काही वर्षापुर्वी दुसर्या नोकरीतल्या हापिसात बसुन संगणकाशी जुंपलेलो असताना योगेश नि आवाज दिला,
"अरे तुझा फोन आहे"
मोबाइल असताना मला हापिसात कोन फोन करेल विचार करत मि फोन उचलला..
"हेलो"
"मिल्या, शिवा बोलतोय"
"*** तु मोबाइलवर फोन का नाही केलास?"
"अरे सहज, बघत होतो कि तु नक्की ऑफिसमधेच असतोस कि इकडे तिकडे टवाळक्या करतोस"
"झाली का खात्रि? बोल आता"
"चल येतोस का घरी, मि निघत आहे आता"
"अरे नाही यार, आज थोडा उशीरच होइल, तु हो पुढे"
"चल ठीक आहे.. सॉरी यार"
"कशाबद्द्ल?"
"काही नाही.. सॉरी "
"ये येड**, नीट बोलशील का?"
" काही नाही रे, सोड.. बर तुला एक मेल केली आहे.. बघितली का?"
"नाही, मला काही नाही आले"
"बर, लिहुन घे माझा आय डि आणी पासवर्ड, आणी तिथुन चेक कर"
"का? तिथुन का"
"अरे तु घे आणी बघ"
"ठीक आहे"
त्याच्याकडुन मेल आयडी आणी पासवर्ड घेतले आणी परत जागेवर आलो.
---------------------------------------------------
सकाळी सकाळी अंघोळ करत असताना, आईने आवाज दिला
"अरे शिवा आला आहे, वाट बघत आहे तुझी"
अंघोळ करुन बाहेर आलो, शिवा टि. व्हि पाहत आईने दिलेले पोहे हादडत बसला होता.
"मिल्या, चल तयार हो, जावु या एकत्र"
"अरे मला अजुन थोडा वेळ लागेल, तु हवतर हो पुढे"
"नाही मि थांबतो, तु हो तयार"
पटापट मी आवरुन घेतले आणी आम्ही निघालो.
त्याच ऑफिस चर्चगेटला तर माझ चर्नी रोडला, नेहमीप्रमाणे बस पकडुन ठाणे स्टेशनला गेलो आणी तिथुन सिसटी फास्ट लोकल. दरवाज्यात आम्ही दोघ फुटबोर्डवर फक्त एका पायाचा अर्धा तळवा ठेवुन मस्त पैकी लटकलो होतो, गाडी स्टेशन सोडेपर्यंत त्यानी तोंडात एक माणीकचंद टाकला,
"काय रे मिल्या, कशी वाटली आपली अलिबागची ट्रिप ?"
" बेक्कार मजा आली यार, २-३ महिन्यातुन आपण एकदा तरी आपण असे फिरायला जात जावु या !!"
कुर्ला सोडल तस शिवा बोलला, "चल आत जावु "
आत गेलो तस त्यानी मला पहिल्यांदा त्याच्या कंपनीचे कार्ड दिले, कार्ड च्या मागे कंपनीच्या मालकाचा मोबाइल नंबर लिहिलेला होता.
दादर ला लोकल बदलली, पुढच स्टेशन चर्नी रोड येणार होत तेव्हा त्यानी कधी नाही तस हातात हात घेतला आणी बाय बोलला, मि पण मस्करीत बाय बोललो.
उतरण्यापर्यंत २-३ वेळा परत तसच... शेवटी उतरलो आणी ऑफिसात शिरलो.
----------------------------------------------------------------
शिवा, मी आणी एकाच वयाच्या ४-५ पक्क्या मित्रांचा कंपु. या सर्वामधे मि बर्यापैकी अभ्यासात पुढे त्या मुळे मी शिक्षणात , तर बाकीचे दुनियादारीत पुढे. त्यांना मी इंजीनियर झालो याचा घरच्या एवढाच आंनद आणी अभिमान.
आठवड्या भरा पुर्वी, शिवा नि वाढदिवसाची पार्टी सर्वांना अलिबागला नेवुन दिली, नुसता राडा केला. वाटत होत कि शिवा आता त्या धक्क्यातुन सावरला आहे, पण अजुनही कधी कधी बाईकच्या मागे बसुन चालवणार्याच्या शर्टचे खांदे ओले करायचा . त्याची घरची परिस्थिती बेताचीच, एक लहान भाउ आणी एक बहीण. वडीलांना बायकोपेक्षा दारु जास्त जवळची म्हणुन भांडण नेहमीचीच. हा तसा एका ऑफिस मधला हुद्याने ऑफिसबॉय, पण सर्वात जुना म्हणुन मालकाचा उजवा हात. मोठ्या रकमांची पोचती आणी विश्वावाची कामे याच्या कडुनच म्हणुन एक महत्वाची असामी.
