Skip to main content

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 24/06/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले

सफर माद्रिदची........भाग १.

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 24/06/2015 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी कारणाने वीकेंड ला जोडुन एका दिवसाची सुट्टी मिळाली होती. तसा थोडाफार ऑफ सीज़न असल्यामुळे विमानांची तिकिटे अगदी डर्ट चीप म्हणतात तशा दरात उपलब्ध होती. मग मॅड्रिडला जायचं का बार्सेलोनाला अशी तूफानी चर्चा घरात सुरू झाली. खरंतर आम्हाला काय दोन्ही बघितले नसल्यामुळे तसा काहीच फरक पडत नव्हता. शेवटी आम्ही हेड्स का टेल्स असा अत्यंत डोकेबाज उपाय वापरून निर्णय घेऊन टाकला. तिकिटे, होटेल बुकिंग वग़ैरे करुन शुक्रवारी रात्री उशिरा मॅड्रिड मधे येउन पोहचलो सुद्धा. मॅड्रिड चा खरं म्हणजे स्थानिक लोकं माद्रिद असा उच्चार करतात. या शहरात हिंडतांना सर्वात प्रथम आपल्या डोळ्यात भरते ती येथील भव्यता.

डोमिसाईल हवंय.... ? ?

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 23/06/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.

(खरा) इनर पीस

लेखक टवाळ कार्टा यांनी मंगळवार, 23/06/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745 कमुंची माफी मागून -------------------------------------------------------------------------------------------- "तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता. शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली. अशी (पर्फ़ेक्ट फ़िटिंगची आणि स्टाईलची) निवड करता येते? दोन्हीपैकी एक?

जोग धबधबा–मुरुडेश्वर–पाळोले बीच–दूधसागर धबधबा भटकंती

लेखक अविनाश पांढरकर यांनी मंगळवार, 23/06/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राच्या लग्नाचं निमित्त असल्याने सर्व मित्र बऱ्याच दिवसानंतर पुण्याला एकत्र जमले. सर्वांना वेळ असल्याने २-३ दिवस कुठेतरी ट्रीप काढावी अशी टूम मी काढली. अर्थात आमच्या मित्रांमध्ये ही टूम दरवेळी मलाच का काढावी लागते, हे मला अजून तरी समजलेले नाही. परंतु मी कधीच मलाच टूम का काढावी लागते ह्याबद्दल हरकत घेत नाही, कारण एकदा टूम काढली की मला फक्त बॅग भरणे एवढंच काम करायचं असत.

.....पाऊस गात आहे .....

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 23/06/2015 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ... ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ... शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ... राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला, रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ... कर्जात बुडलेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...
काव्यरस

महिला दिन (शत शब्द कथा)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/06/2015 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
महिलामंडळाने ठाण मांडलय, फाटक्या “चिंधीच्या” तुटक्या झोपडीसमोर, तीन दगडाची चुल, मोडकी ट्रंक, आजारी सासू, तिथेच खेळणारी चिंधीची शेंबडी पोरं तिला जाणीव करून देणार, तिच्या हक्कांची, अधिकारांची आजचा शेवटचा टास्क, सकाळपासुन चार “क्लायंट” केलेत, हा शेवटचाच ! बर्गर, पाच-सहाच इडल्या, सकाळचा ज्युस,बस्स उन्हे तापलीयेत, फ्रीजमधली चिल्ड बिअर वाट पाहतेय… चिंधी कुठे उलथलीय कोण जाणे? एक दिवस नसती गेली कामाला, काय बिघडणार होते? किती वाट पाहायची उन्हात अजुन? उकिरड्याआड लपलेली चिंधी… बाया काय जायाला न्हायी, दाल्ल्याने हाग्यादम भरलाय, गोडधोड कर सांजच्याला येक चिपटीबी आन, सरपनाच्या पैक्यातुन गुत्त्यावरनं नर

गुलाल

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 23/06/2015 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
जरी देवळात उडवला मी गुलाल काल काही, तरी पायरीत आज भेटले दलाल काही मदिरेतच झिंगतात लोक असे नाही देवळातही होतात हलाल काही, उगाच वाहतो का ओझे फुकाचे, जीवना मी तुझा हमाल नाही का विझावे पणती परी, अजूनही पेटवु मशाल काही. #Gypsy gypsykavita.blogspot.in

सौम्या आणि प्रणयरम्यता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 23/06/2015 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
“हा वसंत ऋतुचा मोसम आहे.वातावरणात प्रणयाचे वारे वाहू लागले आहेत.पण हे सर्वांच्याच बाबतीत नव्हतं.आणि तसं माझ्याही बाबतीत.” सौम्या मला सांगत होती. सौम्याचे वडील आणि मी एकमेकाला ओळखत होतो.आमची ओळख आमच्या एका दुसर्‍या मित्राने करून दिली होती.