मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संग्रह

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकसभा निवडणूक... गाडगीळ हटवा काँग्रेस वाचवा ही घोषणा तेव्हाचीच (बेरजेचे राजकारण म्हणता म्हणता वजाबाकी) . . अप्पा काकांची निवडणूक - विरुद्ध होते ढाकणे साहेब . . . . . राजीवजींचे नेतृत्त्व . . . . जनता दल संभाजीराव काकडे . नांगरधारी शेतकरी-गरीबांचा कैवारी . . . शशिकांत सुतार शिवाजीनगर मतदारसंघ जो आधी भाजपाकडे अण्णा जोशींकडे होता तो सेनेने आपल्याकडे घेतला पुढे निम्हणांच्या रुपाने काँगेसकडे गेला . तेव्हाचे खासदार यशवंतराव गडाख यांच्या सहीचे पत्रक .

वाचने 6230 वाचनखूण प्रतिक्रिया 18

आशु जोग Tue, 05/20/2014 - 18:57
६० / ७० दशक हा माझा संग्रह आहे... तो इतका मागे जाऊ शकणार नाही ;)

सुहासदवन Tue, 05/20/2014 - 19:18
त्यावेळी देखील भाजपा-सेना युतीला भ्रष्टाचार आणि महागाई ह्याच विषयांवर मते मागावी लागली होती आणि अगदी आता झालेल्या निवडणुकांत देखील त्याच मुद्यांवर मते मागीतली गेली. म्हणजे अजून देखील जास्त काही बदललेले नाही.

विकास Tue, 05/20/2014 - 21:04
असे अजून (इतर कुणाकडे असल्यास) फोटो पहायला आवडतील. :) तसेच घोषणा आठवत असल्यास त्या देखील लिहूयात... मला आठवणार्‍या काही घोषणा: आणिबाणीपूर्व काँग्रेसची निशाणी: गायवासरू नका विसरू Congress वर जनतापार्टीची निशणी आली आहेच... देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी! JP आणिबाणीनंतरची कॉंग्रेस - ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का अथवा न जातपर न पातपर इंदिराजी की बातपर, मुहंर लगाओ हातपर INC इंदिराहत्येनंतर - जबतक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा अथवा इंदिराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा जेंव्हा शिवसेनेला एखादीच जागा मिळायची त्या काळात शिवसेनेची घोषणा: सुखात सगळे साथीदार, दु:खात, संकटात फक्त शिवसेनेचा आधार. १९८४ अथवा नंतरच्या काळातील पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) निवडणुका लढण्याच्या काळात शरद पवारांबाबतः "महाराष्ट्राचा बुलंद आवाज!" (जो नंतर इंदिरा बँजो बँड मधे सामिल झाला! ;) ) भाजपाची मला फक्त "अबकी बारी अटलबिहारी" आणि "अबकी बार मोदी सरकार" या दोनच घोषणा आठवत आहेत..

कलंत्री Tue, 05/20/2014 - 21:10
मुंबई हो या गोहत्ती, अपना देश और अपनी मिट्टी. आणिबाणी के तिन दलाल, संजय शुक्ला और बन्सिलाल. राम जेठमलानी गोखलेको पिलो दो पाणी. पाणीवाली दिल्लीमे और दिल्लीवाली पाणीमै

जोशी 'ले' Tue, 05/20/2014 - 22:12
हे प्रचार साहित्य तर आता हद्दपारच झालंय, मला आठवतय ती 1989 विधानसभा निवडणुक तेव्हा आम्हि नगर ला रहायचो, मी पाचवी / सहावी ला असेल पण या बिल्यांमुळे व भित्तीचित्रां मुळे तसेच रिक्षां वरच्या प्रचारा मुळे नगर शहरातले प्रमुख उमेदवारांची नावे अजुनही लक्षात आहे.. काॅंग्रेस चे दादा'भाऊ' कळमकर, जनतादला चे अरुण'काका' जगताप अपक्ष बाबु'भाई' बार्शीकर वर तेंव्हापासुनचे आमदार शिवसेनेचे अनिल'भैय्या' राठोड.. या नावांवरुन केसरी मधले व्यंगचित्र सुध्दा आठवतयं .. भाउ, काका,भाई, - भैय्या मतदारांना मामा नाहि बनवलं म्हंजे मिळवली :-)