Skip to main content

क्रिकेट ते कबड्डी...

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 04/08/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
शाळकरी वयापासून कबड्डी आणि खो-खो हे माझे आवडते खेळ. क्रिकेटची मात्र पराकोटीची नावड. इतकी पराकोटीची की घरात कोणी क्रिकेटची मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टीव्ही बंद करायला लावायचे. तेंडुलकरमुळे क्रिकेट आवडू लागलेल्या वर्गात मी होते, आहे. त्याची खेळतानाची देहबोली, शांत स्थिर नजर आणि शब्दाला शब्द न देता कृतीतून प्रत्युत्तर देण्याची पद्धत. मग माझंच वागणं इतकं बदललं की असलेला अभ्यास बाजूला ठेवून, चक्क रात्री जागून मॅच बघू लागले. कधीतरी मी आणि धाकटा भाऊ रात्रीचे जागे राहून मॅच बघत बसलेले असायचो. ती संपता संपता आपली गाडी गडगडायची.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 03/08/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि हे सुशिक्षित महाराज प्रकरण म्हणजे खरच पुन्हा त्या अज्ञाता'ची (सुरवातीच्या हो! ) आठवण करवून देत होतं. मी मनात म्हटलं..'मरे ना का त्याचा ड्रेस कसाही असला तरी..आपल्याला थोडच त्याचं अनुग्रहीत व्हायचय..आणि वैजूही आज ह्याचं ऐकेल सगळं..पण ती ही कुणाची अनुग्रहीत होणार्‍यातली नव्हेच..त्यामुळे भ्या कशाला?' पुढे चालू... ==================== आणि तो सुरु जाहला. तो:- हम्म्म.. हात जोडा. आंम्ही:- __/\__ (नमस्कारावस्थेत गेलो..

[शतशब्दकथा स्पर्धा] शीर्षकविहीन

लेखक चिगो यांनी सोमवार, 03/08/2015 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज त्याला प्रोजेक्टवर निघायचं होतं. ती त्याचं सामान आवरत होती. कधी चिवचिवत तर कधी अगदीच उदासपणे.. तो कौतुकानं तिची सगळी लगबग बघत होता. तिचंही मन थार्‍यावर नव्हतंच. कल्पना होतीच तशी, मात्र जरा तातडीनंच ठरलं होतं सगळं.. तिच्याकडे बघतांना त्याच्या डोळ्यांसमोरून आख्खा भूतकाळ तरळून गेला. ती पहिली नजरभेट, ती चोरट्या प्रेमाची वाढती खुमारी.. सगळे विरोध पत्करून घडलेलं मिलन. तिच्या मखमली, उबदार मिठीत निवलेल्या रात्री.. अन् वाफाळत्या कॉफीच्या साक्षीनं रंगवलेली स्वप्नं ! तिच्या स्वतःपासून दूर होण्याच्या विचारानेच त्याचा श्वास कोंडला.