Skip to main content

फोडशी/कुलुची भाजी

लेखक पूर्वाविवेक यांनी मंगळवार, 14/07/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

पुणेरी व्यंगशोधक नजर (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 14/07/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
'अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी', गोल्फकोर्सवर गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस तोल सावरता सावरता म्हणालो, 'अरे सिच्युऐशनमधलं व्यंग लगेच पकडतो मी',…… सुपरलक्झरी लाइफस्टाइलचा परीघतूनच त्याला पुढे सांगतच राहिलो,...'आता आज सकाळचंच बघ, ड्रायविंग करताना दुकानाचा बोर्ड पहिला, "मृत्युंजय - सिजनल्स "…. ' 'खिक्क …. ' समोरचा रीस्पॉन्स….

भांडुप उदंचन केंद्र व येऊर जंगल भटकंती

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 14/07/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार ११.०७. भांडुप येथील उदंचन केन्द्राजवळील कांदळ वने व रविवार १२.०७. येऊर जंगल भटकंती दरम्यान टिपलेली प्रकाशचित्रे.

वर्तुळ

लेखक शब्दवेडी यांनी मंगळवार, 14/07/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न … चू. भू. दे. घे. प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित वर्तुळ वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही आयुष्य व्यापून टाकेल इतका कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही …. अपुरेपणाच्या विस्तृत्वाला कोणतीच रेषा छेदत नसते कितीही 'सुटावं' म्हटलं प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते …. वर्तुळाच्या गोलाईचा कोणताच एक आकार नाही मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं कोणतच एक सूत्र नाही …. गुरफटलेल्या आकृत्यांना खरंतर स्वत:ची नावंच नसतात आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. - शब्दवेडी

लिव बामणां लिव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/07/2015 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मावसभावाच्या, कोकणात,आंब्यांच्या बागा आहेत.देवगडहून हापूस आंब्यांची कलमं आणून त्याने आपल्या बागेत रुजवली होती.आता त्या झाडांना भरपूर आंबे लागतात.जर मी कोकणात त्या मोसमात गेलो नाही तर तो मला एक आंब्याची पेटी मुंबईला पाठवून देतो. ह्या देवगड आंब्यांची खासियत आहे.मध्यम आकाराच्या ह्या आंब्याला तो चांगला पिकला आणि खाण्यालायक झाला हे त्याच्या सालीला सुरकत्या आल्या की समजावं.वास तर भरपूर येतो.हा आंबा छोट्या चाकूने कापायला मजा येते.सालीच्या आतमधे सगळाच गर असतो.आतला बाठा एकदम लहान असतो.एक शीर कापून गर तोंडात टाकल्यावर त्याची चव एव्हडी मधूर असते की,ठेवणीतला मध चमच्याने बाटलीतून काढून जीभेवर सोडल्

पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग ३

लेखक मधुरा देशपांडे यांनी मंगळवार, 14/07/2015 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २ शामोनित भटकून, फ्रेंच पदार्थ खाउन आता दुसऱ्या दिवशी काय करायचे हा प्रश्न होता. म्हणजे खरं तर मों ब्लां हे आल्प्सचे सर्वोच्च शिखर बघायचे हे नक्की होते. तिथे वर जाण्यासाठी शामोनिहून एक रोपे वे जातो, मधल्या एका ठिकाणी थांबून पुन्हा वर गेलो की आपण पोहोचतो ३७७७ मीटर उंचीवरील Aiguille du Midi ला, जिथून स्विस इटालियन आल्प्स चा Panaroma व्ह्यू दिसतो. इथून पुन्हा अजून वर जाण्यासाठी एक लिफ्ट आहे, जिने ३८४२ मीटर उंचीवरून मों ब्लां (Mont Blanc) हे शिखर जवळून बघता येते.

पावसाळा आणि कास!

लेखक शब्दबम्बाळ यांनी मंगळवार, 14/07/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा आणि सातारा हे एक सुंदर समिकरण आहे! तसं पाहिलं तर पावसाळ्यात सगळ्याच जागा सुंदर हिरव्यागार होऊन जातात पण सातार्याशी लहानपणापासून नाते असल्यामुळे तो मला जवळचा वाटतो. सातार्‍याच्या आजूबाजूला बरीच पर्यटनस्थळे उदयाला येत आहेत त्यापैकी फारच प्रसिध्द झालेलं एक म्हणजे कास पठार! हिवाळ्यात इथे उमलणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांमुळे याला बरीच प्रसिद्धी मिळाली तसेच वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणूनही घोषित करण्यात आले. हि प्रसिद्धी तारक कि मारक हा वेगळा विषय होईल त्यामुळे जाऊदे! तर वीक एंडची गर्दी टाळण्यासाठी आम्ही मंगळवारी ७ जुलैला कासला जायचा प्लान केला.

चाळीतील आठवणी .....

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 13/07/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी ..... भाग १ला मुंबईपासून दूर ठाणे जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत घनदाट जंगलात बी एम सी ची एक वसाहत होती. छोटेसे आटपाटनगरच होते ते, जेथे शाळा, मैदान,कल्याण केंद्र,वाचनालय ,शाळेची गाडी सगळ्या सोयी होत्या. कल्याणकेंद्रात कॅरम,बुद्धिबळ,टे.टेनिस,व्हॉलिबॉल,क्रिकेट,रिंग,उडीच्या दोऱ्या इ खेळ खेळायला मिळत. महिलांना शिवणकाम,भरतकाम,हस्तकला शिकवले जायचे. या वसाहतीत एक भली मोठी आंबराई होती ज्यात नारंगी,केशरी,खोबरी,आमटी (आंबट),साखरी,ढेकणी,बिट्टी,काळा, बाटली,.