मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

वेल्लाभट ·
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात.

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

अत्रुप्त आत्मा ·
लेखनप्रकार
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही.

भारतातील प्रवासात येणारे लॉजींगचे चित्र विचीत्र अनुभव

माहितगार ·
पांघरुणातच गुरगुटून रहावं, उठूच नये असं वाटायला लावणारी छान थंडी पडलीये. मी अंथरुणात पडल्या पडल्या परिस्थितीचा आढावा घेतेय. संगमरवरी फरशी, बुरशी लागलेल्या भिंती, वाळवीने पोखरलेला दरवाजा, डाग आणि भोकं पडलेली चादर असा एकंदर थाट. ३-४ फील्डवर्क्सचा अनुभव गाठीशी असल्याने याहून वाईट परिस्थितीत राहण्याची सवय मला आहे. प्रत्यक्षात मात्र, याहून कैक पटींनी चांगल्या अशा दुसर्‍या एका ठिकाणी आमची व्यवस्था करण्यात आली होती. पण ..... संदर्भ: ... आणि माझी काशी झाली!

मला पडलेले काही गंभीर काही चिल्लर व काही किंचीत थिल्लर प्रश्न

मारवा ·
१-चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात. चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी. कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ? अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबई त कुठले ? त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ? सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ? ऑथेंटीक मेलीस्सा ऑइल कुठे मिळेल ? कसे ओळखावे ? २-मकाऊ व लासवेगास मधील कॅसिनोमधील जुगाराची सर्वात कॉम्प्लेक्स मशीन कुठली? जुगाराचा सर्वात चॅलेंजींग गेम कुठला ? का ? कसा खेळला जातो ? त्यात मानवी क्षमतेचा रोल कितपत असतो ? ३-ब्रायडल (नववधु श्रुंगार) मेकअप चे पॅकेजेस कीती किमंती पर्यंत हायएस्ट जाउ शकतात ?

मातृत्व

शिरीष फडके ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मातृत्व मातृत्वाचा एवढा उदो उदो करू नये ज्यामुळे एक दिवस मातृत्वच मातृत्वाला मारक ठरेल. अनेकदा हे वाक्य अनेक लेखकांच्या लिखाणातून किंवा कवींच्या काव्यसंग्रहातून आपल्यासमोर येतं. परंतु आजही या २१व्या शतकात या वाक्याचं गांभीर्य समाजाने लक्षात घेतलं आहे असं आढळून येत नाही. मातृत्व म्हणजे केवळ आई होणं का? आई होणं आणि मूल होणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मातृत्वाचं आणि पितृत्वाचं समाजातील स्थान, महत्त्व समान आहे का? मातृत्व म्हणजे नक्की काय? मातृत्वाचा उदो उदो म्हणजे नेमकं काय? मातृत्वाबद्दलचे समज आणि गैरसमज कोणते?

ती... भाग ३

सविता००१ ·
लेखनविषय:
ती... भाग २:http://misalpav.com/node/29423 या सगळ्यावरून जर असं वाटत असेल की मला तिचा कधीच राग आला नाही, अगदीच गुडी गुडी होत सगळं तर तसंही नाही. ती अगदी सत्ता गाजवायची माझ्यावर. ! मी मोठी होत असताना माझं अस मित्रमैत्रिणीच एक जग होत. त्यावर ती आक्रमण करू पहायला लागली. आमचं कुठे जायचं ठरलं की म्हणायची ‘ सवी आणि मी बाहेर जाणार आहोत. ती येणार नाही.’ .. आईशप्पत!! हे काहीतरी भलतं व्हायला लागलं. मी आईपाशी चिडचिड करायला लागले. तिची सगळी परिस्थिती समजत असून. ती मला तिचाच ठेवा समजत होती आणि माझा विश्व बहरू पाहत होतं.

केंद्रसरकारच्या पैशाने निंदनीय जाहिराती

माहितगार ·
आंदमानातील काही आदीवासी समाज आहेत, त्याच प्रमाणे पार्सी समाजाची लोकसंख्या देशात आणि विदेशातही वेगाने खालावते आहे. चांगल्या राहणीमानासाठी उशीरा अथवा आंतरधर्मीय विवाह हे त्याचे मुख्य कारण आहे असे म्हटले जाते. पार्सी लोकांना जन्मदर वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारच्या अल्पसंख्यांक खात्याने दहाकोटीच्या जाहीराती काढल्या आहेत इथ पर्यंतही ठिक आहे. पण या जाहीरातीतील काही विधान निश्चितपणे विवाद्य स्वरुपाची आहेत असे वाटते.