लोकहो !!!
मागे श्री. नामदेव ढसाळ यांच्यावरील लेखनाच्या अभिप्रायात "गोलपिठा' हा मैलाचा दगड या शब्दावरून काही चर्चा झाली.
आता मैलाचे अंतर कोणी वापरत नाही आता किलोमीटर आले. त्यामुळे मैलाचा दगड हा शब्द टाकाऊ झाला आहे असा सूर तिथे दिसला.
लोकहो, एक लक्षात घ्या की भाषेला सौंदर्य हे परंपरेनुसार येत असते. सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा असते. ती खरी सुंदर असते. कारण ती थेट माणसाच्या हृदयातून आलेली असते. तिला मेकअप केलेला नसतो.
त्यामुळे काही वस्तूंची परिमाणे काळानुसार बदलली तरी भाषेने स्विकारलेले शब्द अत्यंत शुद्ध स्वरूपात राहतात. मैलाचा दगड हे त्याचेच उदाहरण.
असे अनेक शब्द तुम्हाला मराठीत आढळतील ज्यांना स्वत:चा असा ठसा आहे. माजघर हा शब्द पहा. आज आपल्या घरात माजघर राहिलेले नाही. पण किती उदात्त कल्पना माजघरातून व्यक्त होते. ती आजच्या "हॉल"मधून होत नाही.
तर ही जी बोलीभाषा रूढ झालेली आहे, त्यात आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. ती समजून घेऊन आणि तिचा वापर करून पुढील पिढीकडे सुपूर्त व्हावी असे आम्हाला वाटते.
तुमचे मत काय आहे ते नोंदवा. मिसळपाववरील जाणकार व्यक्तिंचा या चर्चेत सहभाग अपेक्षित आहे.
आपला,
(शब्दप्रेमी) धोंडोपंत
वरील मजकूर अत्यंत घाईत टंकित केला आहे, गडबडीमुळे टंकलेखनात चुका असण्याची शक्यता आहे. पुन्हा वाचून त्या दुरूस्त करायला वेळ नाही आहे. पाच मिनीटात मार्केट सुरू होणार आहे. मुद्दा महत्वाचा म्हणून चर्चा चालू करून आम्ही जात आहोत. काही चुका असल्यास समजून घ्या.
धोंडोपंत
वाचने
7727
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रवाहित्व
बोलीभाषा अधिक आपुलकिची!
असोला म्हणजे न सोललेला सोडणासकट असलेला नारळ.
In reply to बोलीभाषा अधिक आपुलकिची! by विसोबा खेचर
बोली भाषा गोडच आहे
आवडले.
In reply to बोली भाषा गोडच आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर प्रतिसाद...
In reply to बोली भाषा गोडच आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कांबेरू = कामेरू
मुक्तसुनितराव,
In reply to कांबेरू = कामेरू by मुक्तसुनीत
वा वा