Skip to main content

पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात??? भाग-२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 08/07/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा लेख- पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात??? पुन्हा एकदा या वर्षी ११ जुलैला मी आणि ऑफिसमधील काही उत्साही लोक्स पन्हाळगड-विशाळगड एक दिवसीय मोहीमेवर जाणार आहोत. मागच्याच वेळचा साटम सरांचा ग्रुप बोरिवलीहुन १० तारखेला निघेल आणि पुणेकरांना ऑन द वे घेउन पुढे प्रस्थान करेल. या वेळी सुद्धा एव्हढे अंतर पार करणे जमेल का? सर्व लोक तेव्ह्ढे तयारीचे असतील का? मागचा महीनाभर केलेले जॉगिंग उपयोगी पडेल का? जळवा असतील का?पाउस आणि चिखल कितपत असेल? असे प्रश्न मनात आहेतच.

मिपासार

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/07/2015 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….

कळी

लेखक सनईचौघडा यांनी बुधवार, 08/07/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अबला की सबला , वयस्क की बाला , नारी की कुमारी, ऑफिस, शाळा की पाळणाघरी, फुलायच्या आधीच कोमजली कळी , त्यांची नजरच विखारी , काळी की गोरी, शिकलेली की भोळी, मोलकरीण की अधिकारी , फुलायच्या आधीच कोमजली कळी, सावज हेरणारे हे अट्टल शिकारी, साडी असो की जीन्स तोकडे कपडे की पदडाशीन, गर्दीच्या बाजारी,की सुनसान आळी, फुलायच्या आधीच कोमजली कळी , कायमची जखम ती जिव्हारी . बोचर्‍या नजरा समाजाच्या येवु कशी माघारी? विसर म्हणता विसरु कशी, कशी घेवु नवी भरारी? अन् भय इथलं संपत नाही "निर्भया " म्हंटलत तरी * आणि ह्या ओळी पालकांना सांगुन सुध्दा ते मुलीकडे लक्ष देत नाहीत त्यांच्यासाठी.... आभाळाचा केला कागद , आ
काव्यरस

केस

लेखक रातराणी यांनी बुधवार, 08/07/2015 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा दमामी यांची डोळे जे हवे ते नेमके का तूटती केस, अन सुपलीभरुन बाथरूमात जमती केस. बंद कर चोचले आता तेल मालीशचे, सांग किती तेल पिनार अजून हे केस. दिवस वर्षांचे युगांचे जन्म जन्मीचे, कोणत्या गुणसुत्रास फितुर झाले हे केस. भेटली होती जिथे कौतुकाची थाप, का आज त्या आरशास टाळती हे केस. तू जरा नवा होऊन ये भ्रतारा, त्याच त्या न्हाव्यास माग क्रुत्रीम केस. जीवघेणे असे तू हासू नये राजा, "टकलू हैवान आला" बघ चित्कारती पोरे.
काव्यरस

(चालवून टाक चीप)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 08/07/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच सावकार आधुनीक, की मती असेल मंद गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद? हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद -- स्कैमी संकेतानंद ;) नवी दिल्ली, ०८ जुलै , २०१५
काव्यरस

रघु देसाई

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 08/07/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष होता. रघु देसाई काही महिन्यापूर्वीच जुनी कंपनी सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याने त्या कंपनीमध्ये खूप मजा केली होती. तिथलं वातावरण त्याला आवडत होतं, त्या कंपनीकडून तो ऑनसाईटपण जाऊन आलेला होता. त्याला आमच्या कंपनीमधलं वातावरण फारसं पसंत पडलं नव्हतं. त्याच्या मते आधीचीच कंपनी छान होती. "वहापे बहोत ऐश करते थे रे... अपने बाप कि जान्गीर थी जैसे, यहापे साला दिन रात मराओ, फिर भी काम खतमहि नही होता.

बॉडीलाईन - ४

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/07/2015 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - , , ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जार्डीनवर केलेला अखिलाडूवृत्तीचा आरोप मागे घेतल्याने ब्रिस्बेन आणि सिडनी इथे मालिकेतील उर्वरीत दोन टेस्ट खेळल्या जाणार हे निश्चित झालं. अ‍ॅडलेड टेस्टच्या दरम्यान बिल वूडफूल आणि पेल्हॅम वॉर्नर यांच्यादरम्यान झालेली बोलाचाली वॄत्तपत्रांपर्यंत पोहोचवण्यात जॅक फिंगल्टनचाच हात असावा अशी बर्‍याच जणांची खात्री झाली होती. त्यातच अ‍ॅडलेड टेस्टच्या दोन्ही इनिग्जमध्ये फिंगल्टनला भोपळाही फोडता आला नव्हता.