समोसा

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in लेखमाला
29 Oct 2016 - 12:25 am

समोशाचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत - १) पंजाबी समोसा २) पट्टी समोसा.

पंजाबी समोशासारखेच 'दिसणारे' दुसरे समोसे म्हणजे लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा.

पंजाबी समोसा, लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा ह्यांना एकच संज्ञा वापरली जाते, ती म्हणजे 'पंजाबी समोसा'.

मुगाचे पौष्टिक लाडू

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in लेखमाला
29 Oct 2016 - 12:24 am

मुगाचे पौष्टिक लाडू

साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या) डाळीच्या पिठापासून बनवले जातात. परंतु मी (खरे तर माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून हे लाडू अधिक पौष्टिक बनवले आहेत.
हे लाडू उपवासालाही चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणार्‍या स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत.

.
साहित्य:

नागपूरची स्पेशल संत्रा बर्फी

अनन्न्या's picture
अनन्न्या in लेखमाला
29 Oct 2016 - 12:23 am

सर्व मिपाकरांना ही दिवाळी आनंदाची जावो!!

.
नागपूरवारीत हमखास आणली जाणारी मिठाई म्हणजे संत्रा बर्फी!! पण आम्हा कोकणातल्या मंडळींना नागपूर फारच लांब! त्यामुळे आता घरी केल्याशिवाय काही संत्रा बर्फी मिळणार नाही. या दिवाळीसाठी घेऊन आलेय खास मिपाकरांसाठी!!!!!

अॅपल केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in लेखमाला
29 Oct 2016 - 12:22 am

अ‍ॅपल केक प्रकार २
अॅपल केक प्रकार १ येथे पाहता येईल.

साहित्य :

१०० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ३ अंडी, १ चमचा लिंबाचा रस, चिमूटभर मीठ, २०० ग्राम मैदा, १/४ कप दूध,
२ चहाचे चमचे (सपाट/फ्लॅट) बेकिंग पावडर
४-५ मध्यम आकाराची सफरचंदे

कृती :

शिरवाळ

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in लेखमाला
29 Oct 2016 - 12:21 am

शिरवाळ

"चार पुरी हाईत, पाचवं पोरगं हु दी गं म्हासळाये"

वाळून गेलेल्या लिंबाखाली शेंदूर फासलेला दगड लालबुंद होऊन गेला होता. फराकीतल्या चारी पोरी कडंनं कोंडाळं करून बसल्या होत्या.
"आमुश्याला व्हात्या पाण्यात चार लिंब उतरून टाका" जवळच बसलेल्या बामणानं अंगारा लावला.

म्हातारी उठली. पुडीत अंगारा बांधून पायर्‍या उतरून खाली आली. फराकीतल्या चारी पोरी तिच्या मागोमाग चालू लागल्या.

धोंडा

आतिवास's picture
आतिवास in लेखमाला
29 Oct 2016 - 12:20 am

“आपल्याकडं दिवाळीला नंदाताई येणार आहे राहायला. तिला त्रास द्यायचा नाही बरं का”, जेवण करताना आईनं सांगितलं. कैतरी म्हत्त्वाचं असलं की जेवणाच्या येळी समद्यांना सांगायची आईला सवय हाये. म्हणजे नंदाताई म्हत्त्वाची असणार.
पण ही नंदाताई कोण? म्या तर कंदी बगितली नव्हं.
“ही कोनाय?” म्या दादाला हळूच इचारलं.
माजं हळू म्हंजे आज्जीच्या भाषेत ‘जाहीरनामा’ – म्हंजे बोंबाबोंब.
“आपल्या सुमन आत्त्याची मुलगी,” दादा म्हन्ला.
“म्हंजे मेलेल्या आत्त्याची?” म्या इचारलं.
येकदम लई कायकाय झालं.

कळलावी

शिवकन्या's picture
शिवकन्या in लेखमाला
29 Oct 2016 - 12:19 am

कळलावी

[Richard Mathesonच्या Button Button या इंग्लिश कथेचा हा मराठी अवतार. याच कथेवर आधारित ‘The Box’ नावाचा चित्रपट २००९मध्ये प्रदर्शित. अधिक माहितीसाठी गुगला.]

फ्लॅट नं.२१७समोर एक पार्सलचे खोके येऊन पडले. चहूबाजूंनी सीलबंद. नाव आणि पत्ता हस्ताक्षरातच होता. ‘श्री. सतीश देवताळे आणि सौ. अनुजा देवताळे, २१७ अ, गांधी मार्ग, नागपूर’. संध्याकाळी ऑफिसहून परतताना अनुजाच्या नजरेस ते पार्सल पडले. आपले नाव आणि पत्ता पाहून तिला जरा आश्चर्यच वाटले. हे पार्सल कुणी पाठवले असेल, असा विचार करत करत तिने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि पार्सल घेऊन आत आली.

अत्तर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in लेखमाला
29 Oct 2016 - 12:18 am

दूरवरून शहरात माणसांचे लोंढे ने-आण करणार्‍या रेललाइनी. त्यावरून लोंबकणार्‍या विजेच्या तारा. कर्कश किंचाळ्या मारीत माणसे कोंबलेले टिनपाटाचे डब्बे ओढीत नेणारी लोखंडी धुडे. एक गाडी गेली की दुसरी केकाटत येईपर्यंत किती वेळ जाणार हे ठरलेले. गाडी जाणार असली की रेललाइनला लागून असलेल्या झोपड्यातली मुले रेललाइनच्या बाजूंनी टेहाळणी करीत फिरायची. अर्धी खाऊन प्लास्टिकच्या पिशव्यात फ़ेकलेली फळे, कागदात गुंडाळलेली पोळीभाजी, काहीबाही मिळत राहायचे. चुकूनमाकून एखादेवेळीस कोणाचे पडलेले पाकीट किंवा पिशवी वगैरे मिळालीच, तर मुलांमध्ये त्यासाठी दणकून फाईट व्हायची.

ऑपरेशन ब्लाइंड हॉक

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:17 am

'स्टोक'.. अवघ्या काही हजारांची लोकसंख्या असलेलं एक छोटंसं गाव. लडाखची राजधानी लेहपासून साधारण वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं खेडेगाव. तसं पाहायला गेलं तर 'स्टोक' (किंवा काही जण याचा उच्चार 'स्टाक' असाही करतात) अगदीच काही अज्ञात किंवा दुर्लक्षित नाहीये. माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी येणारे बहुतांश गिर्यारोहक आधी सरावासाठी म्हणून 'स्टोक कांगडी' या शिखरावर चढाई करतात. हिमालयाच्या रौद्र निसर्गाने भरलेल्या आणि भारलेल्या स्टोक पर्वतराजीमधलं हे एक उत्तुंग शिखर. त्यामुळेच असेल कदाचित, पण ....