Skip to main content

रक्षाबंधन.. रक्षाबंधन ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/08/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
. रक्षाबंधन... रक्षाबंधन दोन मनांची अतूट गुंफण ! हिरा भाऊ अन् बहीण अंगठी अंगठीस हो सुरेख कोंदण ! मदतीस्तव वा संकटातही धावे बंधू करण्या रक्षण ! भावाचा बहिणीस आधार द्रौपदीसखा तो नारायण ! दुजाभाव ना मनांत कोठे दोघांचे ते एकच रिंगण ! रक्षाबंधन ... रक्षाबंधन दोन जिवांचे अतूट बंधन ! .
काव्यरस

वाचने 1596
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया