मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेमके काय चुकते आहे?

vikramaditya · · काथ्याकूट
मिपावर विविध विषयांवर चर्चा होत असते. अशाच एका वेगळ्या विषयावरील हा धागा. दररोज बातमीपत्रात येण्यार्‍या व्यवसाय जगतातील बातम्‍या वाचताना एक बाब लक्षात येते कि बहुराष्ट्रीय अथवा भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते. कृपया लक्षात घ्या कि इथे कर्तुत्व किंवा आर्थिक यश हा विषय नसुन एखाद्या फ़ार मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये अती उच्च पदावर पोहोचण्यासाठी लागणारे "खास कौशल्य" मराठी माणसाकडे कमी पडते आहे का, असा प्रश्न आहे. "मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा तर ह्या आड येत नाही ना? विक्रम पंडीत व काही सन्माननीय अपवाद वगळता,बहुराष्ट्रीय कंपन्या, भारतीय बॅंका, पीसयु वगैरे मध्ये एका विशिष्ट पातळीच्यावर ही ऊणीव भासते. बुद्धीमत्ता, विषयाचे सखोल ज्ञान ह्यात मराठी माणुस अजीबात कमी पडत नाही. स्वतंत्र व्ययसायात देखील मराठी माणसांनी जगभरात चांगले आर्थिक यश मिळवले आहे. पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा. ह्याचा अर्थ इतर लोक कमी कर्तुत्ववान आहेत असा नव्हे. पण नेमके काय चुकते आहे?

वाचने 19356 वाचनखूण प्रतिक्रिया 26

अभिजित - १ Tue, 05/20/2014 - 23:30
पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा. ह्याचा अर्थ इतर लोक कमी कर्तुत्ववान आहेत असा नव्हे. पण नेमके काय चुकते आहे? --------------------------------------------------------------------- पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा.

सुनील Wed, 05/21/2014 - 09:31
शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांत, मार्मिकमध्ये "वाचा आणि थंड बसा" ह्या शीर्षर्काखाली, मुंबईतील विविध आस्थापनांतील अमराठी अधिकार्‍यांची यादी प्रसिद्ध होत असे, त्याची आठवण झाली! ;)

पगला गजोधर Wed, 05/21/2014 - 10:26
विक्रमादित्या, चर्चेमागचा विचार खरंच आवडला, पण असं येथील (राज्यातील) काही लोकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेऊ नकोस रे बाबा. पण दुसर्या हाताला, तुझंही बरोबरच आहे, योग्य मार्गदर्शन व नियोजनबद्ध सातत्यपूर्ण प्रयत्न करून निवडणूक काम्पेन लढवली, तर जनतेच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान होता येते, हे साहेबांना माहिती नव्हते का ? मग कुठे कमी पडले हे (नेहमीप्रमाणे) ? मला वाटते उद्योजगता (Entrepreneurship) कमी पडते का ? आता उद्योजगता म्हटले कि बाकरवडी, टूथपेस्ट, पंप असली उदाहरणे कोणी देईल (त्यांच्यापरीने ते बरोबरही असतील ), पण उद्योजगता म्हणजे, मला म्हणायचे कि इस्ट इंडिया कंपनी, व्यापारी cum राज्यकर्ते, असा काही … चू भू दे घे . उदा पेशवाईत जर आपण (आपण सर्व १८ पगड जमाती सकट), जर दिल्लीचे तख्त फोडू शकतो , तर आपल्याकडे राखू का शकत नाही ? (मोगलांना जशी भारतीय उपखंडात open acceptability होती, कारभारी म्हणून, तशी आपल्याला का करता आली नाही ? किंवा कुठे कमी पडलो ?) , मला वैयक्तिक, शिवाजी महाराज(फक्त) व थोरला बाजीराव(फक्त) हे दोघेच दिसतात कि ज्यांच्याकडे सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन ध्येय सध्या करण्याची क्षमता होती (Entrepreneurship) व सर्वा (सर्व जाती, जमाती, धर्म ) लोकात acceptability होती.

