दोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी
दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांच्या काही कविता
लेखक :- मिसळलेला काव्यप्रेमी
अभिवाचन :- मोनु
दृकश्राव्य विभाग :- लिफ्ट.. (भयकथा)
दृकश्राव्य विभाग :- लेहची भटकंती
Roads were made for journeys not destinations' - Confucius
हे विचार ज्याला पटले तोच खरा प्रवासप्रेमी. या प्रवासाचं वेड फार वाईट. ते एकदा लागलं ना की मग तुम्हाला 'कुठच्या कुठे' आणि 'कुठे कुठे' घेऊन जाईल, तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही. असाच एक प्रवासप्रेमी मिपाकर अभिजीत अवलिया स्वतःची गाडी घेऊन, सहकुटुंब, पुणे - लेह - पुणे असा प्रचंड प्रवास करून आलाय.
त्याच्या या जबरदस्त प्रवासाची कहाणी ऐकूया त्याच्याच कडून.
बकलावा
बकलावा नाव ऐकलं, तर सर्वसाधारणपणे काय येते डोळ्यासमोर? पण हे मध्यपूर्वेतील एका मिठाईचे नाव असून ती अतिशय स्वादिष्ट असते, हे समजल्यावर तिचा शोध घेणे क्रमप्राप्त होते.
पिट्सबर्ग
सिनेमावाला विज्या
"विज्या, आज कॉप्या पुरवता नाही येत आपल्याले" मी धावतच सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या विज्याच्या गँगला सांगितले.
"कोण अडवते बे आमाले?” पोरे माझ्यावरच ओरडली.
"थांबा बे पोट्टेहो." विज्याच्या एका आवाजात पोरे चूप. त्याने त्याच्या बच्चन कट केसातून हात फिरविला, डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, विडीचा धूर सोडला आणि मला विचारले,
"पण काहून बे बारक्या?"
"मास्तर सांगत होता, आज इन्सपेक्टर येनार हाय."
बघतो जिकडे तिकडे दिसती ...
बघतो जिकडे तिकडे दिसती मनातले ना कळणारे
कळता सुखात असतो हल्ली नशिबावर जळफळणारे ..
संधी साधत जगती येथे त्यांच्या पदरी यश पडते
अचूक वेळी संधीचा ते वारा बघुनी वळणारे ..
शब्द मधुरही कानी पडता टपके लाळ तोंडातुनी
पिकल्या पानी मनात हिरवळ आढळती पाघळणारे ..
प्रामाणिक राहून ते जरी करती काम इमानाने
पाठी लागत असती त्यांच्या काही काही छळणारे ..
पुरंदराचं तेजस्वी पातं!
मुरारबाजींचं व त्यांच्यासमवेतच्या सर्व मावळ्यांचं अतुलनीय शौर्य म्हणजे एक दीप्तीमान तुरा आहे स्वराज्यगाथेतला!
त्यातून प्रेरणा न मिळालेला मराठी माणूस विरळाच. त्याच शौर्याचं वर्णन करायचा एक अल्प प्रयत्न. त्यांना शत-शत नमन. _/\_
कफन बांधुनी आलेला.. कफनातच गेला..
शत्रूचा आवेशही गळला.. कफनातच मेला..
संख्येची ना तमा तयाला..आता वज्राघात!
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!