" दिली आहे, पण त्यांचे मत अजून उलगडलेले नाही. मी कुठलीही हिंट न देता माझं मत आईचं, गाण्याचं उदाहरण देऊन मांडायचा प्रयत्न केला आहे. आता आपल्याला ते न समजता आपण त्याला हिंट म्हणत आहात व अजून माझे मत आपल्याला उलगडलेले नाही याला माझा काय इलाज? कधी प्रत्यक्षात भेटा, किंवा फोन करा. पुन्हा एकदा समजवायचा प्रयत्न करीन! म्हणजे पटणे/न पटणे, बाजू घेणे/न घेणे याचा श्रद्धेशी संबंध नाही. नक्कीच नाही. उलटपक्षी याचा संबंध (म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मते चूक असली तरी केवळ आपली श्रद्धा आहे म्हणून ती गोष्ट बरोबर आहे असं म्हणणं. मी मामाच्या उदाहरणात तेच सांगितलं आहे.) श्रद्धेपेक्षा, अंधश्रद्धेशीच अधिक आहे! ही श्रद्धा नव्हेच! एखाद्याचं वर्तन चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा आणि त्या व्यक्तिवर श्रद्धा असणे हा वेगळा मुद्दा! या दोन गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न केला गेला (म्हणजे केवळ श्रद्धा आहे म्हणून चूकला बरोबर म्हणणे!) की तिथे अंधश्रद्धेचा जन्म होतो! म्हणजे "आत्मीयता" किंवा "नातेवाइकांबद्दल जे प्रेम वाटते, तसेच प्रेम" याला तात्या श्रद्धा म्हणतात का? तसं म्हणा हवं तर! माझ्या मते 'श्रद्धा' हा प्रकार इतका अथांग आणि अफाट आहे की तो कुठल्याही व्याख्येपलिकडचा आहे! शब्दातीत आहे. मला आधी एक सांगा धनंजयराव, तुमच्यावर तुमच्या आईचं जे प्रेम आहे ती तुम्हाला कुठल्या व्याख्येत बसवता येईल का? श्रद्धेवर आपण त्यानंतर बोलू! भगतसिंग ज्या प्रकारे हसत हसत फासावर गेले याची आपण काय कारणमिमांसा कराल हे आधी सांगा धन्याशेठ! श्रद्धेवर आपण त्यानंतर बोलू! या सगळ्यावरून माझा असा काही ग्रह होतो आहे की श्रद्धा म्हणजे (तात्यांसाठी) प्रेम/आत्मीयता/आदर असे काही असावे. नक्कीच! वर म्हटल्याप्रमाणे श्रद्धेला अनेक पैलू असतात. किंबहुना बर्‍याचदा तिची व्याख्या करणे शब्दातीत असते! तात्या.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/07/2008 - 01:11
आणि मुळात एक लक्षात घ्या धन्याशेठ, की मी श्रद्धेबद्दल कुठलीच व्याख्या केलेली नाही. मी फक्त प्रियालीने तिच्या श्रद्धा - माझी व्याख्या या प्रतिसादात श्रद्धेची "श्रद्धाही ९९.९९% अंधश्रद्धाच असते असं मला वाटतं" अशी जी व्याख्या केलेली आहे, तिला अनुसरून काही प्रतिसादात्मक लिहिले आहे इतकंच! तेव्हा श्रद्धेची व्याख्या मला विचारण्यापेक्षा तिच्या (कदाचित) exact (!) गणिती गुणोत्तरासकट अधिक विस्तृत खुलासा आपल्याला अन्यत्र मिळू शकेल असे वाटते! :) आजकाल श्रद्धेची, आणि तिच्यातल्या अंधश्रद्धेची निश्चित टक्केवारी उपलब्ध असताना आपण आता पुन्हा नव्याने मला श्रद्धेची व्याख्या विचारता आहात याचे नवल वाटले! असो..! आपला, (श्रद्धेची टक्केवारी अद्याप तरी मोजता न आलेला!) तात्या.

In reply to by प्रियाली

विकास 16/07/2008 - 23:50
ज्या व्यक्ती*बद्दल मला आदर वाटतो अशा व्यक्तिला इतर लोक काही बोलले की माझा तोल सुटतो किंवा खर्‍याखोट्याची पर्वा न करता मला लोकांचा प्रतिवाद करावासा वाटतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आहे असे समजावे. याचा अर्थ बर्‍याचदा "आत्मश्रद्धा" आणि "आत्मादर" (असा शब्द आहे का माहीत नाही, नसला तर आता तयार झाला..) असलेल्या व्यक्तींना आपण भेटतो अथवा संवाद साधतो असे वाटते... ;)