कंपु मधले सर्व जण असेच आपआपली गार्हाणे असुन एकमेकांना सांभा़ळुन मजेत होतो.
-------------------------------------------------------------------
त्याचा फोन ठेवुन मी परत जागेवर आलो आणी रेडीफ ओपन केले.
त्याच लॉगीन केल तर एक नवीन मेल त्यानी स्वतच स्वताला पाठवलेली होती, क्लिक केल, ऑफिस मधे ब्राडबँड असुन सुध्दा मेलची अॅटचमेंट नीट डॉउनलोड होत नव्हती. २-३ वेळा परत करुन पाहीले, पण परत तसेच. हिच मेल नंतर ७२ तासांनी २ सेंकदात ओपन झाली आणी डोळे भरले.
बॉस नी दिलेल्या कामाला परत जुंपलो. सकाळ पासुन झालेल्या सर्व गोष्टी एखाद्या मंद सारख्या विसरुन गेलो. खरच मी मंद झालो होतो, जर थोडा तरी विचार केला असता कि हे अस का होत आहे किंवा आज तारीख काय आहे तर शिवाला बरोबर वर्षापुर्वी जस आम्ही एका खोलीत कोंडुन पळुन लग्न करण्याच्या ४ दिवसाअगोदर तिच्या आत्महत्येबद्द्ल सांगुन सांभाळुन घेतले होते तस झाल असत. साल्याला आधी खर वाटल नाही, जाम हसला, बोलला
"साल्यांनो, कसला मजाक लावुन ठेवला आहे, फालतुगिरी बंद करा"
सर्वानी सांगीतल्यावर वेड्या सारख रड रड रडला.
मुलीच्या घरुन याला प्रचंड विरोध, पळुन जावुन लग्न केले तर घरची बदनामी आणी नाही केल तर याच काही खर नाही, या दंव्दात तिने जिव दिला. ती वेडी, हा वेडा आणी मी मंद !!
---------------------------------------------------------------
तासभराने मोबाइल परत वाजला, लँडलाईन नंबर होता.
फोन उचलला, शिवाचा आवाज
"मिल्या..."
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Oct 2009 - 9:44 am | सुनील
वाचतो आहे. पुढचा भाग लवकर टाका.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Oct 2009 - 4:34 pm | टारझन
रंजक कथा ... पुढचा भाग ?
-- ( टू कुल) डर्मीकुल टार्या
30 Oct 2009 - 9:58 am | llपुण्याचे पेशवेll
मिल्या पुढचा भाग टाक आधी .. अर्धवट कसे लिहीता रे! पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
30 Oct 2009 - 2:29 pm | प्रभो
मिल्या पुढचा भाग टाक आधी .. अर्धवट कसे लिहीता रे! पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
30 Oct 2009 - 1:59 pm | झंडुबाम
वाट पाहतोय पुढच्या भागाची
30 Oct 2009 - 2:17 pm | गणपा
टुकुल जर पुढचा भाग टाकला नाहीस तर मुळ्ळीच प्रतिक्रिया देणार नाही. म्हणुन ही प्रतिक्रिया पण खोडली आहे.
30 Oct 2009 - 3:51 pm | स्वाती२
च्च! आता माझा जीव टांगणीला
30 Oct 2009 - 3:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पटापट भाग टाका.
30 Oct 2009 - 4:10 pm | अवलिया
क्रमशः लिहिणा-यांना फाशी दिले पाहिजे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Oct 2009 - 4:28 pm | बिपिन कार्यकर्ते
नानासाहेबांशी सहमत.
टुकुल पुढे लिहा पटपट.
बिपिन कार्यकर्ते
30 Oct 2009 - 4:32 pm | श्रावण मोडक
सहमत मीही... पण... असो!!!
30 Oct 2009 - 4:42 pm | धमाल मुलगा
टुकुल..
मजा येतेय वाचायला...
30 Oct 2009 - 4:43 pm | दशानन
मी पण सहमत पण एक बदल !
फाशी देण्यासाठी गोळी मारावी... मग फाशी द्यावी... डब्बल मज्जा !
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
30 Oct 2009 - 5:05 pm | टारझन
गोळी ऐवजी दुसरा शब्द सुचला होता :) असो !!
30 Oct 2009 - 4:41 pm | मदनबाण
पुढचा भाग लवकर लिहा...
मदनबाण.....
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
30 Oct 2009 - 5:21 pm | अनिल हटेला
पू भा प्र.................
:-(
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
31 Oct 2009 - 2:58 am | पाषाणभेद
लपुभाली
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
2 Nov 2009 - 7:47 am | प्राजु
पुढे काय झालं..?
कथानक समजतंय असं वाटे पर्यंत क्रमशः..!!!
असो.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/