एकदम सोपी, अगदी आयत्या वेळी ठरवून करता येण्यासारखी ही रवा इडली:
साहित्य-
२ वाट्या रवा, १ वाटी दही, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा
कृती-
तेलावर रवा हलका भाजून घ्या, रंग बदलू देऊ नका.
दही घुसळून घ्या.
रवा कोमट झाला की त्यात दही व मीठ घाला ,पाणी घाला. रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी घालताना थोडे जास्त राहू द्या.