===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
हा सात किलोमीटर लांबीचा बोगदा १८९८ ते १९१२ या १४ वर्षांत बांधला गेला. यातून जाणार्या रेल्वेच्या मार्गाला २५% चढ / उतार आहे. इतक्या तीव्र उतारावरून ती घसरू नये यासाठी सर्वसाधारण रुळांबरोबरच तिला धरून ठेवण्यासाठी दातेदार चक्राच्या रुळांची (कॉगव्हिल) रचना उपयोगात आणली आहे.
युंगफ्राउयोखवरून आल्प्स पर्वतराजीमधील (२३ किमी लांब आणि १२० चौ किमी क्षेत्रफळाच्या) सर्वात मोठ्या अफाट आलेत्श हिमनदीचा उगम होतो. युंगफ्राउ-आलेत्श परिसराला २००१ पासून "जागतिक वारसा क्षेत्र (वर्ल्ड हेरिटेज साईट)" म्हणून ओळखले गेले आहे. या ठिकाणाला दर दिवशी ४००० ते ६००० पर्यटक भेट देतात. जॉन ख्रिस्तोफरच्या प्रसिद्ध ट्रायपॉड्स कादंबर्यांतील प्रसंग युंगफ्राउयोख संकुलात घडतात.
युंगफ्राउयोख एक स्थापत्यशात्रिय चमत्कार आहे असे त्याचे रेखाचित्र पाहून वाटले होतेच...
युंगफ्राउयोख ०१ : उभ्या छेदाची रेखाकृती
१. पहिला विभाग :
यात रेल्वे स्टेशन आणि त्याच्याशी संबंधीत सर्व यंत्रणा येते. स्टेशनवर रेल्वे पोहोचली. खाली उतरल्यावर लक्षात आले की आपण अजूनही पर्वताच्या पोटातल्या बोगद्यातच आहोत. फक्त बोगद्याची रुंदी आणि उंची वाढून तो एका भल्यामोठ्या लांबलचक पोकळीसारखा दिसत होता.२. दुसरा विभाग :
हा मुख्यतः पर्यटनाशी संबंधीत आणि आकारमानाने सर्वात मोठा भाग आहे. रेल्वे स्टेशनवरून येथे जाण्यासाठी दोन बोगदे आहेत. या भागात घाटाच्या आणि म्योंख पर्वताच्या दक्षिण पृष्ठभागाच्या लगतच्या भागात कोरलेले बोगद्यांचे चार मजली जाळे आहे. मजल्यांत वरखाली करायला लिफ्ट्सही आहेत. यात पर्यटकांना आकर्षित करणार्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या अश्या : (अ) बोगद्यांच्या जाळ्यात असलेल्या आणि मोक्याच्या ठिकाणी पृष्ठभागाबाहेर डोकावणार्या इमारतींत एक हॉटेल आणि चार रेस्तराँ आणि एक कॅफेटेरिया आहेत. त्यातल्या एकाचे नाव चक्क "बॉलिवूड रेस्तराँ" आहे !
युंगफ्राउयोख ०२ : दूरावलोकन (जालावरून साभार)
युंगफ्राउयोख ०३ : खिडकीजवळची जागा पकडून बसलेले अस्मादिक आणि सहलमित्र
युंगफ्राउयोख ०४ : रेस्तराँच्या खिडकीतून दिसणारे आलेत्श हिमनदीचे विस्तीर्ण पात्र
युंगफ्राउयोख ०५ : हिममहाल ०१
युंगफ्राउयोख ०६ : हिममहाल ०२
युंगफ्राउयोख ०७ : हिममहाल ०३
३. तिसरा विभाग :
दुसर्या विभागातून एक बोगदा पकडून किंवा स्टेशनवरून लिफ्टने आपल्याला उघड्यावरच्या बर्फाच्छादित पठारावर जाता येते. बराच वेळ बोगद्यातून फिरल्यावर मोकळ्या हवेत श्वास घेताना आपल्याला जरा बरे वाटते ! पण लगेचच चारी बाजूला दिसणारी अद्भुत दृश्ये वारंवार आपला श्वास रोखून धरतात... मग ते अगोदर खिडकीतून पाहिलेल्या पण आता पूर्णरूपात दर्शन देणार्या आलेत्श हिमनदीचे भव्य रूप असो; किंवा कोंकोर्डियाप्लात्स (Konkordiaplatz) सारखा मानवी नजरेच्या आवाक्याला आव्हान देणारा हिमसागर असो;...
युंगफ्राउयोख ०८ : युंगफ्राउयोखवरून दिसणारा कोंकोर्डियाप्लात्सचा नजारा
युंगफ्राउयोख ०९ : युंगफ्राउयोखवरून दिसणारे दृश्य ०१
युंगफ्राउयोख १० : युंगफ्राउयोखवरून दिसणारे दृश्य ०२
युंगफ्राउयोख ११ : युंगफ्राउयोखवरून दिसणारे दृश्य ०३
युंगफ्राउयोख १२ : स्विस ध्वज
युंगफ्राउयोख १३ : स्फिंक्स सुळका व वेधशाळा
४. स्फिंक्स वेधशाळा (Sphinx Observatory) :
बोगद्यांच्या जाळ्याच्या विरुद्ध बाजूच्या टोकाला असलेली लिफ्ट आपल्याला जगातल्या सर्वात जास्त उंचीवर (३,५७२ मीटर) असलेल्या वेधशाळेत घेऊन जाते. हे Global Atmosphere Watch या संस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मुळातच स्विस हवा उच्च प्रतीने प्रदूषणमुक्त आहे. त्यात हे ठिकाण इतक्या उंचीवर असल्याने या वेधशाळेत घेतल्या जाणार्या निरीक्षणाचे आणि त्यावरून केल्या गेलेल्या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सौर्यवार्यांतून येणार्या उच्च उर्जाभारीत न्यूट्रॉन्सचे अस्तित्व या वेधशाळेत सर्वप्रथम सिद्ध केले गेले. अश्या प्रकारच्या संशोधनासाठी अनिवार्य असणारे शुद्ध वातावरण आणि त्याचबरोबर जमिनीखाली खोलवर निरीक्षणे घेण्याची क्षमता असलेली दुसरी वेधशाळा विरळा आहे. सुळक्याच्या डोक्यावर बसल्यासारखी दिसणार्या या वेधशाळेच्या इमारतीला भेट देणे आणि तिच्या मनोर्याच्या सज्जावरून आजूबाजूच्या परिसराचे परत एकदा विहंगम दर्शन घेणे हा अविस्मरणीय अनुभव आहे...
युंगफ्राउयोख १४ : स्फिंक्स वेधशाळा (जालावरून साभार)
५. बर्फातील खेळांच्या रसिकांसाठी केलेल्या व्यवस्था :
वेधशाळेच्या लिफ्टमधून खाली आल्यावर जवळच असलेल्या एका निर्गमन व्दारातून बाहेर गेल्यास आपण बोगद्यांच्या जाळ्याच्या दुसर्या बाजूला उघड्या बर्फावर येतो. या विभागात बर्फांच्या खेळांशी संबंधीत सोयी आहेत. इथे जवळच नवख्या लोकांना स्नो डिस्क वापरून बर्फावर घसरण्यासारख्या सोप्या खेळांची मजा घेता येते. तर थोड्या दूरवर असलेल्या म्योंखयोखहुट् (म्योंख घाटावरची झोपडी) पर्यंत चालत जाऊन हायकिंग, स्किईंग, गिर्यारोहण, इत्यादी बर्फातले जास्त धाडसी खेळ खेळता येतात. वेळेअभावी या विभागात मला जाता आले नाही. पण तेथे जाणारा रस्ता किती साहसपूर्ण असेल याची कल्पना देणारे हे जालावरून साभार घेतलेले चित्र देण्याचा मोह आवरला नाही...
युंगफ्राउयोख १५ : "म्योंखयोखहुट्" कडे जाणारा रस्ता (जालावरून साभार)
वाचने
9597
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पर्वणी
कमालीच नेत्रसुखद आहे हे सर्व.
धन्यवाद !
In reply to कमालीच नेत्रसुखद आहे हे सर्व. by प्रचेतस
सुंदर मालिका
टिटलिसवर श्वासोच्छवासाला
In reply to सुंदर मालिका by चौकटराजा
धन्यवाद !
In reply to टिटलिसवर श्वासोच्छवासाला by गवि
धन्यवाद !
In reply to सुंदर मालिका by चौकटराजा
लॉटरब्रूनेन ( उच्चाराबद्द्ल
In reply to सुंदर मालिका by चौकटराजा
लॉटरब्रूनेन ( उच्चाराबद्द्ल माफी) च्या दरीच्या संदर्भात...Lauterbrunnen चा उच्चार लाउटेरब्रुनन असा होतो. जर्मन भाषा फोनेटिक आहे. त्यामुळे काही थोडे अपवाद वगळता प्रत्येक मुळाक्षराचा देवनागरीप्रमाणे एकच उच्चार केला जातो. पुढच्या लेखात आपण मनमोहक दर्याखोर्याने भरलेल्या लाउटेरब्रुननच्या परिसरातल्या काही भागातून प्रवास करणार आहोत !आहाहा...माहितीपुर्ण लेख.
धन्यवाद !
मस्त..
हवा तर विरळ असतेच आणि त्यातून
फारच सुंदर वर्णन. माउंट टीटलिस चं वर्णन वाचायची सुद्धा
नितांतसुंदर आहे जागा. :)
धन्यवाद !
In reply to नितांतसुंदर आहे जागा. :) by झकासराव
माऊंट टिटलीस तर आवडतं ठिकाण
धन्यवाद !
मज्जा आली
झकास...
जातेच आता!
आहाहाहा...
सुंदर आणि ..........
धन्यवाद !