Skip to main content

खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

लेखक गवि यांनी गुरुवार, 25/06/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक. तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात..

ती संध्याकाळ मंतरलेली…।

लेखक अपरिचित मी यांनी गुरुवार, 25/06/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
घड्याळाने चारचे ठोके वाजवले. ती तिच्या शनिवारच्या कामात गुंग. अचानक शेजारच्या खिडकीतून लता दीदींच "मालवुन टाक दीप …" कानावर पडलं … अन … ती थबकली … थोडीशी बिथरली … झर झर लग्नाची नुकतीच पूर्ण झालेली पाच वर्ष डोळ्यांसमोरून गेली. गेल्या पाच वर्षात तिने हे गाणं ऐकलंच नव्हतं. लग्ना नंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले. तो तर कामात इतका गुंग कि आठवणींना ही वेळ नाही. आजही सुट्टीचा दिवस. दुपारी उठल्या पासून मुलगा शेजारी खेळायला गेलेला. वास्तविक एकांत भरपूर. पण कुठेतरी कशाची तरी कमी होती. साडे तीन वाजे पासून T .V. समोर News Channels सुरु. बायको सोबत दुपारचं जेवण झालं. पण गप्पा नेहमीच्याच.

जातीयेसच तर जा...!!!

लेखक वटवट यांनी गुरुवार, 25/06/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ.. बारमाही ग्रीष्म, भारवाही श्रावण.. अन चुकचुकणारं जग.. अर्ध्यातच थांबू पाहणारी मैफिल.. अर्धवट भैरवी.. लांबलेला मल्हार.. अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या तुझ्या खुणा.. काळाचे बदलत जाणारे संदर्भ.. आणि.. सुन्न गंधार .. उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा.. विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा.. अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने.. कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे.. हुळहुळलेले तळे.. तळमळलेले डोळे..

पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग १

लेखक मधुरा देशपांडे यांनी गुरुवार, 25/06/2015 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - अंतिम भाग नद्या, फुलं, टुमदार घरं, बोगदे, आल्प्समधील घाट, तळी यांनी भारावून जात मागची आल्प्स सहल संपली आणि पुन्हा कधी जायला मिळतंय याचे इमले बांधणे चालू झाले. योगायोगाने एक जवळचे नातलग युरोप सहलीला येणार होते, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुठे जाता येईल का, हा आढावा घेताना ही दुसरी सहल ठरली. त्यांची टुर आणि आमच्या सुट्ट्या हे जुळवून बघता स्विस-फ्रान्सच्या सीमेवरचे शामोनि (Chamonix) हे ठिकाण पक्के झाले.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 24/06/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. असं म्हणून काका त्या आनंदाश्रूंसह बाजेवरून उठून माझ्यापाशी आला... आणि माझ्या पाठीवर थोपटत लहान मुलासारखं मला झोपवून..,शांत मनानी स्वतःही निद्रीस्त झाला. पुढे चालू... ========================== काका बरोबरच्या त्या संवादी रात्रीनंतर काहि दिवस तिकडे काहि इकडे असं करत केंव्हा गेले ते कळलं नाही. आणि शेवटी आमच्या घरी तो बारश्याचा समारंभ अगदी अस्सल कोकणी श्टाइलने पार पडला. मग एकच मोठ्ठा पाळणा की दोन वेगळे स्वतंत्र? समारंभ मोठ्ठा करायचा की साधा? अश्या अनेक चर्चा उपचर्चा झाल्या.

कधीतरी काहीतरी

लेखक prasadoak7 यांनी बुधवार, 24/06/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ होत आली. झाडांच्या सावल्या मोठ्या होऊ लागल्या. रस्त्यावरची माणसे कोणत्यातरी अनामिक ओढीने आपापल्या घरी जाताना पाहून मनात अनेक विचारांचे वादळ घोंगावयाला लागले. सायकलवर लटकत असणाऱा जेवणाचा डबा ; डाळ तांदूळ कांदे व भाजी ह्यानी भरलेली ती मळकट पिशवी हे सांभाळत गर्दीत वाट काढत सायकल घराकडे दामटत जाणाऱ्या त्या माणसाला कशाची ओढ असेल बरं ! एक आजोबा डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि पिशवीतून डोकावणारी कोथिंबीर जुडी घेऊन मंद चालीने घराकडे निघालेत. कोण असेल त्यांच्या घरी ? जीवनाच्या सायंकाळी असेल का कोणी तरी त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेल ?

पाऊस

लेखक सटक यांनी बुधवार, 24/06/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे ! निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !! सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे ! अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !! जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे ! लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !! बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे ! धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !! या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे ! जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!

फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 24/06/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला. सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती. आता नवीन ‘फूड प्रोसेसर’ घेऊन मगच अश्या ग्रेवीवाल्या भाज्या करायचा ऑर्डर करा. सौ.चा मूड पार बघडलेला पाहून, सौ.ला खुश करणे गरजेचे होते. मी म्हणालो, आता पनीर आणले आहे, तर मीच करतो काहीतरी. फादर्स डेला फादरने काहीतरी केलेच पाहिजे.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे'.....भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/06/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे' ....भाग-२ मागीलपानावरुन... आपल्या हातातील चांदीची टोके असलेला फिल्डमार्शलचा बॅटन त्या वाळूकडे रोखत तो म्हणाला, ‘या किनाऱ्यावर आपण युद्ध जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत. शत्रूला थोपविण्याची आपल्याकडे फक्त एकच संधी आहे. तो पाण्यात असेपर्यंत. त्याचा नाश हा किनाऱ्यावर उतरतानाच होऊ शकतो. आपल्याला त्यांना प्रतिकार करायचा असेल तर येथेच करावा लागेल. लँग, आक्रमणाचे पहिले २४ तास या युद्धाचे भवितव्य ठरविणार आहेत.