Skip to main content

स्टफ्ड चिकन ब्रेस्ट

लेखक गणपा यांनी गुरुवार, 23/08/2012 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, काय श्रावण सुटला की नाही अजुन? ज्यांनी सोडला असेल त्यांनी ही पाककृती करुन पहायला हरकत नाही आणि जे अनंतचतुर्द्शी पर्यंत थांबणार आहेत त्यांनी नुसती पहायला हरकत नाही. नेहमी त्याच प्रकारच चिकन खाऊन कंटाळलेल्या जीवांसाठी हा थोडासा बदल. कमी तिखट, चीज यांमुळे मुलांच्या आवडीचं तर पालेभाजी, पौष्टिक अळंबी मुलांच्या पोटत गेल्यामुळे 'पालक' पण खुश.

सर्वोच्च

लेखक जयनीत यांनी गुरुवार, 23/08/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्याफार यशाने एक मनुष्य हुरळून गेला. त्याला झाली ' ग ' ची बाधा. त्याची वर्तणूक आंतरबाह्य बदलली. लोक त्याला मग टाळू लागले. त्याने मनात विचार केला, जग माझ्या यशा वर जळू लागले. हळू हळू तो संपूर्णपणे एकाकी झाला. असंच कुठे तरी त्याने ऐकले. ' मनुष्य एकाकीच असतो यशाच्या सर्वोच्च शिखरावर ' आता त्याच्या मनात तो सर्वोच्च असल्या बद्दल कुठलीही शंका उरली नाही. अन तो हर्षवायुने मरून गेला. (समाप्त)

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास

लेखक gaikiakash यांनी गुरुवार, 23/08/2012 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार- काल २१ आगष्ट, बरोबर ८१ वर्षापूर्वी म्हणजे २१ आगष्ट १९३१ ह्या दिवशी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर निधन पावले. त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक लेख लॉस एन्जेलिस येथील श्री. शशीकांत पानट यांनी लिहिला आहे तो आपल्या वाचनार्थ येथे प्रसिध्द करीत आहे. ह्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भव्य कार्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे एव्हढाच उदेश्य! धन्यवाद, आकाश हा लेख येथे प्रकाशीत करण्यारिता श्री. शशीकांत पानट यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे. ----------------------------------------------------------------------------------------
पं.

स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 22/08/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांना नक्की काय हवे असते? हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. **** तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते.**** **** त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात... जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते.

लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 22/08/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोणी भापकर- एक लहानसे खेडेगाव, पुण्यापासून साधारण ६५ किमी दूर, मोरगावच्या पुढे जेमतेम ४ मैलांवर. गाव लहानसेच असले तरी मध्ययुगीन कालातली मंदिरे, प्राचीन अवशेष, वाडे हुडे, गढ्या आणि किल्ला असे ऐतिहासिक दृष्ट्या कमालीचे परिपूर्ण. कित्येक दिवस लोणी भापकरची मंदिरे आणि तिथल्या वीरगळांना भेट द्यायचा विचार चालूच होता. शेवटी एकदाचा बेत नक्की झाला. पुण्यात अत्रुप्त आत्म्याच्या घरापाशी भेटून त्याच्या गाडीने मी, ५० फक्त आणि आत्मा असे तिघेजण निघालो. वाटेत हडपसरला सूडला घेतले आणि पुढे मार्गक्रमण चालू केले. सासवडपर्यंत धूम धूम कोसळणारा पाऊस जेजुरीपाशी येईतो प्रायः थांबला होता.

मसाला आप्पे

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 22/08/2012 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
खास मिपाकर मोदकाची कॉपीराईट असलेली पाककृती इथे देत आहे ती पण त्याच्या परवानगीनेच हो ;) साहित्यः १ वाटी उडदाची डाळ ३ वाट्या तांदूळ + १ छोटा चमचा मेथीदाणे वरील साहित्य वेग-वेगळे रात्रभर भिजवणे.

राज ठाकरे यांचा विराट मोर्चा व सभा

लेखक तिमा यांनी मंगळवार, 21/08/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरे यांनी आज एक अभूतपूर्व असा प्रकार करुन दाखवला आहे. त्यांचा मोर्चा व त्यानंतर झालेली सभा ही खरोखरच विराट होती. मोर्चाआधीच, त्याबद्दल शंकाकुशंका काढणार्‍या नतद्रष्ट प्रवृत्तींना, त्यांनी जे भाषण केले त्यांत, खणखणीत उत्तर दिले आहे. ११ ऑगस्टला झालेला प्रकार हा सगळ्याच देशप्रेमी माणसांना अस्वस्थ करुन सोडणारा होता. आणि त्यावर शासनाचा नाकर्तेपणा हा तर, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. पोलिसही झाल्या प्रकाराने नाराज झाले होतेच. आजच्या या यशस्वी दणकेबाज उत्तरानंतर शासनाची सुस्ती थोडी उतरेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. राज ठाकरे यांच्यावर मी अनेकदा टीका केली आहे.