Skip to main content

ऑलिंपिक - २०१२

लेखक ऑलिंपिक २०१२ यांनी बुधवार, 01/08/2012 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली तिथपासुनचा प्रवास २०१२ ला लंडन पर्यंत येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धेत एकुण भारताच्या वाट्याला नऊ सुवर्ण पदकं आली आहेत. हॉकीत आठ आणि मागील वर्षी अभिनव बिंद्राला मिळालेले एक पदक अशी आपली वाटचाल आहे. आता २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत पुन्हा एकदा दमदारपणे उतरला आहे. भारतासहित विविध देशाचे स्पर्धक विविध खेळांमधे आपले कसब दाखवणार आहेत.

सौंदर्यलहरी - कल्याणी विशेषांकातील उतारा

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/08/2012 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. विश्वास भिडे यांच्या एकोहम या ब्लॉगवरती "आदि शंकराचार्यांवरचा कल्याणी विशेषांक" वाचत होते. "सौंदर्यलहरी" या रचनेचे रसग्रहण वाचतेवेळी फार सुरेख उपमा वाचनात आल्या. डॉ प्रमोद ग लाळे यांनी हे रसग्रहण केले आहे. मी केवळ त्या रसग्रहणातील काही भाग मिपाकरांकरता जसाच्यातसा येथे उधृत करत आहे. संपादकांना अयोग्य वाटल्यास हा धागा उडवावा. ____________________________________________________ सुंदर शब्दरचनेबरोबरच सर्व श्लोकांत शांत, शृंगार, करुण, अद्भुत यांचे सौंदर्यलहरी माहेरघरच आहे. या स्तोत्रात ओज आहे कारण ते पराशक्तीचे वर्णन आहे.

तीन हायकू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 01/08/2012 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाऊस धारा पडती हाती गारा ओंजळ रिती २. कुटील कावा मनांत रंगवावा देवळात मी ३. नाच मोराचा हैदोस पावसाचा माझी समाधी

शब्दसावल्या

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 01/08/2012 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आलाबाई एकदाचा पाऊस तुझा,... सैरभैर एकांत माझा,.. झिंगल्या वाटेत सयी सावळ्या- थेंबाथेंबात डोलु लागल्या बाहुल्या श्वास रुंदावले गोत नादावले पावलो पावली चाहुली पावल्या,.. साचलेले तळे जाहले मोकळे- अंगणी सांडल्या मुक्त शब्दसावल्या ...............अज्ञात
काव्यरस

गुबगुबीत कुशन, गुलाबी रंग, आरसा..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील एका लोकल गाडीमध्ये काही सुखावणारे बदल केले आहेत. सदर लोकलमधील दुसर्‍या वर्गातही आता कडक लाकडी बाके जाऊन छान छान मऊ मऊ कुशन असलेली बाकडे बसवली आहेत. आर्थिक परिस्थिती नसली तरी दुसर्‍या वर्गातील लोकांनाही पहिल्या वर्गातील लोकांप्रमाणे पार्श्वभाग असतो आणि कुशनवाल्या बाकड्यांमुळे तो सुखावू शकतो, हे रेल्वे व्यवस्थापनाला जाणवले हे फार बरे झाले.. :) त्याचप्रमाणे महिलांच्या डब्यात आता आरसे बसवण्यात आले आहेत.

पथकर (टोल) वसुली मुळातच घटनाबाह्य..!

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पथकराविरोधात आंदोलन केले. आमचे या संदर्भात असे मत आहे की सध्या आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून परस्पर जी पथकरवसुली केली जात आहे ती हे मुळातच घटनाबाह्य आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम २६५ व २६६ मध्ये याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. कलम २६५ प्रमाणे कोणताही कर हा केवळ सरकारलाच वसूल करण्याचा अधिकार आहे. सदर पथकर हा आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून वसूल होत असल्यामुळे कलम २६५ ची पायमल्ली होत आहे. कलम २६६ प्रमाणे, सदर गोळा झालेला कर हा प्रथमत: 'कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया' ह्या शीर्षकांतर्भूत खात्यातच जमा झाला पाहिजे.

शेतकरी आत्महत्या : संशोधनातील एक अनुभव

लेखक Kavita Mahajan यांनी बुधवार, 01/08/2012 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही विषय लिहायचे राहून जातात. विदर्भात होणार्‍या शेतकरी आत्महत्यांबाबत मी एक अभ्यास टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसाठी केला होता. सोबत अंजली पवार ही कार्यकर्ती मैत्रीण होती. ज्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍यांच्या विधवांची सद्य:स्थिती, असा विषय होता. सुमारे ७५ डिप केसस्टडीज केल्या. या अभ्यासात आम्ही विदर्भातले ५ जिल्हे खेडोपाडी विभागून फिरलो. दोघी एकेकट्या फिरत होतो. यात काही अत्यंत विपरित अनुभव वाट्याला आले. आज त्यापैकी एक सांगते आहे. काही भागांत आत्महत्यांचे प्रमाण खूपच जास्त होते. एकेका लहानशा गावात १२ ते १६ आत्महत्या झालेल्या होत्या.

लोकपालचा घटनासंमत प्रवास..

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने आणलेले लोकपाल विधेयक हे संसदेच्या लोकसभेच्या सभागृहात बहुमताने मंजूर झाले. त्यानंतर ते मंजुरीकरता राज्यसभेत गेले. तिथे त्यावर बर्‍याच सुधारणा सुचवण्यात आल्या व ते विधेयक राज्यसभेच्या निवड समितीमध्ये गेले. सदर विधेयकाला संसदेत असलेल्या सर्व राजकीय पक्षांना त्यांना योग्य वाटतील अशा शिफारशी सुचवण्याचा अधिकार आहे.