Skip to main content

दुर्ग - ढाकोबा आणि दार्‍या घाट

लेखक अप्पा जोगळेकर यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्ग - ढाकोबा आणि दार्‍या घाट हा एक छान रूट आहे. दुर्ग वरुन ढाकोबा ची वाट सापडता सापडत नाही. दैव चांगलं म्हणून आम्हाला जागोजाग स्थानिक माणसं भेटत गेली. नुकतीच क्लिक्सची खरेदी केल्यैय. त्यामुळे खाण्यापिण्याचा तर नुसता माज केला. उकडलेली अंडी, कॉफी, श्रीखंड, भाकर्‍या, चटणी आणि मॅगी यांनी बहार आणली.मागच्या महिन्यात पावसामुळे ढवळ्या घाटाचा प्लॅन फसला त्यामुळे लई शॉट बसला होता. पण आता जरा छान वाटतंय. डोंगरात भटकणे हा आमचा खास स्किलसेट असला तरी छायाचित्रण हा आमचा प्रांत नाही. किंबहुना फोटो काढायचा कंटाळाच येतो. दोस्तांनी काढलेले फोटो पाहत बसणं मात्र फारच आनंददायक. आमचा दोस्त 'सौरभ आगटे' याने काढलेले फोटो येथे डकवत आहोत. निरंजन मोहरे सौरभ आगटे सौरभ जोगळेकर यतिन नामजोशी गणेश अभ्यंकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4941
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

अप्पा .. सगळे फोटू अप्रतिम... सोबत वर्णन आणि माहिती लिहिली असती तर अजून बहार आली असती...

In reply to by स्पा

सहमत. या फटुंमुळे सौरभ उर्फ अप्पा जोगळेकरांचे दर्शन झाले.

साहेबा, जरा ट्रेक चं वर्णन केलं असतं, आणि मग मध्ये मध्ये फोटो पेरले असतेस तर धमाल आली असती. पहिले तीन, मधला तो पक्ष्याचा आणी शेवटचे दोन फोटो तर खासच.

तो बैलगाडीवाला सक्काळ सक्काळचा फोटो भार्री आहे. स्पा म्हणतो त्या प्रमाणे एकाएका फोटोखाली एक प्यारा लिहीला असता तर आणखी मजा आली असती. :)

अप्पा मस्त रे. वर सगळे म्हणत आहेत तसेच म्हणतो. थोडेफार वर्णन आले असते आणि दोन फोटुंमध्ये थोडी मोकळी जागा ठेवता आली असती तर अजुन बहार आली असती. फोटु अप्रतिमच आहेत. विशेषतः पहिल्या फोटुतील एका मित्राची टोपी बघुन हा फोटो काश्मीरातला म्हणुन सुद्धा खपुन जाईल असे वाटते. मात्र पहिलाच प्रयत्न असल्याने हरकत नाही :) आम्ही तर साले येवढे पण करत नाही. तुम्हा भटक्या मिपाकरांच्या जिवावर आम्ही सहलींची मजा लुटून घेतो झाले.

मस्तच फोटु .. चिमुरडीचा जास्त आवडला!

तुमचे फोटो आणि वर्णन ऐकून जुन्या ट्रेकच्या आठवणी झाल्या. नुकतीच पाहिलेली ही एक अप्रतिम लिंकः नक्की पहाचः http://natharishchandragad2010.blogspot.com/

मस्त फोटो रे आप्पा! बाकी वरच्या सर्वांसारखंच म्हणतो. पुढल्या वेळी चार चार वाक्य सुद्धा लिही.

एकंदरीत ट्रेक झक्कास झालेला दिसतोय. प्रत्येक फोटु खाली २-४ वाक्ये टाकली असतीस तर अजुन मजा आली असती. ( वरील सगळ्यांच समाधानही झालं असत)

आपल्या कॅमेर्याचे मॉडेल कुठले आहे ते सांगावे. फोटो चांगले आहेत. आवडलेले फोटो : १. पक्षाचा २. लहान मुलीचा ३. गडाचा ( शेवटचा) ४. बैलगाडी चा ५. सूर्य डोंगरामागे असताना काढलेला

वरचे सर्व फोटो ' सौरभ आगटे ' ( निळा फुल बाह्यांचा टीशर्ट घातलेला ) याने काढलेले आहेत. त्याच्या वतीने सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. पुढच्या वेळेला डिस्क्रिप्शन सुद्धा टाकण्यात येईल.

मस्त फोटो अप्पा. बैलगाडीवाला खूपच छान.

झकास रे अप्पा, जीवधन आणि वानरलिंगीचे सर्वच फोटो अप्रतिम. दार्‍या घाटाचे फोटो टाकले नाहीस रे पण, तुम्ही दार्‍या घाट चढून दुर्ग धाकोबा केलात का उतरून, तसेच दुर्गच्या अगदी जवळ असलेली खुट्याचे दार ही घाटवाट पाहिलीत का?