पाऊस पडून गेल्यावर
खेळ खेळते ऊन सावली
पाऊस पडून गेल्यावर
गवतावरचा थेंब चमकतो
किरणांची भेट झाल्यावर
पाऊस पडून गेल्यावर
पाखरांची किलबिल झाली
नव्या नवरी सारखी धरती
हिरवळ लेवून सजली
मन भारावून गेले
पाऊस पडून गेल्यावर
सुखावून मी जातो
गारव्याचा स्पर्श झाल्यावर
हरवून जातो शब्दात
पाऊस पडून गेल्यावर
नकळत सुचतात शब्द
कविता सजते कागदावर
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ जून २०१५
९८९२५६७२६४
मिसळपाव
र्हाइनच्या दोन्ही काठावर वसलेली युरोपातली एक महत्त्वाची नगरी म्हणजे क्योल्न! क्योल्न.. लॅटिनमधील कलोनिया म्हणजे कॉलोनी ह्या शब्दापासून आलेलं नांव क्योल्न! (कदाचित जिभेला जास्त व्यायाम नको म्हणून्)इंग्रज साहेबाने त्याचे कलोन असे बारसे केले. जर्मनीचे सांस्कृतिक,व्यापारी आणि दळणवळण केंद्र म्हणून अगदी सुरुवातीपासूनच सक्रिय असलेली ही महत्त्वाची नगरी!रोमन कालातही हिचं स्थान अग्रणी होतं.