In reply to by विकास

प्रियाली 17/07/2008 - 00:23
याचा अर्थ बर्‍याचदा "आत्मश्रद्धा" आणि "आत्मादर" (असा शब्द आहे का माहीत नाही, नसला तर आता तयार झाला..) असलेल्या व्यक्तींना आपण भेटतो अथवा संवाद साधतो असे वाटते...
इतरांना भेटण्याची गरज नसावी, बरेचदा आरशात पाहून काम भागू शकेल असे वाटते. :)

In reply to by प्रियाली

विकास 17/07/2008 - 02:11
इतरांना भेटण्याची गरज नसावी, बरेचदा आरशात पाहून काम भागू शकेल असे वाटते. हे अनुभवाचे बोल वाटतं! :D

In reply to by विकास

प्रियाली 17/07/2008 - 02:54
दुसर्‍यांच्या अनुभवाचे. स्वानुभवाचे नाही बरं का! ;)

In reply to by प्रियाली

विकास 17/07/2008 - 03:24
दुसर्‍यांच्या अनुभवाचे. ~X( :? :SS जे स्वत: अनुभवले नाही पण तरी देखील ते 'खरे आहे असा' विश्वास ठेवणे याला अंधश्रद्धा म्हणतात अगदी १०० परशेंट ;) :T

In reply to by विकास

प्रियाली 17/07/2008 - 03:32
अंधश्रद्धा नाही! मी दुसर्‍यांना आरशात बघताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ;) आता बोला! :P

कोलबेर 16/07/2008 - 20:47
तुम्ही श्रद्धास्थान कशास म्हणाल?
श्रद्धास्थानाला! :) उदा. बहुसंख्य लोकांची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - मग स्वतःची श्रद्धा नसली तरी चालेल - बाकिच्यांचे श्रद्धास्थान म्हणतो बहुसंख्य लोकांची आणि स्वतःची श्रद्धा ज्यावर आहे त्याला - बहुसंख्यांचे श्रद्धास्थान म्हणतो फक्त माझी श्रद्धा आहे त्याला - फक्त माझे श्रद्धास्थान म्हणतो बाकी लोकांच्या कोणा एकाचीही श्रद्धा आहे त्याला - म्हणजे काय ते कळले नाही

In reply to by कोलबेर

ऋषिकेश 16/07/2008 - 23:05
बाकी लोकांच्या कोणा एकाचीही श्रद्धा आहे त्याला - म्हणजे काय ते कळले नाही
बहुसंख्यांचीच नव्हे, स्वतःची पण नव्हे तर कोणाही एकाची -('मिसळ'लेला) ऋषिकेश

llपुण्याचे पेशवेll 16/07/2008 - 23:57
कोणतीही श्रध्दा ही अनुभूतीशिवाय अंधच असते असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे ज्याची त्याची श्रध्दा ही त्याने अनुभूति वरूनच ठेवलेली आहे असे मला वाटते. उदाहरणार्थ. आण्णांचे गाणे ऐकल्याशिवाय त्यांच्या गाण्याबद्दलचा अस्तिक किंवा नास्तिक तयार होऊ शकत नाही. (श्रध्दाळू) पुण्याचे पेशवे. पण म्हणून इतर कोणाच्या श्रध्दास्थानाची मी खिल्ली उडवेन असे नव्हे. पण अशी अपेक्षा तर नक्कीच बाळगेन की माझ्या श्रध्दास्थानाची जाहीर खिल्ली कोणी उडवणार नाही. कोणी माझ्या श्रध्दास्थानाची खिल्ली उडवलेली मला आवडाणार नाही , पण तसे कोणी केलेच तर मी त्याच्या श्रध्दास्थानाची खिल्ली उडवून प्रत्युत्तर देईन. पण मी उडवलेली खिल्ली मनापासून असेलच असे नाही. (जशास तसे वाला)पुण्याचे पेशवे जशी इतरांची श्रध्दास्थाने आहेत तशी माझीही आहेत. त्याविषयी मी सतर्क आहे. जर कोणाला तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांची रुपके वापरल्याने राग आला असेल तर व्यासाना लंपट म्हटल्याचा राग का बरे नाही आला. केवळ ती तुमची श्रध्दास्थाने नाहीत म्हणून. मला तर कोणी तुकाराम महाराजांचा एकेरी उल्लेख केला तरी राग येतो. पण तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जाहीरपणे कोणी त्यांची निंदानालस्ती करेल तर मी ती सहन करणार नाही. पण त्याचा रुपक म्हणून वापर केला असेल तर ते न ओळखता किंवा लेखकाचा रोख न लक्षात घेता त्याने माझ्या श्रध्दास्थानावर हल्ला केला म्हणून मी गोंधळ नक्कीच घालणार नाही. ('मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास| कठीण वज्रास भेदू ऐसे' वाला 'अस्तिक') पुण्याचे पेशवे पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ब्रिटिश टिंग्या 17/07/2008 - 00:20
उत्तम प्रतिसाद! सर्व बाबींशी सहमत आहे! -टिंग्या