भाऊबीज

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे
मला पाहवेनात ते चेहरे
गळाभेट होता स्वतःची स्वतःशी
किती व्हायचे कावरेबावरे

तुझा श्वास होई कुणाची रुबाई
उसासा गझल अन मिठी स्पंदने
कुणी ओठ ओठांत घ्यावेत अलगद
कुणी उतरवावीत आभूषणे

खुला केशसंभार रजनी कुणाची
कुणा चोरटा स्पर्श तो आवडो
कुणी फक्त यावे, कुस्करून जावे
कळ्या सापडो वा फुले सापडो

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - आन्जीच्या गोष्टी

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखिका - आतिवास
अभिवाचन - अनुष्का सचिन पत्की (इयत्ता ६ वी), वाशी, उस्मानाबाद

आप्ल्या मिपावर एक लई इपितर कार्टी हाय. बरोब्बर १०० शब्दात बोलती. पण असं बोलती की ज्याचं नाव ते! मिपा दिवाळी अंकात बोलायला मिळणार म्हण्लं की बराब्बर आली . कशी चुरुचुरु बोलती बगा!

उनाडटप्पू

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


"उभ्या लाइफमध्ये काहीतरी आडवं केलं पाहिजे"
असं म्हणून लौकिक खाली बसला. त्याने त्याची निळ्या रंगाची, उजव्या पायातील स्लीपर हातात घेतली. स्लीपरचा बंद बाहेर आला होता, तो जागच्या जागी बसवू लागला.
"भावा... मर्दा.... करू या काहीतरी" लौकिकच्या खांद्यावर हात ठेवत प्रतीक म्हणाला. लौकिक आणि प्रतीक नेहमीसारखे 'विपुल की चाय' टपरीवर चहा घेत होते. हा त्यांचा नेहमीचा कट्टा होता.

हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

.
एखाद्या माणसामध्ये जिद्द असेल, हिंमत असेल, तळमळ असेल तर नियती त्याला कुठून कुठे नेते, ह्याचे अतिशय तेजस्वी उदाहरण म्हणजे हेईनरिश हारर! स्वामी विवेकानंदांनी निर्भयता हा गुण धार्मिकतेचा मुख्य सद्गुण सांगितला गेला आहे. कशालाही आणि मृत्यूलाही न घाबरणारा माणूसच खर्‍या अर्थाने धार्मिक असतो. आणि जेव्हा एखादा माणूस असा असतो, तेव्हा नियतीसुद्धा त्याला जीवनाच्या रंगमंचावर अतिशय अद्वितीय अशी भूमिका बहाल करते!

दृकश्राव्य विभाग : आगळी वेगळी दिवाळी! (दिवाळी फोटो)

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2

नमस्कार मिपाकरहो,

दृकश्राव्य विभाग :- पाककृती - लवंगलतिका

इशा१२३'s picture
इशा१२३ in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2

मिपाची सुगरण इशा दरवेळेस आपल्यासाठी नव नवे पदार्थ घेऊन येत असते. यंदा ती घेऊन आली आहे एक बंगाली पारंपारीक पाककृती : लवंगलतिका !!

Footer

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - क्रान्ति यांच्या काही कविता

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2
कवयित्री:- क्रान्ति
अभिवाचन :- यशोधरा

आपल्या प्रतिभेने आणि दर्जेदार कलाकृतींनी मिपा आणि मिपा बाहेरच्या साहित्यिक जगात आपला खास ठसा उमटवणार्‍या क्रांती यांच्या काही कविता सादर करत आहेत यशोधरा:

ऐल पैलः

रेशीमगाठी:

तुझे भास होते:

Footer