Skip to main content

चंद्र-कळा

लेखक पेशवा
गुरुवार, 02/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र फुलांचे हार गळा रात्र सजविशी अंग-कळा || धृ. || धुंद धुंद मन, बहर-बंध तन स्पर्श रेशमी, घुसमटतो घन छेड काढता, लटक्या रागे म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ || देह उमलले, मिठीत रमले श्वास केतकी, गुंफून पडले रात्री मधुनी, कळीकाळाच्या रंगला हा रास खुळा || २ || एकतनूता, एकतानता, द्वैत मिटले, दोघांकरता आसक्तीच्या मैफिलीत ह्या जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ || -पूर्वप्रकाशित
लेखनविषय:

वाचने 1967
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

एकतनूता, एकतानता, द्वैत मिटले, दोघांकरता आसक्तीच्या मैफिलीत ह्या जीव भोगे ब्रह्म-कळा लव्हली!! देहाहुनही मुक्त भावना शरणागत बापुडी...

बहुदा पहिलीच कळण्यासारखी कविता. म्हणून विशेष कौतुक वाटले :)