Skip to main content

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी गुरुवार, 18/12/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २ पहीला भाग इथे पाहता येईल h एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता. रेडबसचे बिझनेस मॉडेल अगदी नवीन नव्हते. ऑनलाइन तिकीट एजंट सिस्टीम जगभर सर्वत्र विमानांच्या तिकीटांसाठी वापरली जाते. बहुतांश इंटरनेट सुशिक्षित वर्गाला या कार्यपद्धतीची कल्पना असते.

एsssssssss...कटा..,चला सुटाsssssssssssss

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/12/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =)) बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल, आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...? शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा, जुळणार्‍या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा... तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला, "पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला... एक वरीस झालं.., तरी..

वरदायिनी कालिका

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 18/12/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
देवी वरदान काळकाई ऊर्फ वरदायिनी कालिका ह्या देवी चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर जवळ मुंबई-गोवा हायवे नजीक धामणी गावी आहे . या देवस्थानाला सुमारे 1000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असून या मंदिरानजीक असलेल्या पुरातन शिल्पात काही सांकेतिक चिन्हे कोरलेली आहेत ,ज्यायोगे असे सिद्ध होते की हे देवस्थान हिमालयातील कटरा vaishnodevi च्या खालोखाल जागृत आहे. परंतु आजतागायत ते प्रसिद्धीस आलेले नसून प्रसिद्धी-पराङ्ग्मुख आहे.

लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.

लेखक सतिश गावडे यांनी गुरुवार, 18/12/2014 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं?

अंधार क्षण भाग ४ - मारिया प्लेटोनाउ (लेख २०)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 18/12/2014 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - मारिया प्लेटोनाउ जानेवारी १९९१ मध्ये ' अ ब्रिटिश बिट्रेयल ' (ब्रिटिशांनी केलेला विश्वासघात) हे वृत्तचित्र बीबीसीवरुन प्रसारित झालं. या वृत्तचित्राचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता मी होतो आणि मला त्याच्यामुळे बराच त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला. ब्रिटनमधल्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे ज्येष्ठ नेते लाॅर्ड आल्डिंग्टन यांनी या वृत्तचित्राच्या प्रसारणालाच आक्षेप घेतला. एवढंच नाही तर त्यांनी बीबीसीच्या अध्यक्षांकडे याबाबत रीतसर लेखी तक्रार दाखल केली.

अकारण

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 17/12/2014 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
पेशावर येथील १६ डिसेंबर २०१४ रोजी शाळेतील मुलांवर झालेल्या प्राणघातक अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध...

नांदूर-माध्यमेश्वरचे पाहूणे

लेखक कंजूस यांनी बुधवार, 17/12/2014 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या थंडी मस्त पडली आहे. कुठे हॉटेलात तर कुठे तळ्याकाठी कुठे डोंगरावर तर कुठे लेण्याच्या सानिध्यात कट्टे करण्याचे मिपाकरांचे कट शिजताहेत. काही अलोट गर्दीत पार पडलेत. चुकलेले हळहळत बसलेत. मीपण येत्या रविवारचा हुकमिएक्का आयोजित भिगवण कट्टा हुकतोय म्हणून कासावीस झालो आहे. खरोखर किती बदललोय मी. मिपावर आल्यापासून कट्टाप्रेमी होत चाललोय. एकटाच भटकणारा मी आता वेगळे अनुभव घेतो आहे. आता जास्ती लांबण न लावता मुद्द्याकडे येतो. नांदूर-माध्यमेश्वर या पक्षितीर्थाबद्दल ऐकून होतो.

एकटा

लेखक Yash यांनी मंगळवार, 16/12/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
बघतो आहे वाट ती आता तरी येईल, आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल... तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा, ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा... तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला, "पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला... इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही, समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही.. सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं, थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं... मग विचार केला की कसे तिचे मन वळवू, समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू... एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले, न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले... ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली, पाहिलेली लाखो स्व