Skip to main content

बहीण - शतशब्दकथा

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 23/06/2015 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं एकत्र कुटुंब हाय, आमी दोघी जावा. चालता बोलता थोरल्या जावेनं हाथरुण धरलं, लगेच दवाखान्यात हलिवलं, ही म्हणू नका ती म्हणू नका, माप चाचण्या केल्या, उसाचा सगळा पैका बगा औषधाला घातला, म्या माज्या बांगड्या काढून दिल्या ह्यांच्याजवळ म्हणल असू दे अडीनडीला देवाला साकड घातलं, माज्या बहिणीला बर कर म्हणलं, तिला आराम पडूस्तवर काय माज्या डोळ्याला डोळा न्हाई लागला, दवाखान्यात, घरी सगळं पळून पळून केलं, परवा नंदुबाई आल्यावत्या बगायला, डोळ्याला पदर लावून म्हणाल्या, "पोराबाळाची आई हाये, बरी कर देवा" चुलीवर चाच आधाण ठीवलेल.

इनर पीस

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 23/06/2015 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतेय" तिने कर्कशपणे ओरडून सांगितलं आणि टीव्हीवर कुंग फू पांडा बघत असलेल्या प्रीशाला ओढत घेऊन गेली. तो सुन्न होऊन त्या दिशेकडे पाहत होता. शेजारच्या बेडरूममधून दाबून धरलेला एक हुंदका पदर चुकवून बाहेर आला आणि बरंच काही सांगून गेला. अशी निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क मला आहे? आणि एकाला निवडायचे मग दुसर्‍याचं काय करायचं? कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय? त्याचं डोकं गरगरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. प्रीशाचं टिपेला पोचलेलं रडणं त्यात भर घालत होते.

पाऊस म्हणजे?

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी सोमवार, 22/06/2015 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस म्हणजे? पाऊस म्हणजे उल्हास मनी दाटलेला, निसर्गाच्या सानिध्यात मन वेडा फुललेला। पाऊस म्हणजे चौफेरे दाटलेली हिरवळ, क्षणात दूर करते मनात आलेली मरगळ। पाऊस म्हणजे उत्साह शरीरात दाटलेला, रखडलेली कामे करण्यास बोनस वेळ मिळालेला। पाऊस म्हणजे उगाच सुट्टी मिळालेली, विसरून चिंता कामाची कुटूंबासोबत घालवलेली। पाऊस म्हणजे चिखलाचाच राडा सारा, उग्रट दर्प हवेत अन् वाटेभर कचरा पसारा । पाऊस म्हणजे नदिला आलेला पूर, घरात साचलेलं पाणी अन् मुलांच्या रक्षणाची हुरहुर। पाऊस म्हणजे फक्त पाऊसच आहे, जितके लिहावं त्यावर तितके कमीच आहे। पाऊस म्हणजे शब्दांची सरच बरसते, खोलवर मनात रूतलेली सहजच कविता खुलते। यल्

रानी

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 22/06/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नथं नाकातं खुलली लाली गालात फुलली कई होटातं ऊलली कोन्या जगातं भुलली खाली झुकली नजर कायं दिसलं गोजरं मले पाऊनं खरचं तूह्यं हासनं लाजरं तुले कोनाची कदरं डोई घेतला पदरं चालू नकोसं तर्तरं जीवं उळते वधरं पापन्याची फळंफळं पदराची सळंसळ कायं मनी गळंबळं सांग मले घळंघळं डूलं डुलतातं कानी मानं सुरई च्या वानी मोठ्या मोठ्या डोयातनी रूपं साकारलं रानी

गुजरात........७ - मोढेरा...सूर्यमंदीर...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 22/06/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात........७ - मोढेरा...सूर्यमंदीर... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मी आधीच कबूल केले आहे की प्रवासवर्णन (वाचकांना आवडू शकेल असे) लिहिणे फार अवघड आहे. पण परत परत मी तो प्रयत्न का करतो याला कारण आहेत उत्कृष्ट प्रवासवर्णने लिहिणारे मिपाकर. त्यांची प्रवासवर्णने वाचून मी परत परत चांगली प्रवासवर्णने लिहिण्याचा प्रयत्न करतो व परत परत तोंडघशी पडतो.

विस्मरणातील पांडुरंग

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 22/06/2015 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसं निसर्ग नियमानुसार जन्माला येतात, मात्र ती का जन्माला येतात किंवा जन्माला येणे हा काही त्यांचा गुन्हा असतो काय ? भविष्य काळात जे जीवन त्यांना जगावे लागणार आहे, त्याला ते कितपत जबाबदार असतात ? असा प्रश्न मानवी मनाला अनेक वेळा पडतो. कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र आमच्या मामाच्या घरात जन्मभर मानवी पाण्याचा पंप अर्थात पाणक्या बनून रहावे लागले. आम्ही सुट्टीत नृसिंहवाडीला गेलो, की पांडु हा आमच्या कुतुहलाचा विषय असायचा.

सखी तुझ्या अंतरात होतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 22/06/2015 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे कुणाच्या घरात होतो सखी तुझ्या अंतरात होतो दहाजणींतून देखणी तू तसाच मी शंभरात होतो जिथे तिथे गाय लंगडी अन सदैव मी वासरात होतो अता जमीनीवरी परंतु कधीतरी अंबरात होतो उन्हात मी जन्म काढला पण तुझ्यासवे एक रात होतो डॉ.सुनील अहिरराव ---------------- धागा संपादित केला आहे
काव्यरस