सुपर३०. ( एक आगळा वेगळा प्रयोग).
रोज वर्तमान पत्र वाचण्यासाठी घेवो अथवा एखाद्या वृत्तवाहिनीचे दर्शन घेवो, भ्रष्टाचार आणि तोही उच्चपदस्थाचा पाहिला की जीव वैतागतो, मनात विचार येतो की या लोकांना इतके कोट्यावधी रुपयांची संपन्नता असताना परत हजारो कोटीची घोटाळा करताना का मी करीत आहे आणि कधी मी थांबणार असा विचार का बरे मनात येत नाही बरे?
अश्या विचारांच्या काहिलीत असतांना सुपर३० नावाच्या संस्थेची माहिती मिळाली आणि उन्हात शितळतेचा अनुभव आला.
सुपर३० ही संस्था पटना येथे आनंद कुमार नावाचे गृहस्थ चालवतात.
मिसळपाव
पुस्तकाचे नावः प्रे (सावज)
मूळ लेखकः मायकल क्रायटन
अनुवादकः प्रमोद जोगळेकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु. ३००/-
मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये.
जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.