अजि म्यां ब्रह्म ऐकिले........
पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :
शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.
प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती.
मिसळपाव