Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 28/07/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला. उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं . आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची .

साजरं ( शतशब्दकथा )

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 28/07/2015 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिशाहीन चालत होता. बेवड्या बापाने आज परत त्याला चोपले होते आणि मायने मध्ये पडून त्याला सोडवले होते. वाढते वय, वाढती भूक आणि ती भागवायला बापाचा मार आणि कधीतरी मिळणारे वडापावच्या गाडीवरचे काम. पक्याची गाडी उचल्यापासून ते काम पण बंद होते. शाळा बंद म्हणून खिचडी पण बंद... स्टेशनवर हमालीसाठी पण कोणी उभं करत नव्हतं. मनात नसतानाही तो स्मशानाच्या रस्त्याला लागला...

जडण- घडण : २४

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 28/07/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाची नियोजित तारीख जवळ येत चाललेली. त्याच्याकडून काहीच संवाद नाही. मी सुद्धा स्वत:शीच कठोरपणे वागत संपर्क नाहीच केला पुन्हा. तेच उत्तर पुन्हा ऐकणं सहन नसतं झालं.. नियोजित नवऱ्याशी बोलणं सुरू. मैत्रीचा, विश्वासाचा एकमेव संवाद. जे त्याला कळत नव्हतं, आई-बाबांपर्यंत पोहोचत नव्हतं, ते याला कसं समजून घेता येतंय, याचं आश्चर्यही वाटत नव्हतं. बाकी सगळी कवाडं घट्ट मिटून घेतल्यासारखी. स्वत:ला शांत ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. प्रत्येक रात्र तगमग करणारी, झरत्या डोळ्यांनी उशी भिजवणारी.

ती (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 28/07/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते. 'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर.

सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/07/2015 10:01 या दिवशी प्रकाशित केले.

सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!

'आत्ता युट्यूब वर नजर गेली. 'तुमच्या नाडीला पहायला' ती' गेली होती म्हणे'! फोन वरून आवाज आला. एक नाडी प्रेमी दुसर्‍याला सांगत असावा. 'नाही हो, हे काय भलतेच' असे तो म्हणत होता. मनात अशी मदनिका माझ्यापर्यंत पोचली तर? ह्या कल्पनेने त्याच्या सर्वांग वर रोमांच उभे राहिले. चोरून पहायच्या ललनांचे अतरंगी सौष्ठव आणि नाडी? काय संबंध? अन् अशा गोष्टींचा बोभाटा का करतात? अहो त्यात नाडीग्रंथवाल्यांची भेट घेताना म्हणे दिग्दर्शक सिनेमात 5 ठिकाणी चुकलाय. असेल मग मी काय करू शकतो? 'नाही, तुमच्या कानावर घातली बातमी!

स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी मंगळवार, 28/07/2015 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी जिथे काम करतो तेथील प्रसंग. इतके दिवस जुनाट कपाटं, कागद, वाळलेल्या पापडासारखी पोस्टर्स, निवांत सरकारी कामं, एका बाईचा तार सप्तकातला इरिटेटिंग स्वर अस एकंदर स्वरूप. परवा अचानक गडबड झाली, खडबडून जाग आली म्हणा ना...सगळी पोस्टर्स पुसून घ्यायला लावली...कुणाला?? संशोधकांना...आम्हाला देण्यात येणाऱ्या पगारात हे ही समाविष्ट असत वाटत. नवीनच कळलं. १ महिना रखडलेल्या पोस्टरच काम १ तासात उरकलं गेलं अन ते प्रिंट करायला धाडण्यात आलं. जुनी कपाटं नवीन दिसण्याचे दुबळे प्रयत्न करून झाले. कार्पेट नवीन, पायपुसणी नवीन एवढच काय तर चहाचे कपदेखील नवीन.

शष्पचिंतन

लेखक निराकार गाढव यांनी सोमवार, 27/07/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?

भारतरत्न अब्दुल कलाम

लेखक विकास यांनी सोमवार, 27/07/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
APJ Kalam भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले. आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे.

महाभारतातली माधवी

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 27/07/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्याची लेकरे मधील एका प्रतिक्रियेत श्री स्वॅप्स यांनी माधवीचा उल्लेख केला. महाभारतातील अनुकंपनीय पात्रांमध्ये त्यांनी माधवीचा उल्लेख केला. त्या अनुषंगाने आलेल्या उत्सुक प्रतिक्रियांमुळे ही जिलबी पाडायची इच्छा झाली. त्यामुळे याचा दोष पुर्णपणे स्वॅप्स यांना द्यावा ;).