दुर्ग - ढाकोबा आणि दार्या घाट हा एक छान रूट आहे. दुर्ग वरुन ढाकोबा ची वाट सापडता सापडत नाही. दैव चांगलं म्हणून आम्हाला जागोजाग स्थानिक माणसं भेटत गेली. नुकतीच क्लिक्सची खरेदी केल्यैय. त्यामुळे खाण्यापिण्याचा तर नुसता माज केला. उकडलेली अंडी, कॉफी, श्रीखंड, भाकर्या, चटणी आणि मॅगी यांनी बहार आणली.मागच्या महिन्यात पावसामुळे ढवळ्या घाटाचा प्लॅन फसला त्यामुळे लई शॉट बसला होता. पण आता जरा छान वाटतंय. डोंगरात भटकणे हा आमचा खास स्किलसेट असला तरी छायाचित्रण हा आमचा प्रांत नाही. किंबहुना फोटो काढायचा कंटाळाच येतो. दोस्तांनी काढलेले फोटो पाहत बसणं मात्र फारच आनंददायक.
नास्तिकता