Skip to main content

राधाबाई

लेखक प्रशु यांनी सोमवार, 13/07/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही ! नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई ! अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा ! पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा ! गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका ! वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका ! आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास ! अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस ! मरणासन्न ह
काव्यरस

कांदे-पोहे.

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 13/07/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील कुठ्ल्याही शहरातील उपहार गृहात गेला, तर महाराष्ट्रीयन कोणताही पदार्थ कमी प्रमाणात मिळेल.त्या मानाने उत्तरे कडून आलेले सामोसे,छोले भटोरे,कचोरी किंव्हा दक्षिणे कडील इडली,डोसा,उताप्पा वगैरे हे पदार्थ सहज उपलब्ध होतील. थोडक्यात आटके पार झेंडा लावलेल्या, महाराष्ट्रातील पराक्रमी पुरुषांची अनेक किस्से, आपणाला नावा सहित सांगता येतील, मात्र महाराष्ट्राचे इतर वेळी खाण्याचे स्पेशल पदार्थ म्हणावे तितके सांगता येणार नाहीत कींव्हा सहज उपलब्ध होणार नाहित.इतर वेळी खाण्यासाठी आसणारे महाराष्ट्रीयन पदार्थ फ़ारच कमी आहेत क़िव्हा काळाच्या ओघात ते आपण सोडून दिले असणार .

वादळ

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/07/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ उठत.. एक मनात... एक दर्यात पड-झड़ होतेच न दोघात मोठी कुठली? सांग माझ्या कानात मनात... भावना उध्वस्त; दर्यात जीव अस्वस्थ! मनातल्या नात्यात द-या बनतात; सागरातल्या द-या भरून निघतात! दर्याच्या वादळात आधार मनाचा मनाच्या वादळात आधार कोणाचा? सारंगाची नजर किनारा शोधते उध्वस्त मन मात्र कायमचे हरते

आठवणीतला श्रावण

लेखक सह्यमित्र यांनी रविवार, 12/07/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण! मराठी सारस्वतात आजवर अनेकांनी हाताळलेला विषय. श्रावण आहेही तसाच. ह्या विषयावर आधीच एवढी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती झालेली असताना, मला त्यात भर घालण्याचे कारण नाही. पण तरीही काळाच्या ओघात हा आठवणीतला श्रावण निसटून जाऊ नये म्हणून हा प्रयत्न. श्रावण म्हणजे रिमझिमणारा पाऊस, ऊन-पावसाचा खेळ. एकूणच श्रावण म्हणजे पावसाच लोभसवाणे रूप. तसं बघायला गेलं तर पाऊस मला आवडतोही आणि नाहीही. पावसाचं आणि माझं जन्मापासूनचे नातं आहे. म्हणजे माझा जन्म ७ जूनचा असल्याने पावसाचं आणि माझं आगमन अगदी हातात हात घालून झालेलं आहे. माझ्या जन्माच्या दिवशी पुण्यात गारांचा पाऊस झाला होता म्हणे.

द स्केअरक्रो - भाग ‍१०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 12/07/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ९ द स्केअरक्रो भाग १० (मूळ लेखक मायकेल कॉनेली) बुधवारी सकाळी नऊ वाजता मी स्किफिनो अँड असोसिएट्सच्या ऑफिसबाहेर उभा होतो. ऑफिसचा दरवाजा बंद होता. लास वेगासच्या जवळ असलेल्या चार्ल्स्टन नावाच्या छोट्या उपनगरात ही चार मजली इमारत होती. मी आत्ताच मानसिकदृष्ट्या थकलो होतो. इथे कुठेही साधी बसायलाही जागा नव्हती. जे शहर नशीब उजळण्याशी इतकं निगडीत आहे, तिथे मला मात्र मी कमनशिबी असल्याचा अनुभव येत होता. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली होती.

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला

लेखक खटासि खट यांनी रविवार, 12/07/2015 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला तेव्हां चर्चिल घासलेटच्या साठ्यावर फणा काढून उभा होता मी मार्क्सला म्हटलं पेटवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी माओचीही राख झाली आता इंद्रायणीतून भिजलेली गारगोटी काढून त्यावर अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय मात्र उजवीकडून येणारा मुसळधार भगवा पाऊस म्हणाला रांडेच्या, बघतोच तुला एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना पुरूष कानात कुजबुजला माणसं पेटवतोस का ? गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात लागतील तेव्हढे !

संजीव खांडेकरांना नक्की अपेक्षित काय आहे?

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 12/07/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
यांना नक्की काय हवे?? गेल्या रविवारच्या ’लोकसत्ता’त श्री. संजीव खांडेकर यांचा “मूत्राशयातील शुक्राचार्य” हा लेख वाचनात आला. लेखाची सुरुवात, लै मोठ्या स्कालर लोकांशी असलेली वळख त्यात दिलेले दाखले, याने झाली आणि आपसूकच पुढे काहीतरी चांगले वाचायला मिळेल असं वाटलं. “राईट टू पी/पू” अशी चळवळ सुरु करावी लागणे हे निश्चितच लांछनास्पद आहे. याबाबत खांडेकर अगदी १००% सत्य बोलतात.

तो पाहिला ना अत्ता..,बाप वेडा मी ....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/07/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
तो पाहिला ना अत्ता..बाप वेडा मी हसता हसता अवचित रडू लागला भरुन आलेला होता आतून ..

मुल्यांकन (?) : (शतशब्दकथा)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 12/07/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः ही प्रतिक्रिया हे गंमत म्हणुन लिहिलेलं आहे तस्मात हलकं घेणे हे.वे.सां.न.ल. आक्रमक प्रतिक्रियांसाठीचा ड्रॉपबॉक्स पौड फाट्यावर ठेवलेला आहे. तस्मात :)!! विद्यापीठामधल्या परिक्षा विभागाचा पेपरतपासणीविभाग प्रचंड गडबडीमधे दिसत होता. परिक्षा होउन दोन महिने गेलेले होते. त्यामुळे "निकाल" लावायचं काम जोमानं चालु होतं. सकाळीचं नवा फ्रिज घेण्यावरुन बायकोशी भांडण झालेले प्राध्यापक सोनटक्के घुश्शातचं मेकॅनिक्सचे पेपर तपासत होते.

प्रतिबिंब

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 12/07/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मेघ सावळा का नभी एकटा? तो वाट प्रियेची बघ, पाहतसे विरह वेळा ही असह्य झाली प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे सखी प्रिया तव दूर वसुधा आतुर मिलना मनी कळवळे सरतील कधी, क्षण विरहाचे? नभास वेड्या कधी ना कळे... शल्य त्याचे कुणा ना कळले हलकेच कसे नभ ओघळले? विरह वेदना जळी बुडाली.. प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले... बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी विशाल... अ फ़ोटो आंतरजालावरून साभार
काव्यरस