पुण्याचा एक खेडवळ म्हातारा रात्री उशीरा कसाबसा सीएसटीला उतरला. प्रवासानं दमलेला, कपडेही मळलेले. फलाटावर उतरताच त्यानं कपडे हातानं नीट केले. मुंडासं डोक्यावर घट्ट बसवलं आणि आ करून इकडेतिकडे पाहात, हातातली पिशवी सावरत तो चालू लागला.
मुंबईत मुरलेल्या टीसीच्या चाणाक्ष नजरेनं त्याला बरोबर हेरलं, आणि जवळ येताच हात आडवा करून त्या खेडुताला रोखलं.
तिकीट दिखाओ'... टीसी म्हणाला आणि म्हातारा बावचळला. खिसे चाचपून झाले, पिशवीही उलटीपालथी केली. तिकीट सापडलंच नाही.
टीसी खुश झाला.
निकालो पैसे. फाईन भरना पडेगा'... टीसी म्हणाला आणि म्हातारा रडकुंडीला आला.
'बाबा रे, पैसे नही है माझ्याकडे'... तो गयावया करू लागला.
'तो फिर चलो अंदर'... टीसीने खेडुत म्हाताऱ्याला बखोटीला धरले आणि केबिनमागच्या खोलीत ढकलून दरवाजा बाहेरून बंद केला.
काही वेळ गेला.
म्हाताऱ्यानं सदरा काढून बाजूच्या खुंटीला लावला. डोक्यावरचा फेटा अलगद उचलून तसाच गुंडाळत पिशवीत ठेवला, आणि धोतर अंथरून त्यानं सोबतची चटणी भाकरीची पुरचुंडी सोडली.
निवांत जेवण झाल्यावर बाटलीतलं पाणी पिऊन म्हातारा आडवा झाला. काही वेळातच तो घोरू लागला.
... सकाळ झाली. बाहेर गर्दी सुरू झाली होती. म्हातारा उठला. धोतर नेसला. खुंटीवरचा सदरा अंगावर चढवला. तेवढ्यात कालच्याच त्या टीसीनं दरवाजा उघडला.
'चलो'... टीसीनं म्हाताऱ्याला फर्मावलं. पुन्हा म्हातारा कावराबावरा झाला.
'कुटं जाने का?' त्यानं गबाळ्या चेहऱ्यानं टीसीला विचारलं.
कोर्ट मे'.. टीसी म्हणाला.
कायकूं कोर्टमे?' म्हाताऱ्यानं एव्हाना रूप बदललं होतं.
तिकीट नही था तुम्हारे पास. अभी कोरट सजा सुनवायोगा' टीसी हसत म्हणाला, आणि म्हाताऱ्यानं सदऱ्याच्या खिशातून तिकीट काढून टीसीपुढे धरलं!
आता टीसीनं आ वासला होता.
मग म्हाताऱ्यानं डोईवरचं भलंमोठं मुंडासं अलगद वर उचललं, आणि उलटं करून टीसीसमोर धरलं.
आत हजाराच्या नोटांची बंडलं नीट रचून लावली होती.
भैया, मुंबई मे मेरा नातेवाईक काल स्टेशनपर आनेवाला था. पन त्यो आला नही. मेरेकू उसका पत्ता मालूं नव्हता. ही जोखीम घ्यून रातीच्याला कुठं भायेर पडायचं मजी लई धोका था. बरं झालं, तुझ्यामुळं मी सुरक्षित राहिलो...'
पुणेकर खेडुतानं खिशातून शंभराची नोट काढून टीसीच्या हातात कोंबली.
टीसी गांगरलेलाच होता.
’घे बाबा.. खुशीसे दे रहा हू'... पुणेकर खेडूत हसत म्हणाला आणि फेटा डोक्यावर घट्ट बसवून बाहेर पडला.
... पुणेकर रॉक्स, मुंबैकर शॉक्स!
वाचन संख्या
5112
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
...पुणेकर रॉक्स, मुंबैकर शॉक्स!
अनुमोदन!
In reply to ...पुणेकर रॉक्स, मुंबैकर शॉक्स! by आदिजोशी
भारी...पुणेकर असतातच चतुर!!
:)
याच्यावर एक सिनेमा काढा. सतीश
जेम्स कॅमेरॉनला डावलल्याबद्दल
In reply to याच्यावर एक सिनेमा काढा. सतीश by आदूबाळ
नोलानकाकांच्या ख्रिस्तोफरचा उल्लेख पण नाही?
In reply to याच्यावर एक सिनेमा काढा. सतीश by आदूबाळ
अल्फ्रेड हिचकॉक हवाच :D
In reply to नोलानकाकांच्या ख्रिस्तोफरचा उल्लेख पण नाही? by बोका-ए-आझम
शेवटला परिच्छेद पहा इथला...
१)पुण्यात मुंडासं बांधून अन्
मला १ नाय समजत पुणे नावाची
नदीच्या पलीकडचा
In reply to मला १ नाय समजत पुणे नावाची by भीमराव
मला तर वाटलेलं
In reply to नदीच्या पलीकडचा by मृत्युन्जय
सपे ?? म्हणजे काय ?
In reply to मला तर वाटलेलं by बोका-ए-आझम
अनुमोदन अनुमोदन अनुमोदन
देवा, चरणकमल कुठायत तुमचे,
बाष्कळ
मा़कड म्हणतय माझीच लाल
अशीच गोष्ट मी पूर्वी वाचली /
आवडली.
मलाही...
टिसी मुम्बै चा होता का ?
फेट्यात हजाराच्या नोटा ठेवणे
अशीच एक कथा
पण बँकाही आता शहाण्या झाल्यात
In reply to अशीच एक कथा by पैसा
चांगली माहिती....
In reply to पण बँकाही आता शहाण्या झाल्यात by असंका