मी भूत पाहिलंय, तुम्ही?

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in लेखमाला
29 Oct 2016 - 12:15 am

दर वर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी न जाता माझ्या मूळ गावी 'साखळी'ला, जिथे माझे काका-काकू, आजी- आजोबा राहतात, तेथे गेलो. मामाच्या घरी का नाही गेलो? याचं उत्तर काही माझ्याजवळ नाही, पण मागल्या वर्षी काकांनी मला 'साखळी'ला बोलावल्यावर काकू म्हणाली, "तो कसला येतोय? मामाला दोन मुली असल्यावर....." झालं. काकूंनी असा टोमणा मारल्यावर कोण जातंय हो मामाच्या घरी. मग ठरवलं की या वर्षी उन्हाळा काकांच्याच घरी.

भूत

भृशुंडी's picture
भृशुंडी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:14 am

भूत
"मला तुला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला भुतं दिसतात." चेहर्‍यावरची सुरकुतीही न हलवता मराठे मला म्हणाला. आम्ही हापिसातल्याच एका सोफ्यावर बसून दुपारचा चहा पीत होतो. गेले दोन आठवडे मी आणि मराठे इथे बसून चहा घेतो. बाकी हापिसातले लोक्स शिष्ट आहेत साले. माझ्यासारख्या नव्याकोर्‍या अ‍ॅप्रेंटिससोबत बोलायला जीभ झडते साल्यांची. मराठे तसा बरा वाटला - कामापुरता संंबंध आल्यावर त्यानेच एकदा "चहा?" म्हटल्यावर मीही फार भाव न खाता गेलो.
पण आजच्या चहाची चर्चा वेगळीच निघाली.

निरंक

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in लेखमाला
29 Oct 2016 - 12:13 am

निरंक
०१

मोठ्या कष्टाने त्याने पापण्या उघडल्या. खूप दिवसांनंतर. त्याला तरी निदान तसंच वाटलं.
आधी नुसतंच झावळ झावळ. मग हळूहळू दिसू लागलं.

छत? हो, छ्तच.

कुठे आहोत आपण?

हे काही आपलं घर नाही. छताच्या प्लास्टरचे असे पोपडे पडलेले. लोखंडी सळ्या अशा गंजत उघड्या पडलेल्या. छे! हे आपलं घर नाही!

दंगल

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in लेखमाला
29 Oct 2016 - 12:11 am

दंगल

भाग १ (सुरुवात) :-

अ‍ॅन ऑफिसर्स वाईफ.

अस्मिता आळस देत कूस बदलती झाली, तेव्हा राजेश उठला होता. तिच्या झोपी गेलेल्या पण शांत चेहर्‍यावर मिलनाची गोडी विलसत होती, तिचे ते रूपडे डोळ्यात साठवत राजेश उठला अन अलगद पावलांनी बाथरूममध्ये गेला, त्याने स्वतःला न्याहाळले. दाढी अंमळ वाढलीच होती. त्याने हळूच ट्रिमर सुरू केले.

घरचा हेर

रातराणी's picture
रातराणी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:08 am

घरचा हेर

"किसना, किसना हे"

तिरिमिरीत चाललेल्या किसनानं आबांची हाक ऐकून मागं वळून पाह्यलं. पण गडी थांबला नाय. धुसफुसत तसाच चालत राह्यला.

वेग वाढवून आबांनी किसनला गाठलं.

"असं काय करता किसनराव? चला आता घरी. शांत व्हा."

"हं! ह्या!"

"किसनराव, चला म्हणतो ना. तथं सूनबाईच्या डोळ्यांचं पाणी राहीना किती वाडुळ. आन तुमी आसं ल्हान पोरावानी तरातरा उठून आलाय. आमी म्हातार्‍या माणसांनी आता तुमच्या मागं कुठंवर पळायचं... घ्या जरा शांततेत. संसार म्हणला की भांड्याला भांडं लागायचंच. "

"आबा, तुमी म्हणून म्या ह्या घरात थांबलोय. नायतर कवाच निगालू हुतो पंढरीला."