In reply to by पगला गजोधर

मदनबाण Wed, 05/21/2014 - 11:11
अरे पगले गजोधरवा... तोहार बिचार पढके हमका इ लग रहा है की तूम सठीया गये हो, और अनशन बके जा रहे हो,बचपन मे का सरपे गिरे थे का ? इक बात बताव हमका... तोहार मेन प्राब्ल्रमवा का है ? अपचन हुइ गवा का ? तोहार मोदी आसिडीटी देखन के बाद अब इ कौनो नई परेसानी तोहार को तकलिफ दे रही है ?... जरा बताव हमका. अब हम तोहार वास्ते कुछ उदाहरण देने की चेष्टा करता हुं... जरा अपना पागलपन संभालके पढने का कष्ट जरुर करना, बात पचे नही तो... इनो देने के वास्ते यहा लोक स्टाक लेहे बैठे है भाई,दो-चार पुडीया तोका फोकट मे दे देंगे,पगलों से चार्ज ले ने का अब तक कोइ बिचार तय हुवा नही है ! १} विक्रम पंडित २} धनंजय दातार इ तो सिर्फ २ उदाहरण दिये हे... हमार नजरम तो तूम पेहेले ही आ चुके हो... ध्यान रखना अपने पगलेपन का. {मदन कुंजबिहारी } ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी Wed, 05/21/2014 - 23:53
ही उदाहरणंच मूळ लेखात म्हट्ल्याप्रमाणे बोटावर मोजण्याइतकी आहेत. त्या पलीकडे काय, असा प्रश्न आहे असं वाटतंय.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मदनबाण गुरुवार, 05/22/2014 - 06:42
ओ भाऊ, तुम्ही मराठीत लिहा ना !! विमे ? अच्छा. ओक्के. मला वाटल मी असे प्रतिसाद देत सुटलोय हे "ज्यांना" "जे" समजायचे असेल "त्यांना" "ते" समजले असेल ! ठीक आहे मी थांबतो आता... जाता-जाता :-

चिरोटा Wed, 05/21/2014 - 12:26
भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते.
आपण कोणाबरोबर तुलना करताय त्यावर अवलंबून आहे.उ.दा. दाक्षिणात्य लोकांबरोबर तुलना करायची तर आपण चार राज्यांतील लोकांबरोबर तुलना करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.(म्हणजे महाराष्ट्र(११ कोटी) व दक्षिणेतली एकूण लोकसंख्या(२५ कोटी).). प्.बंगाल बरोबर तुलना करायची तर बंगाली,मराठी उच्च पदांवर थोड्याफार प्रमाणात सारखेच दिसतात. लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर तामिळनाडू,केरळ मधील लोकांमध्ये उच्चपदांवर असणार्‍यांची संख्या महाराष्ट्राच्या/ईतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.यात मराठी माणूस कमी पडतो आहे असे मला वाटत नाही. ह्या राज्यांतील लोक ब्रिटिश काळापासून नोकरी धंद्यासाठी बाहेर जात.त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही नोकरी टिकवणे,कोणासमोर कधी/काय बोलायचे ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात उपजत असतात.
पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा
ह्यात व्यक्तिगत महत्वाकांक्षा महत्वाची असते असे मला वाटते.भांडून तडकाफडकी राजिनामा देऊन जाणारे तामिळ,मल्लु पाहिले आहेत व बॉसच्या अखंड मागे लागून नोकरीत असणारे मराठीही पाहिले आहेत.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य गुरुवार, 05/22/2014 - 08:36
एक मराठी माणुस दुसर्या मराठी माणसाला वर गेलेला बघू शकत नाही पण त्याना अमराठी व्यक्ती मात्र कुल वाटते. जिथे मराठी लोक हुच्च पदावर आहेत तेथील विदा गोळा करा लक्षात येइल स्वत: करतूत्व वान मराठी असुनही यांची भिस्त अमराठी लोकांवर जास्त आहे की मराठी लोकांवर... यातच सर्व आले.

पगला गजोधर गुरुवार, 05/22/2014 - 09:50
येत्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारात किती स्टार-मराठी-प्रचारकांवर भिस्त ठेऊन हि निवडणूक लढवली जाईल, हे पाहणे मनोरंजक ठरेल, का आता इथे सुद्धा गुजराती ढोकलो अने फाफडो ?

समर्पक Fri, 05/23/2014 - 19:43
समजा, तुमच्याकडे हे सगळं आहे, किंवा आलं, तर पुढे? आम्हाला सगळंच हवं आणि आम्हालाच सगळं हवं हे असे विचार आणि फुकाचे प्रादेशिक अत्याभिमान/न्यूनगंड नष्ट होतील तो देशाचा सुदिन...

