आपण यांना पाहिलंय का?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय..
आपण यांना पाहिलंय का?
*********
अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं..
तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं...
जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण...
माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का?
रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का??
चिंब पावसात भिजुन.. मग भुट्टा खाणं...
चौपाटीवरचा गोळा भुर्ऱर्ऱर्ऱ करुन चोखण...
केवळ पैजेखातर पेप्सि बॉटल एका दमात रिचवणं...
नंतर न थांबणार्या ढेकरा आता कायमच्या थांबल्यात का?
क्षणिक सुखाच्या मागे धावताना खरा आनंद हरवला आहे.. आपण यांना पाहिलंय का??
WWF च्या कार्डांची संपत्ती आनंदानं साठवण...
खिसाभर चिंचांसाठी अख्खि टेकडी चढुन जाणं...
एका सायकल साठी भरपुर अभ्यास करणं....
ती आणल्याच्या आनंदात बाबांना मारलेली मिठी आता सैल झाली आहे का?
मोटारी मागे धावताना याच सायकलने दीलेलं समाधान विसरलो आहे... आपण यांना पाहीलंय का??
केसांतुन लाडाने फ़िरणार्या आईच्या हातांनी मिळणारी शांतता हरवली आहे...आपण यांना पाहीलंय का??
डिस्कोच्या गोंगाटात मंदीराच्या घंटेचा नाद हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का??
कॅक्टस ब्युटीच्या जमान्यात मोगर्याचा सुग़ंध हरवला आहे... आपण यांना पाहीलंय का??
हास्यक्लबच्या कल्लोळात निर्व्याज हसु हरवलं आहे... आपण यांना पाहीलंय का?
आता काय काय सांगु...
ह्या जनसागरातही एकटा असणारा मी...
माझा मलाच शोधतो आहे.. माझा मीच हरवलो आहे... आपण खर्या मला पहिलंय का??
-ऋषिकेश
(०५-जून-२००७)
***
वाचने
4401
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
आवडली
वा !
सुंदर!
अती उत्तम