Skip to main content

कधीतरी काहीतरी

लेखक prasadoak7 यांनी शुक्रवार, 26/06/2015 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-3 अंधाराच्या आत जेवण बनवायला हव होत. राकेल मिळवायला किती हेलपाटे मारायला लागत होते. मोठ्या कष्टाने एक कॅन मिळत होता. झोपड्यात येणार्‍या स्त्यावरच्या दिव्याचा प्रकाशत ती रोजच सगळ आवरायची. लेकर आल्यातील म्हणून आज घासलेटचा दिवा पेटवला होता. दिव्याचा प्रकाशात आज बरेच दिवसांनी झोपडीत दिवाळी नाचत होती. हातपाय धुवून त्यान कांबळी अंथरली. पोर धावत बापाला बिलगली. हळूच धाकट्या लेकरान बा ची मांडी पटकावली. बापाची हनुवटी इवल्या हातान हलवीत त्यान विचारल बा त्या रेल्वेचा ड्रायव्हर यवढी मोठी लांब गाडी वळवतो कशी ? थोरली लेक जोरात हसायला लागली . बा न डोळ मोठ करीत तीला गप केल.

USA it is ...

लेखक Jack_Bauer यांनी शुक्रवार, 26/06/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही त्रुटी असल्यास नक्की सांगा, पुढच्यावेळी त्या टाळण्याचा प्रयत्न करेन. --------------------------------------------------------------------------------------------- हा माझा अनुभव २०१० मधील आहे. १५ जुलै २०१० ला माझा F१ वीसा मंजूर झाला आणि एकच घाई उडाली. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्या बाबतीत संन्याश्याचं लग्न जरी नसलं तरी तयारी मात्र खूप करावी लागली.

द्वि-पात्री प्रयोग...... नारळाचे दूध, वापरून केलेले टोमॅटो सूप....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 26/06/2015 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : १. फोटोची क्वालिटी बघू नका. २. संपादकांना नम्र विनंती, की त्यांनी फोटोला योग्य तो आकार-उकार द्यावा. ==================================================================== (शुक्रवारची सकाळ.मुले घरात असल्याने, आज चिकन-बिर्याणीचा बेत होता.बायकोला चिकन आणून दिले, आणि मी मिपा-मिपा खेळत बसलो.इतक्यात फोन वाजला.बायको स्वयंपाकघरात असल्याने, फोन मलाच घ्यावा लागला.) मी : बोला. आई : तूच फोनवर आहेस हे बरे झाले. मी : का गं?

मनमोर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीच्या गजांवर येऊन थांबलेले, लाघवी मेघदूत, खिडकीबाहेर रंगलेला..... बेधुंद जलधारांचा विलक्षण नर्तनसोहळा...! नेमक्या त्याच वेळी, तुझ्या निद्रीस्त चेहर्‍याला व्यापून राहिलेल्या लडिवाळ बटा....! ..... ..... हे सगळं अनुभवण्यासाठी... अवघे दोनच डोळे .... ? अं ह... आता ते दोन्ही डोळेसुद्धा मिटले आणि... आणि फुलवला पिसारा मनमोराचा....! .... ... सगळ्या अंगांगाला फुटलेत लक्ष लक्ष डोळे ... आणि सुरू जाहला, एक अलौकिक सोहळा........! विशाल पूर्वप्रकाशित :मनमोर...
काव्यरस

गुलझार

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/06/2015 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय गुलझार, समजायला लागल तेव्हा तु जी 'माचिस' पेटवलीस ती आजतागयात चालूच आहे. 'आसमा के पार शायद और कोई आसमा होगा' अस म्हणत जेव्हा स्वप्न पुरी करण्या साठी पुण्यात आलो तेव्हा सुद्धा तू सोबत होतास. घर सोडल्यावर "छोड आये हम वो गलीया" च महत्व जाणवल तेच तू सोबत होता. रात्री बेरात्री जेव्हा पुण्यात 'एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता है' म्हणत घरोंदा शोधत भटकत होतो तेव्हा तू सोबत होता. 'सपने मे मिलती है' अस म्हणत फक्त स्वप्नात मिळणारी कुडी जेव्हा प्रत्यक्षात भेटली, तेव्हा 'पहली बार मोहब्बत कि है' असा म्हणत दोघात एक ICE -cream खाताना तुझी सोबत होती. 'हुजूर

नंगा नाचेन मी एक दिवस

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 26/06/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
हाता पायातील बेड्या तोडून अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत अंधाराची होळी करून प्रकाशानं मनाची झोळी भरून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत नाव गाव पाण्याखाली बुडवून स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत

उपेक्षित नायिका

लेखक पाणक्या यांनी शुक्रवार, 26/06/2015 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी … आजच मिपा वर दाखल झालोय …. तशी लिहायची फार सवय नाही, एक प्रयत्न करून पाहावा म्हणतोय, बघू जमतंय का … परवाच कोणी हा प्रश्न विचारला म्हणून …. एकनाथांच रामायण लिहून झाल, आता यावर एक छोटी नाटिका बसवायची होती, सगळ्या प्रमुख पात्रांची निवड करून झाली होती, एक महत्वाच पात्रं अजून शिल्लक होत. राजा दशरथाची सर्वात प्रिय पत्नी जिने युद्धात अप्रतिम कामगिरी करून राजाकडून एक वरदान जिंकल होत, हुशार राणीने आपण आपले वरदान योग्य वेळी मागू असे म्हणून राखून ठेवलं होत … होय … तीच नाव महाराणी कैकेयी..

वाट पाहतो तुझी

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शुक्रवार, 26/06/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
वाट पाहतो तुझी मुसळधार पाऊस आज बाहेर कोसळत आहे, आठवणीत तुझ्या मन आसवे ढाळीत आहे । ढग दाटून आले पाऊस ऊभा स्वागताला, वाट पाहतो तुझी बाहू आतुर मिलनाला । संपली प्रतीक्षा चातकाची तो ही तृप्त झाला, दे दर्शन तुझे आता मी काय गुन्हा केला? यल्लप्पा सटवाजी कोकणे २५ जून २०१५

प्रिय वपु,

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/06/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वपु, लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत. "लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस.

शायद कभी ख्वाबोंमे मिले..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 26/06/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती. गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता. फराझचे शेर सांगताना त्याची खूप ओळख करुन द्यायची गरज नसते. त्याने खूप मोठ्या संख्येने खूप नजाकतपूर्ण शेरोशायरी केली आहे. सरळसोप्या शब्दरचनेपासून अतिशय गुंतागुंतीचा भाव दाखवणारे शेर, गजल्स त्याने जन्माला घातल्या आहेत.