Skip to main content

करशील ना?

लेखक रातराणी यांनी बुधवार, 08/07/2015 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
हातात हात घेऊन चालताना, रुतेल पायात काटा, घाई घाईने काढलास तरी चालेल, पण नंतर हळुवार मारशील ना फुंकर? नव्याची नवलाई संपत असताना, होतील असंख्य प्रश्न उभे, प्रत्येकाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण नंतर हळुवार घेशील ना कुशीत? अस्तित्वाच्या कल्पना कोलमडून जाताना, जड होईल अपेक्षाच ओझ, प्रत्येकवेळी वाटून घेतलं नाहीस तरी चालेल, पण नंतर हळुवार मन करशील ना हलक? तुला माझी माझी तुला सोबत असताना, येईल एकटेपण आगंतुकासारख, प्रत्येकवेळी डोळ्यांनी शोधलं नाहीस तरी चालेल, पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत?

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 08/07/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

माझे वडील कै. जनार्दन चिंतामण ओक यांनी साधारणपणे सन 1955च्या सुमारास आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले बाड मला माझी आई कै. मंगला ओक बेहेरे वृद्धाश्रमांत राहात असताना सहज हाती लागले. सन 2012 मधे हे सर्व लेखन टाईप करून ठेवले होते परंतु काही शब्द व पाने टायपिंग करायची राहिल्याने ते अप्रकाशित होते. आज ते कागद सहजी हाती आले व उरलेले लेखन टाईप करून तयार झाले.

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 07/07/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको.

पाऊस (शतशब्दकथा)

लेखक तिमा यांनी मंगळवार, 07/07/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पावसाचं कवतिक तुमा लोकांनला! पावसावर गानी लिवता, मोट्या मोट्या गाड्यांमदी भिजायला जाता तिकडं डोंगरात. आमाला काय त्याचं ? दर वर्साला येतोय आन जिनं हराम करतोय बगा. आत्ता, दर वरसाला झोपड्याचं पलास्टिक बदलायला पैका कुटं हाय ? औंदा पन असाच आला माज्या दादल्यासारका आन लई झोंबून ग्येलाय कुटं तरी उंडारायला! सगली बरबादी क्येली बगा माज्या संसाराची. आता नसला तरी पान्याची बोंब व्हनार.

मुझे तो हैरान कर गया वो...

लेखक गवि यांनी मंगळवार, 07/07/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नासिर काजमीने खूप गजला लिहील्या. भारतातल्या अंबाल्यात रचला गेलेला हा कवी पुढे पाकिस्तानात गेला. फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच. पण अगदी "हंगामा", "चुपके चुपके" वगैरे ग्लॅमर लाभलेल्या चार गजलांवरच मैफिलीतून उठलेल्यांनीसुद्धा नासिरची "दिलमें एक लहेरसी उठी है अभी" ऐकलेली असते. "कुछतो नाजुकमिजाज है हमभी और ये चोटभी नयी है अभी" ही अवस्था नासिरच्या काही गजल्स पहिल्यांदाच ऐकल्यावर अन वाचल्यावर झालेली असते. पण ते सर्वांना नाही जाणवणार कदाचित.

माझं बाळ

लेखक पथिक यांनी मंगळवार, 07/07/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझं बाळ अगदीच लहान आहे; अजून कड सुध्दा बदलता येत नाही त्याला. ठेवलं तिथे ते पडून राहतं. भूक लागली कि रडतं; पोट भरलं कि झोपतं, झोपून झालं कि त्याच्या अबोध नजरेने टुकुर टुकुर कुठेतरी बघत राहतं. आत्ता कुठे त्याला वस्तू आणि माणसं यांच्यातला फरक कळू लागला आहे. अगदीच अजाण आहे माझं बाळ. अगदीच निष्पाप. दुनियादारीचा, चांगल्या-वाईटाचा, कश्शाकशाचा त्याला गंध नाही. कशा प्रकारच्या जगात तो आलेला आहे हेही त्याला ठाऊक नाही. आणि या कोवळ्या मनाच्या कोऱ्या पानावर लिहिण्याची, त्याच्यावर संस्कार करण्याची, त्याचं बोट धरून त्याला योग्य वाटेने नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हि जाणीव झाली कि मन थरथरतं.

कोळ्याची पोर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/07/2015 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
“माझ्या लहानपणी माझ्या आजीने मला समुद्रातून मासे कसे पकडावेत आणि जीवनात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा हे तिच्या दृष्टीने तिने मला शिकवलं.” हल्लीच मी सातबंगल्याच्या फिशरीझ रिसर्च इंन्स्टीट्युटमधे माझ्या एका मित्राच्या मुलाला भेटायला म्हणून गेलो होतो.डॉक्टर शृंगारपुरे, म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा, इथे रिसर्च सायंटीस्ट म्हणून काम करीत आहे असं माझा मित्र मला म्हणाला होता.त्याची भेट झाली,हवी ती बोलणी झाली, आणि मी त्याचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडत होतो,तेव्हड्यात लॉबीमधे एक मुलगी माझ्या जवळून जात असताना माझ्याबरोबर हसली.मी तिला मागे वळून पाहिलं तर तिही मला मागेवळून पहात होती असं दिसलं. तिच्याश

बॉडीलाईन - ३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/07/2015 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - , अ‍ॅशॅस मालिकेत आतापर्यंत १-१ बरोबरी झाली होती. नाटकाचा तिसरा अंक रंगणार होता तो अ‍ॅडलेडच्या मैदानात! मेलबर्न टेस्टमधील विजयामुळे बॉडीलाईन बॉलिंग सुरवातीला वाटली तितकी धोकादायक नाही असा ऑस्ट्रेलियन प्रेक्षक, पत्रकार आणि क्रीडासमीक्षकांचा ग्रह झाला होता. त्यातच दुसर्‍या इनिंग्जमध्ये ब्रॅडमनने शतक झळकावल्यामुळे तर त्याला बॉडीलाईनवर उपाय सापडला आहे अशी सर्वांची पक्की खात्रीच पटली होती.