Skip to main content

तीस रुपयाची छॉटीसी गोष्ट

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 16/07/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले. ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो. सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो. यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो. तिथे अर्थातच गर्दी पसरली होती.

मदत / सल्ला हवा आहे

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 16/07/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाला उपजतच किंवा न कळत्या वयापासूनच कसली तरी भीती वाटत असते. अशी भीती ही बर्याचदा कोणाकडून तरी दाखवली गेलेली असते उदा. पाल, उडते छोटे किडे, झुरळ, अंधारी खोली, किंवा एखादी निर्जीव वस्तू देखील. अशी भीती काळानुसार कमी होते किंवा निघून जाते पण जर कळत्या वयात येउन त्या भीती मध्ये काहीही फरक पडला नाही तर काय करावे? कारण अशा वेळी ती भीती हे खिल्लीचे कारणही ठरू शकते. जर ती भीती जनमानसात उघड झाल्यास त्या व्यक्तीला उगाच त्रास देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

चुक लक्षात येणे..... (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 16/07/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
"क्रुरसिंहराजा, माझ्याकडून झालेल्या गेल्या दहा वर्षांची सेवा स्मरुण, कृपया माझा मृत्युदंड दहा दिवसांनंतर अमलात यावा, जी शिकारी कुत्र्यांची टोळी माझी लचकेतोड करणार आहे, त्यांच्या सेवेत माझे शेवटचे दिवस जावे" निष्ठारामाने विनवले.

राडा

लेखक जागु यांनी गुरुवार, 16/07/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण. आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्‍या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते. बर्‍याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात.

घरट्यातून पडलेलं पिलू

लेखक पथिक यांनी गुरुवार, 16/07/2015 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळी चालता चालता रस्त्याच्या बाजूला जांभळाच्या एका झाडाखाली पक्षाचं एक पिलू दिसलं. दोन-तीन फुटापर्यंत ते उडत होतं अन परत खाली बसत होतं. त्याच्या बाजूलाच एक बुलबुल येउन बसला. अस्वस्थपणे तो चिवचिव करत होता. बहुतेक त्या पिलाचा बाबा असावा. कारण त्याचा गळा लाल होता. मादी तशी असते कि नाही माहिती नाही. कोणी माणूस येताना दिसलं कि तो बुलबुल उडून झाडावर बसत होता अन मग परत खाली त्या पिलाजवळ येत होता. मी बाजूला पडलेली एक वाळकी डहाळी घेतली अन त्या पिलापुढे धरली. पिलू त्या डहाळीला पकडून बसलं अन मग मी ती त्या झाडाच्या फांदिजवळ नेली. पिलाने झाडाची एक बारीक डहाळी पकडली. मग मी बाजूला झालो.

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 16/07/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी अजून खस्ताच खात आहे दुकानदारी पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

सिनेमे पाहायचेत.

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 16/07/2015 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमे पाहायचेत. कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे. या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही..

शतशब्द कथा - सुट्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/07/2015 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?” “बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ! काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा. इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे.