Skip to main content

लेखनवैमूढ्य

लेखक बॅटमॅन यांनी शुक्रवार, 19/06/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाडावया काव्य पुरे नव्याने या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने लिहू परी काय अहो कळेना वाटे कळे पैं तरि ते वळेना पाडोन जिल्बी हसु नेहमीचे विडंबनप्रेमिचमूजनीचे किंवा लिहू म्या दवणीय साचे जे मुक्तपीठात भरे सदाचे शब्दांचिया वा करु नाच साचा जो चित्रकाव्यात दिसे तयाचा किंवा लिहू चावटआंबटासी हे लोक चेकाळति जैं तयासी किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
काव्यरस

माझी इटलीची भ्रमणगाथा -भाग ७ पिसाचा झुकता मनोरा.

लेखक अजया यांनी शुक्रवार, 19/06/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ ट्रिप सुरु होऊन आता पाच दिवस होऊन गेले होते. दोघीच आलेल्या आम्हाला बघून आश्चर्याची जागा हेव्याने घ्यायला सुरु झाली होती! आमचा मैत्रीण परिवार पण वाढत चालला होता.

मौनांची भाषांतरे

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 19/06/2015 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
तसा हट्ट नाहिये माझा अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र, नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे तसा हट्टच नाहिये माझा फक्त बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे #जिप्सी #gypsykavita.blogspot.in
काव्यरस

शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/06/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद होवुन गरजतो पाऊस आहे हाय ओला बरसतो पाऊस आहे... माय काळी आज पान्हावे नव्याने स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे... रान हिरवे नाचले बेभान आता मोर होउन लहरतो पाऊस आहे वीज कोसळते, सरी होती कट्यारी शस्त्र ओले परजतो पाऊस आहे... बघ धरा ओलावली आता कशाने? भेटताना हरखतो पाऊस आहे... का चकोरा येतसे ग्लानी सुखाने? की तयाला भरवतो पाऊस आहे...? चल 'विशाला' जावुया रंगून आता अंगणी या बहरतो पाऊस आहे... विशाल
काव्यरस

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 19/06/2015 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना सायकलसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद... ३१ मे, रविवारची सकाळ! सेनेच्या जवानांसोबत चांगला आराम झाला. कालच्या दिवसावर अजूनही विश्वास बसत नाहीय. काल रात्री जवानांसोबत मस्त गप्पा झाल्या. पहिल्यांदा त्यांच्यासोबत राहात असल्याची थोडी भिती वाटली. पण वातावरण अगदी अनौपचारिक होतं. अर्थात् सुरक्षेच्या नियमांप्रमाणे सामानाची तपासणी केली.

तत्त्वभान

लेखक निरन्जनदास यांनी गुरुवार, 18/06/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे.

माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-३

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 18/06/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ सगळेजण प्रवासाने थकले होते. मग प्रत्येकाने आपापल्या खोलीत आराम केला. हे हॉटेल फक्त निवासा करिता होते. रात्रौ ९.०० वाजता जेवायला थोडे अंदाजे ८०० मीटर अंतरावर असलेल्या एका दुसर्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे असे सांगितले गेले. पण कोणीचीही त्या बद्दल काहीच तक्रार नव्हतीच. उलट सगळे त्या आल्हादायक वातावरणात मस्तपैकी थंड हवेत (तापमान बहुतेक २५ असावे) आणि चांदण्यात फिरत फिरत तिथे पोहचले. जेवण रुचकर होते.

७ 'कधीपण-कुठेपण' व्यायामप्रकार

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 18/06/2015 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग पोस्ट इंग्रजीत आहे. तिचा दुवा हा खाली दिलेले ७ व्यायामप्रकार असे आहेत की जे कुठेही केले जाऊ शकतात. या व्यायामप्रकारांत शरिरातील अनेक सांधे, स्नायू कार्यत्यामुळे, त्यामुळे हे कंपाउंड एक्सरसाइजेस या वर्गात मोडतात. जिम लावेपर्यंत, लावायच्या आधी, किंवा लावायचं नसेल तर, हे व्यायामप्रकार तुमच्या दिनचर्येचा भाग होऊ शकतात. आधी महत्वाचे: - नेहमी निगेटिव मूव्हमेंट हळू करावी. ५ आकडे मोजत निगेटिव मूव्हमेंट होणे आदर्श. उदा.

मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन

लेखक शशांक कोणो यांनी गुरुवार, 18/06/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास sajjad hussain संगीत काही लोकांच्या शरीरातून रक्तासोबत मिसळून वाहत असते. त्यांचा प्रत्येक श्वास संगीताने भारलेला असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत संगीत वसते.

बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस

लेखक बीएमएम२०१५ यांनी बुधवार, 17/06/2015 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, २४ वर्षानंतर दक्षीण कॅलीफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७ वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतीम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा. अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता. तीनही दिवस भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे अनेक उत्तम कार्यक्रम पहाण्याची संधी. कार्यक्रमाची यादी या दुव्यावर पहा.