Skip to main content

(पडुन आहे सार्त्र अजुनी)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 14/11/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
पडुन आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे? एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे? अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे? सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू? नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, ’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’ उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा तू बिचार्‍या वाचकांना एवढा छळलास का रे? -- स्वामी संकेतानंद
काव्यरस

वाचने 5189
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

जबरा रे स्वाम्या. रच्याकने माझ्याकडे मराठी "अ‍ॅटलास श्रग्ड" पडून आहे. कुणाला वाचावयाचे असल्यास परत करण्याच्या बोलीवर देऊ शकेन.

In reply to by सतिश गावडे

तुहं 'सात सक्कं त्रेचाळीस' म्या अजुनही वापिस केलो नाही. तवा दोन्ही एकाच येरी वापिस कराच्या बोलीवर घेऊन जातो... का मन्तस? ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

असं नाही चालायचं गडया. ते पुस्तक दयायचं आणि दुसरं पुस्तक न्यायचं. हा फंडा मी पुस्तक देताना सगळ्यांच्याच बाबतीत वापरतो. हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो कारण त्याला माझ्याकडील दुसरे पुस्तक न्यायचे असते. :)

In reply to by सतिश गावडे

हाडाचा वाचक माझं आधीचं पुस्तक परत करतो... म्हणजे तुम्ही फक्त वेताळ वेग्रेंना पुस्तके देता होय. ठीकाय, मग मी नाही येणार ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काका, थोडक्यात काय तर तुमच्यातल्या डॉक्टर अधून मधून डोकावतो. :)

जबरा जमलय ! :) पण, तिकडे पाऊस पडला की इकडे छत्री उघडणार्‍या भार्तिय इचारवंतांना इसार्ल्याबद्दल दण्कून णीशेद ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

हे आश्वासन लक्षात ठेवा. आम्ही यथावकाश आठवण करून देऊच!

स्वामिज्ज्जीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif @बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif

विडंबन आवडलं. एक चांगला प्रयत्न. काही शब्द मात्र गेयतेच्या आड येतात.

स्वामीजी सार्त्र विषयी तुमचं विडंबन बाह्य मत काय आहे जाणुन घ्यायला आवडेल तुम्ही त्याच्या विचारांविषयी काय विचार करता ? विडंबना ची झकास भट्टी जमलेली आहे हे वेगळ सांगायला नको

In reply to by मारवा

दोनतीन महिन्यांनी कळवेन माझे मत. सार्त्रविषयी सविस्तर लिहायला हरकत नाही.