Skip to main content

माहितीचा अधिकार - एक अनुभव.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 05/08/2012 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
माहितीचा अधिकार महाराष्ट्रात लागु झाला आणि महाराष्ट्रातील सरकारी आणि निमशासकीय कार्यालयातील बरीच माहिती अर्ज करणार्‍याला मिळवता येऊ लागली. माहितीच्या अधिकाराचा वापर आणि त्याच्या अधिक-उणेच्या गोष्टी अनेकदा चर्चिल्या जातात. माहितीच्या अधिकारात अनेक बदल होत गेले आणि दीडशे शब्दांची मर्यादा माहिती मागविण्याच्या बाबतीत आली अशा अनेक गोष्टी माहिती अधिकार कायद्याच्या बाबत घडत आहेत. माहिती अधिकार कायद्याचा आत्तापर्यंत मी तीन वेळेस उपयोग केला आहे. अपिलिय अधिका-यापर्यंत दोनदा प्रकरणं घेऊन जावी लागली. तिस-या प्रकरणातही अपील करावे लागणार आहे. काय आहे, तिसरं प्रकरण.

" मैत्री - "

लेखक विदेश यांनी शनिवार, 04/08/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
. संकटकाळी हात देशील अडचणीत मदत घेशील - चहाडी चुगली कानावर हात मैत्रीत नसते जातपात ! मैत्रीला लागत नाही कात्री असते मैत्रीत पक्की खात्री - मित्रात जेव्हां अतूट मैत्री विश्वासाची पक्की खात्री ! उपकार होतील खूप तुझे देवा, एकच मागणे माझे - एकच मित्र असा मिळावा कृष्ण-सुदामा आदर्श रहावा ! .
काव्यरस

फंडामेंटल विश्लेषण

लेखक सदानंद ठाकूर यांनी शनिवार, 04/08/2012 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
फंडामेंटल विश्लेषण फंडामेंटल विश्लेषण म्हणजे काय? फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही.

भारतीय किती करंटे?

लेखक अभिज्ञ यांनी शनिवार, 04/08/2012 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा ऒगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला अन भारताच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. शेकडो राज्ये, संस्थाने, जमाती, भाषा, संस्कृती,जाती, धर्म.....वगैरे वगैरे ह्यांच्यात गुरुफ़टलेल्या भारताचे कळत नकळत का होईना ब्रिटिश काळात एकप्रकारचे CONGLOMERISATION झाले. अन १५ ऒगस्ट ला एक ब-यापैकी एकसंध भारत जन्माला आला. जस जसा काळ सरत गेला तस तशी भारतात एकसंधता येत गेली. भाषावार प्रांत रचना ,एकच चलन, काश्मीर काहि अंशी वगळता आंतर्देशीय स्थलांतर, व्यापार हा नवीन स्वरूपात विकसित होत गेला. भारतातल्या कुठल्याही भागात लोकांना स्थावर मालमत्ता खरेदी करता येउ लागली. उद्योगांची वाढ झाली.

धाव रे धाव देवा आता

लेखक निश यांनी शनिवार, 04/08/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
धाव रे धाव देवा आता गाढ निद्रासुख सोडुन जागा हो आता. तुझ्या न येण्याने इथे पडतो रे खुप फरक मानवानेच केला आहे उभा इथे खरा नरक. खुन, दरोडे, बलात्कार, लाचखोरीने गाठला आहे कळस आता तरी सत्वर ये सोडुन दे रे तुझा आळस. माणसापेक्षा प्राणी बरे, मुके असतील तरी ईमानी असतात खरे. माणसातले श्वापद मात्र माणसावरच धाड अहोरात्र घालतात का रे? करु नकोस उशीर, घे पापविनाशा जन्म पुन्हा, तुझी वाट पाहुन सुकला बघ ह्या धरणी मातेचा रे पान्हा. ये धाऊन सत्वरी करण्या दुष्टांस शिक्षा दे आम्हाला आता तुझ्या उपकारांची जीवन भिक्षा. धाव रे धाव देवा आता.

तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है !

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 04/08/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्‍याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं. तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती.

प्रतिभाताईंचा नवा प्रताप !

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 04/08/2012 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सुमार (आणि मुख्यतः वाईट कारणानेच प्रसिद्धी मिळालेल्या) कारकीर्दीकरता प्रसिद्ध असणार्‍या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नवा पराक्रम. राष्ट्रपतीपदावर असताना मिळालेल्या अनेक बहुमोल भेटवस्तू त्यांनी निघताना बरोबर नेल्या आणि त्या आता अमरावतीला आहेत. हे शिष्टाचाराला धरुन नाही असे तज्ञांचे मत आहे. राष्ट्रपती असताना मिळालेल्या भेटवस्तू ह्या राष्ट्रपती भवनात ठेवायचा संकेत आहे. अर्थात तो इथे धाब्यावर बसवला गेला आहे.

नारळी भात (नारळी पोर्णिमेचा खास मेनु)

लेखक Pearl यांनी शनिवार, 04/08/2012 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे इतके छान छान सण आहेत आणि प्रत्येक सणाचा काही खास मेनू अगदी ठरलेला असतो. नुकतीच नारळी पोर्णिमा येऊन गेली. नारळी भात केला होता. एकदम मस्त झाला होता. तशी सोपी आहे रेसिपी. नक्की करून पहा. साहित्यः १ वाटी तांदूळ, २ वाट्या चिरलेला गूळ, १ वाटी किसलेले ओले खोबरे, ५-६ काजूचे तुकडे, १५-२० बेदाणे, केशराच्या काड्या (ऑप्शनल), ३ वाट्या पाणी, ५-६ चमचे तूप, ४ लवंगा कृती: १) तांदूळ धुवून ५-१० मिनिटे निथळत ठेवा. एका गॅसवर ३ वाट्या पाणी गरम करत ठेवा. २) एका पॅनमध्ये तूप घेऊन गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात लवंगा घाला. लवंगा चांगल्या तळल्या गेल्या काजू, बेदाणे, केशराच्या चुरलेल्या काड्या घाला.

बायकांचे करिअर !!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 04/08/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नास टक्क्याचे आरक्षण हा विषय कधी सुरु झाला हे मला माहिती नाही. कदाचित खुप जुना असेल. पण जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा समजला. पण वैयक्तिक मी माझ्या साठी माझ्या कंपनी मध्ये हा निर्णय खुप आधी म्हणजे हा निर्णय ऐरणीवर येण्या आधी करून टाकला होता. हा निर्णय सामाजिक बांधिलकी मधून वगैरे अजिबात आला नव्हता, हे कबुल करतो. व्यवसायाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी, मुलांबरोबर काही मुली मुलाखतीला आल्या. तुलनेने चांगल्या म्हणजे सबंधित कामासाठी आवश्यक सर्व गुण असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याना संधी मिळाली. काम उत्तम करू लागल्या. आणखी काही मुली कंपनी मध्ये आल्या. मुले ही आली.