Skip to main content

वहाणा

Published on 20/12/2007 - 10:40 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष. ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडीकल् रीप्रेझेन्टीटीव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्‍या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा (कितीतरीव्यांदा ! ) वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.

याद्या 15163

बोलीभाषेची गोडी

Published on 20/12/2007 - 09:43 प्रकाशित मुखपृष्ठ
लोकहो !!! मागे श्री. नामदेव ढसाळ यांच्यावरील लेखनाच्या अभिप्रायात "गोलपिठा' हा मैलाचा दगड या शब्दावरून काही चर्चा झाली. आता मैलाचे अंतर कोणी वापरत नाही आता किलोमीटर आले. त्यामुळे मैलाचा दगड हा शब्द टाकाऊ झाला आहे असा सूर तिथे दिसला. लोकहो, एक लक्षात घ्या की भाषेला सौंदर्य हे परंपरेनुसार येत असते. सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा असते. ती खरी सुंदर असते. कारण ती थेट माणसाच्या हृदयातून आलेली असते. तिला मेकअप केलेला नसतो. त्यामुळे काही वस्तूंची परिमाणे काळानुसार बदलली तरी भाषेने स्विकारलेले शब्द अत्यंत शुद्ध स्वरूपात राहतात.

याद्या 7720

हात तुझा हातात......

Published on 19/12/2007 - 21:55 प्रकाशित मुखपृष्ठ
हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा? आनंदाने जगण्यापुरती.... भाकर दे मजला मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला कसे जमावे माझे येथिल परक्या उपर्‍यांशी? माय मराठी ज्यांची ते ते...मैतर दे मजला किती राहिले सांग अजूनी जगायचे येथे असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला आचमनाला इथे 'अगस्ती' कधिचा बसलेला दे ! दे ! नियती दु:खाश्रूंचा... सागर दे मजला ----अगस्ती
लेखनविषय:

याद्या 10875

आर. एन. पराडकर एम्.पी. ३

Published on 19/12/2007 - 21:21 प्रकाशित मुखपृष्ठ
मंडळी, आर. एन. पराडकरांची एम्.पी. ३ हवीत. कोणाकडे असल्यास कळवा. "गगनीते नंदादीप जळती" ऐकून बराच काळ लोटला. संजय अभ्यंकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6270

विष्णुगुप्त - १

Published on 18/12/2007 - 10:59 प्रकाशित मुखपृष्ठ
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं.
लेखनविषय:

याद्या 22816

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

Published on 18/12/2007 - 10:14 प्रकाशित मुखपृष्ठ
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

याद्या 8116

नेमेची येतो मग संकल्प

Published on 18/12/2007 - 07:10 प्रकाशित मुखपृष्ठ
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प. १५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?" आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच. हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो.

याद्या 3835

आपण यांना पाहिलंय का?

Published on 18/12/2007 - 01:57 प्रकाशित मुखपृष्ठ
मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय.. आपण यांना पाहिलंय का? ********* अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं.. तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं... जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण... माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का? रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का?? चिंब पावसात भिजुन..
लेखनविषय:

याद्या 4403
Taxonomy upgrade extras

समभागांची चर्चा..

Published on 17/12/2007 - 20:09 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार संजय अभ्यंकर साहेब, तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला? तो कितीने स्प्लीट होतोय? संजय अभ्यंकर आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल. असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.. आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे.

याद्या 16957