म्हैस Fri, 06/06/2014 - 15:13
एक मराठी माणुस दुसर्या मराठी माणसाला वर गेलेला बघू शकत नाही पण त्याना अमराठी व्यक्ती मात्र कुल वाटते.
"मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा
हि पुस्तकी वाक्य अहेत. प्रत्यक्षात फार नगण्य प्रमाणात हे घडतं . माझ्या आधीच्या कंपनीत सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे हे बर्याच प्रमाणात चालायचं . त्यात अमराठी विशेषता उत्तर भारतीय भांडायला नेहमीच तयार असायचे . ते जबराट भांडतात . दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसं मुळातच कमी असल्यामुळे एखादा पुढे गेला तर त्याला फार मोठा पराक्रम केल्यासारखं वाटून तो इतर मराठी माणसांना तुच्छ लेखतो असंही माझं observation आहे

असंका Sat, 06/07/2014 - 11:43
मराठी माणूस कष्टात कमी पडतो! दुसरं काय? हा विषय सांस्कृतिक फरकाचा आहे. पिढ्यान पिढ्या जी जीवनशैली अंगिकारली गेली त्याचा आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद हा आजकालच्याच नव्हे तर गेल्या अनेक शतकांच्या संदर्भात आहे- जगण्याची लढाई इतर प्रांतीयांना ज्या प्रमाणात लढावी लागते, त्या प्रमाणात महाराष्ट्रात लढावी लागत नाही. महाराष्ट्रातले हवामान इतर भारतापेक्षा चांगले आहे. इथल्या संतांमुळे आणि शिवाजीमहाराजांसारख्या युगपुरुषामुळे सुसंस्कृतीदेखिल आहे. यामुळे मराठी माणुस चुकीची गोष्ट करताना चारवेळा विचार करतो आणि बहुतेकवेळा शेवटी तसे (चुकीची गोष्ट) करत नाहीच. नीति अनीति ह्या गोष्टी मराठी लोक भरल्या पोटाने सांभाळू शकतात. पण जिथे जगण्या मरण्याची गोष्ट आहे, ते काय नीति अनीति बघत बसणार हो? इतर प्रांतीयात कुठ्ल्या का कारणाने असेना, दिवसरात्र जगण्याची लढाई चालू असते. लक्ष्यार्थाने आणि वाच्यार्थाने दोन्हीने. जर निसर्गाने नाही मारलं, तर डाकू, दरोडेखोर मारतील. त्यांनीही सोडले तर मायबाप सरकार मारेल. रोजचे कष्ट हीच त्यांची जीवनशैली आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना म्हणजे दुसर्‍या दिवशी जिवंत रहाणे ह्या! हे इतर प्रांतीय लोक जेव्हा त्यांची मायभूमी सोडून गेले, तेव्हा त्यांनी आपली कष्टाची पार्श्वभूमीही बरोबर नेली. अंगचे कष्टाचे संस्कार आणि नीति अनीतिच्या तुलनेने कमी विकसित कल्पना यांमुळे मराठी माणसाशी तुलना करता, इतर प्रांतीयांना कमी अडथळ्यांना तोंड द्यावे लागते.

In reply to by असंका

प्यारे१ Mon, 06/09/2014 - 14:47
काही अंशी सहमत.... (पश्चिम)महाराष्ट्राबाबत तरी असेच म्हणावे लागते. १९६०-७०-८० पर्यंत ना भूकंप (अपवाद : ६७ चा एक भूकंप), ना पूर (६१ ला पुण्यात धरणफुटी (नैसर्गिक नाही) एकदाच), ना रखरखीत वाळवंट, ना पाण्याचं दुर्भिक्ष्य ना वादळ, ना त्सुनामीची भीती! सुपीक जमीन, प्रगतीशील राज्यकारभार, उत्तम जोपासली गेलेली सहकार चळवळ, दूध डेअर्‍या, पतसंस्था, साखर कारखाने, सुबत्ता, खायला व्यवस्थित अशी चौरस आहाराची थाळी.... कशाला माणूस विचार करेल बाहे पडायचा ??? :) किर्लोस्करांसारखे, दांडेकरांसारखे उद्योग सुद्धा काही शे अथवा हजार कोटीला जाऊन थांबत असतात. अदानी, अंबानी, टाटा ह्यांसारखा विचार होत नाही असं कुठेसं वाचलं आहे.