Skip to main content

--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न

लेखक शकु गोवेकर यांनी गुरुवार, 09/08/2012 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
--म्हणजे काय ? व त्याची माहिती व काही प्रश्न १)परवा माझ्या वाचनात आले की श्री.कि.बा. उर्फ अण्णा हजारे यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले की माझी टीम बरखास्त झालि व आमचा राजकारणात येण्याचा विचार आहे माझा प्रश्न असा आहे की ब्लोग म्हणजे काय ? याला मराठी प्रतिशब्द काय ?

पावसाळ्यातलं भंडारदरा

लेखक उदय के'सागर यांनी गुरुवार, 09/08/2012 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक साधी, छोटी सहल ज्यातून पावसाचा आनंद मिळावा आणि रोजच्या त्या रटाळ कामातून थोडा 'चेंज'/आराम मिळावा ह्या असल्या अगदी माफक हेतूने आम्ही काही मित्र मागच्या विकांताला भंडारदराला गेलो आणि प्रवासाच्या सुरवातीपासून (नाशिक-भंडारदरा) ते शेवटापर्यंत निसर्गाने जे काहि त्याचे मनोहारी रुप दाखवले, जी काही करमणूक केली... अहाहा.. त्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत.. हेच वर्णन फोटोतून करावे हा एक प्रयत्न. केवळ प्रयत्नच कारण फोटोंपेक्षा प्रत्यक्ष ते अनुभवणे ह्यात अर्थात खूपच फरक आहे...

लबाड कान्हा .. खट्याळ कान्हा ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 09/08/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
खोड्या करुनी दंगा करुनी गोपगड्यांना खेळवतो - लबाड कान्हा खट्याळ कान्हा यशोदामाईला पळवतो - क्षण शिक्षेचा गोळा लोण्याचा डोळ्यासमोर वितळतो ! हसणे विसरता रुसून बसता आनंद माईचा मावळतो - मुख उघडोनी विश्व दावूनी यशोदामायेला 'माया'ळतो , यशोदामाता जवळी घेता पदरामध्ये विरघळतो !

द विनर टेक्स इट ऑल........

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/08/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
द विनर टेक्स इट ऑल........ काही गाणी जगावेगळीच असतात. त्यातलं नक्की काय आवडतं ते नक्की सांगता येत नाही. पण ती आतमधे कुठेतरी थेट भिडतात . हे गाणं ही त्यातलच एक . ७० आणि ८० च्या दशकात स्वीडीश ग्रुप " ABBA " खूप गाजत होता त्यांची गाणी मेलडी आणि हार्मनी यांचे एक मजेदार मिश्रण असायची. Björn Ulvaeus आणि Benny Andersson यानी लिहीलेले Agnetha Fältskog ही गायलेले. खरतंर ही एका विभक्त होत असलेल्या जोडप्याची कहाणी. गाणे जेंव्हा लिहीले गेले तेंव्हा Björn Ulvaeus आणि Agnetha Fältskog हे दोघेही याच अवस्थेतुन जात होते.

ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.

लेखक मोदक यांनी गुरुवार, 09/08/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण. "ऑलंपीक" हा शब्द जरी उच्चारला किंवा कानावर आला की खालच्या घटना डोळ्यासमोरून स्लाईड शो प्रमाणे झरझर सरकू लागतात, काळ वेळ ठिकाण सर्व विसरून!! १) डेरेक रेडमंड - १९९२ बार्सिलोना ऑलंपीक. ४०० मीटर धावण्याची सेमी फायनल सुरू झाली.. पूर्ण भरात असलेल्या डेरेक रेडमंड ने भन्नाट सुरूवात केली.. अर्धे अंतर पार केले न केले तोच त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. होणार्‍या वेदनांमुळे रेडमंड ट्रॅकवरच कोसळला. बाकीचे स्पर्धक पुढे निघून गेलेच होते. ऑलंपीकचे स्वप्न भंगल्याचे दु:ख इतके तीव्रपणे जाणवले की रेडमंड हमसून हमसून रडू लागला.

आचार्य बाळकृष्ण आणि इतर थोर राष्ट्रपुरुष आता एकाच रांगेत..!

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 09/08/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशाबाहेरील काळा पैसा, भ्रष्टाचार या विषयांकरता बाबा रामदेवांचे आजपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे.. मैदानात ठिकठिकाणी त्या संदर्भातील फलक लागले आहेत. त्यातील एका फलकावर भगवान श्रीकृष्ण, सीतामाई, म.

केळ्यांचे वेफर/माहीती

लेखक इरसाल यांनी बुधवार, 08/08/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
मसु. ही पाकृ माझी नाही. सध्या केरळात पडिक असल्याने रोजचा भर मसाला डोसा, वडा सांबार, इडली चटनी, टिपीकल केरळा राइस (जाडा सफेद), मासे यांवर अधिक आहे. मी रहातो तिथे रस्त्यापलिकडे सुपर बेकरी आहे.मी त्याच्याकडुनच केळ्याचे वेफर किंवा तिखट शेंगदाणे घेत असतो.

Munich Massacre...

लेखक मोदक यांनी बुधवार, 08/08/2012 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
3

आनंद सागर - शेगाव लई भारी...

लेखक सौरभ उप्स यांनी बुधवार, 08/08/2012 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
नागपूरला काही कामासाठी जायचे ठरले घरच्यांचे, १ दिवसाचं काम होत फक्त पण त्यासाठी २-३ दिवस तरी सुट्टी घ्यावी लागणार होती जाताना मधेच शेगाव लागणार होत, खूप वर्षांनी सगळ्या घरच्यांचं एकमत झाल कि २ दिवस जास्त सुट्टी घेऊन शेगाव दर्शन करायचच यावेळी... प्लान ठरला आणि बुकिंगही आरामात झाल अगदी.... मंदिराच्या आवारात ५ इमारती आहेत भक्त निवासासाठी पण तो दिवस रविवार असल्याने बुकिंगही फुल आणि गर्दीही खूप... खूप चौकशी केल्यावर कळाल कि तिकडे आनंद विहार म्हणून अजून एक भक्त निवास स्थान आहे भक्तांसाठी खास, मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानापेक्षा हे खूपच सही आहे.. उत्तम स्वच्छता आणि मनापासून करणारे काम(सेवा)

विलासराव देशमूख

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 07/08/2012 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले. मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो. विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता.