Skip to main content

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 27/06/2014 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे. सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्‍या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’. तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही.

एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 26/06/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात.

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 26/06/2014 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझे हवाईदलातील दिवस ब्लॉगची लिंक
“...बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्धरिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली... ...‘साहेब,अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला,15 ऑगस्ट, 26 जानेवारीअन पार्टीच्या वेळी ‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्यावेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश”म्हणून बोळवण केली जाते...’ ...मलात्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली.

घर कसं बाळमुठीत कोंदणात सजणार -----------------

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 26/06/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे घर कसं ही पण घर हवं ------------------- माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच, घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं , घर कसही पण घर हवं ---------------------- लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं , घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच, मधभरल्या माधुर्याच---------------------------- घर कसं सजतं ---------------------------- घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच घर घराचे घरपण टिकविणारे , ---------- सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------ घर कसं असंच --------------

आठवणी दाटतात .......... !!

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 26/06/2014 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवस खूप म्हणजे खूपच छान होते, गांवकुसाकडे एवढी प्रगती झाली नव्हती, आमची दगडी शाळा नांनदुरकीच्या झाडा-जवळ भरायची, एकच मोठा वर्ग, त्यात पहिली ते तिसरीचे वर्ग भरायचे, बाकडी वगैरे कांही नव्हती, एकाखालीएकशा चौरस पट्टे पंधरा- सोळाफूट लांबीचे मुरुमाच्या मातीचे ताशीवदगडी ची-याचे बांध माती ओघळू नये म्हणूनचे, एकच खुर्ची-टेबल, बसायला तरटाची बसकणं, भरपूर धूळ, बंडोपंत परांजपे मास्तर, एकहाती कळकीचा फोक, एकहाती खडू, डोक्यावर तिरकस स्वभावाप्रमाणे तिरकस टोपी, हात-धुलाईचा झब्बा, कंचं बांधलेलं भोंगळ धोतर, उभंगंध, आणि अनुनासिक बोलणं, दोनचार खास शिव्या तोंडी लावायला, भारी मा- रकुटा मास्तर, एकदा वर्गात

जडण-घडण...4

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 26/06/2014 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
अशी खूप वर्षं सरली. दहावी इयत्तेनंतर गावी जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. शिक्षण सुरूच होतं. फारसा विचार किंवा प्रयास न करता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळून गेला. एखाद-दुसरा अपवाद वगळता ओळखीचं फारसं कुणी नव्हतं. कोणाच्या अध्यात-मध्यात नाही, अशी ती अकरावी-बारावीची दोन वर्षं निघून गेली. बारावीचा निकाल लागला आणि मी आमच्याच कॉलेजमध्ये पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्या छोट्याश्या कालावधीतही लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे अनंत भावे सर. मराठी शिकवायचे. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच त्यांची लेक्चर्स ऐकता आली.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 26/06/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहानांचे दंतोपचार : भाग दोन दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ... टूथपेस्ट आणि ब्रशिंग या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक. यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे. बर्‍याचदा रुग्णांची डेन्टिस्टकडून आग्रहाची अपेक्षा असते की डेन्टिस्टने त्यांना असे काही औषध / गोळी / मलम / रसायन द्यावे की ज्यायोगे दात कुठल्याही यांत्रिक उपकरणाने स्वच्छ करायची गरजच राहणार नाही, कधीच कीड लागणार नाही आणि सर्व त्रास संपेल.

तुम्ही मिपा विश्रांती अवस्थेत असताना काय करता ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 26/06/2014 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.
अशी सूचना मिपाच्या मुखपृष्ठावर दिसते आहे. माझे एक सहकारी जो कागद जी फाईल गेल्या सात दिवसात उघडली नाही ती प्रत्येक शनीवारी पुन्हा उघडून न पाहताच नष्ट करतात. गेल्या सात दिवसात ज्याची गरज पडली नाही ती कशाला सांभाळायची असा साधा सरळ हिशेब.

मी केलेला एक प्रयत्न !!

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 26/06/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. - --------------------------------------------------------------------------------- बरेच दिवसापासून आमच्या हिचे म्हणणे होते कि आपण हॉल मधील या दर्शनी भिंतीवर काहीतरी चांगले चित्र लावले पाहिजे. बाजारात बरेच फिरलो पण चित्र काही पसंत पडेना. देवाचा/गणपतीचा मोठा फोटो लावावा तर त्या भिंतीपलीकडे नेमके बाथरूम आणि शौचालय येत होते. याच भिंतीवर चित्र लावण्याचे कारण हे कि पलीकडच्या बाथरूम ची ओल सदैव भिंतीच्या पायथ्याशी दिसते व कोणी आले कि तिकडे लक्ष जाते.